Book Title: Adhyatma Kalpadrum
Author(s): Dhanvijaygani, Shivram Tanba Dobe
Publisher: Nirnaysagar Press

View full book text
Previous | Next

Page 61
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ५२ अध्यात्मकल्पद्रुमाचे धर्मरत्नत्रयीः-यथावस्थित वस्तूचा जें यथार्थ बोध करतें तें ज्ञान. ज्ञानावरणीय कर्माचा क्षय व क्षयोपशम झाल्यामुळे उत्पन्न झालेला बोध त्याला हेतु जे द्वादशांग, द्वादश उपांग व उत्तराध्ययनादि प्रकीर्णक त्या सर्वांना ज्ञान ही संज्ञा आहे. जीव अजीव पुण्य पाप आस्रव संवर निर्जरा बंध व मोक्ष या नव तत्वांच्या वरूपावर श्रद्धा, जसे की ही तत्वें सत्य आहेत, मिथ्या नाहीत, तें दर्शन. सर्वपापव्यापारापासून ज्ञानश्रद्धानपूर्वक निवृत्त होणे त्यास चारित्र ह्मणतात. ज्ञानमर्थपरिबोधलक्षणं दर्शनं जिनमताभिरोचनम् । पापकार्यविरतिस्वभावकं कीर्तितं चरितमात्मवेदिभिः ॥ ५० ॥ संगतं त्रयमिदं प्रजायते कृत्स्नकर्मविनिवृत्तिकारणम् । पङ्गुलोचनविहीनवद्भवेदेककं न पुनरर्थसाधकम् ॥ ५१ ॥ इति चन्द्रप्रभचरितकाव्ये अष्टादशसर्गे तत्वस्यावगतिर्ज्ञानं श्रद्धानं तस्य दर्शनम् । पापारम्भनिवृत्तिस्तु चारित्रं वर्ण्यते जिनैः ॥ १६२ ।। ज्वालाकलापवद्वते॒रूमेरण्डबीजवत् । ततः स्वभावतो याति जीवः प्रक्षीणबन्धनः ॥ १६३ ॥ इति धर्मशर्माभ्युदयकाव्ये एकविंशे सर्गे ध्यान अशुभ शुभ आर्तध्यान रौद्रध्यान धर्म्यध्यान शुक्लथ्यान आर्तध्यान–इष्टवस्तूच्या वियोगाने, अनिष्टवस्तूच्या संयोगाने किंवा इतरप्रकारांनी मनांत उद्भवणारी दुःखचिंता. रौद्रध्यान-स्वतः जीवहिंसा करून किंवा ती करितांना दुसऱ्यास पाहून, कपटभाषणाने दुसऱ्यास फसवून मनांत हर्ष मानणे. धर्म्यध्यान--शुद्धधर्माचे एकाग्रतेनें चिंतन करणे. याच्या मैत्री, प्रमोद, कारुण्य, व माध्यस्थ्य ह्या चार भावना. शुक्लध्यान--निर्मल आत्म्याच्या स्वरूपाचे तन्मयत्वें ध्यान करणे. For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86