Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
प्रसंग दुसरा : ३१
अहो अकलंक तत्त्वज्ञानी । मद्वाक्य ऐकावे श्रवणि । तुजसी वाद कराया ज्ञानि । त्रिलोकि कोन्हि दिसेचि ना ॥ १८९ ॥
परंतु तुजसि वहिला । आजपर्यंत वाद झाला ।
तो गुप्त तारादेविने केला । ते मी आली तुज सांगावया ॥ १९० ॥ 1 वा आइकावे मम वचन । जैत वादि होसिल जेंन्हे । प्रातःकालि श्रीसंघ मिळोल । बैसावे जाऊन वादस्थलि ॥१९१॥ मग देविवाद करिता तुजसि । त्वा वदावे तारादेविसि । जे त्यास कथिले पूर्वदिवसि । ते आज सभेसि वद त्वरे ॥ १९२॥ ऐसे पुसता तिजकारने । तदा ते धरोनि राहिल मौन्य । मानभंग होइल तत्क्षणे । जाइल स्वस्थाने पळोनिया || १९३ ॥ ऐसे वदोनि चक्रेश्वरी । जाती झालि निजमंदिरि । जिनशासन रक्षण करि । संकट निवारि जिनभक्ताचे ॥ १९४॥ ऐकोनि देविचे उत्तर । अकलंक निजांसरि थोर । हरूष पावला निर्भर । जैसा चकोर चंद्रोदइ ।। १९५ ।। मग प्रातः काल उठोनि । जिनवंदना करोनि । सर्व श्रीसंघ मिळोनि । वादस्थानि गेला त्वरे ।। १९६ ॥
मग सभामाजि प्रगट । वदे अकलंक सुभट । आज वाद जिंकीन नीट । तदा सुष्ट करू भोजन || १९७ || पाहोनिया तत्साहस | देवि वदे उपन्यास |
अहंवृत्ति आनोनि चित्तास । म्हने मी यास जिंकीन ॥ १९८ ॥ मग वदत से देविप्रति । कैसि असे पूर्व उक्ति । ते वदावे मजप्रति । विचार चित्ति करोनिया ॥ १९९॥
तद्वाक्य ऐकोनि देवता । कुंठित झाली वाक्य वदता । मानभंग झाला त्वरिता । सूर्योदय होता यथा निशा ॥ २०० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org