Book Title: Adhyatma Kalpadrum
Author(s): Dhanvijaygani, Shivram Tanba Dobe
Publisher: Nirnaysagar Press

View full book text
Previous | Next

Page 52
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir परिशिष्ट. नियुक्ति. नंदिसूत्र व अनुयोगद्वारसूत्र. [ काव्यमाला गुच्छक ७ जैनागमस्तव पहा.] आम्रदृष्टान्तः-एका राजाला आंबा खाण्यामुळे काही भयंकर रोग झाला होता. तेव्हां वैद्याने त्याला सांगितले की ह्यापुढे आंबा खाऊ नये. एके दिवशी तो राजा वनविहारार्थ गेला असता तेथे आम्रवृक्षाच्या छायेखाली बसला. इतक्यांत वरून पक्क आम्रफलें गळून खाली पडली. ती राजाने पाहिली तेव्हां त्याच्या तोंडाला पाणी सुटलें व जवळची मंडळी निषेध करीत असतांही ती फळे खाल्ली आणि काही वेळाने तो राजा मरण पावला. विषयलालसेचा वाईट परिणाम भोगूनही पुनः प्रबल संस्कारवशात् मनुष्य विषयसुखान्ध होऊन मरणदुःखरूप गीत पडतो. श्लो.१३२ पहा. आशातनाः-ज्या क्रियेच्या योगाने धर्माचरणाला बऱ्याच बाजूंनी हानि पोहोंचते [आ समन्तात् धर्मशातनं यया सा] अशी क्रिया. धर्माचरणाला ज्यांच्या योगानें बाध येतो त्या खाली दिल्या आहेत:-तांबूल, पान, भोजन, उपानह, स्त्रीभोग, शयन, निष्ठीवन, भूत्रपुरीषोत्सर्ग, व द्यूत इत्यादि क्रिया जिनमंदिरांत सत्पुरुषाने वयं कराव्या. आस्त्रवः-ज्यांच्या योगाने आत्मा कर्मबद्ध होतो ते आस्रव. मिथ्यात्व, अविरति, प्रमाद, कषाय व योग हे मुख्यभेद व उत्तर भेद पांचइंद्रियें, चार कपाय, पांच अबतें, पंचवीस क्रिया, व तीन योग हे आहेत. आहारादिसंज्ञा--आहारभयपरिग्गहमेहुणरूवाउ होति चत्तारि । सत्ताणं सण्णाओ आसंसारं समग्गाणं ॥ अर्थ-आहार, भय, परिग्रह व मैथुन ह्या प्राण्यांच्या चार संज्ञा आहेत. [प्रवचनसारोद्धारे. प्र. र. भाग ३ पृ. ३७४.] इंद्रियनिरोधः---स्पर्शनं रसना घ्राणं चक्षुः श्रोत्रञ्चेति पञ्चेन्द्रियाणि तेषां निरोधः । सक्तः शब्दे हरिणः स्पर्श नागो रसे च वारिचरः । कृपणपतंगो रूपे भुजगो गन्धेन च विनष्टः ॥ उदक बिन्दुदृष्टान्तः-एका सिद्धाने एका अत्यंत तृषापीडित गृहस्थाला व्याकुल झालेला पाहून त्याला विचारिलें की तृषाशमनार्थ मी तुला अमृतजलरा. शिजवळ घेऊन जातो. इच्छा असल्यास सांग. तेव्हां त्याने उत्तर दिले की For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86