________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
၆ ဝ
अध्यात्मकल्पद्रुमाचें
श्री
प्रसन्नचन्द्रराजर्षिकथाः --- प्रसन्नचन्द्र नांवाचा एक राजर्षि होता. महावीरस्वामीचा उपदेश श्रवण करून तो संसारविरक्त होता झाला. पुत्रास गादीवर स्थापन करून आपण पूर्ण साधु बनला. एके समयीं दोन गृहस्थ त्याजकडे आले त्यांपैकी एकजण, साधु होऊन जन्मसार्थक्य केल्याबद्दल राजर्षीची प्रशंसा करूं लागला. तेव्हां दुसरा ह्मणाला, बालकाला गादीवर बसवून आपण साधु बनला आणि त्यामुळे प्रजेला आणि बालराजाला आपत्तींत ढकलले. कारण- परचक्र आले आहे. हा वृत्तान्त ऐकून राजर्षीचे चित्त पुत्राकडे लागलें. मनांतल्या मनांत तो शत्रूंशी लढू लागला. शेवटीं निःशस्त्र झालों असें मनांत भावून आपल्या माथ्यावरील मुकुट शत्रूस फेंकून मारण्याच्या इराद्यानें त्यानें मस्तकाकडे हात नेला तों लुंचित मुंडाला स्पर्श झाला. त्या बरोबर शुद्धीवर येऊन व पश्चात्ताप पावून ह्मणाला अहह म्यां हें काय केलें ! आः किं चक्रे मया घिग् धिग् विराद्धं प्रथमं व्रतं । शुद्धमानाशयो भूयः स्वं निन्दत्यतिचारिणम् । मनोद्धानि कर्माणि मनसैव क्षिपस्तदा || श्लोक २३५ पहा.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पापः - अशुभप्रवृत्त्यात्मकं आयतिदुःखदायि कर्म पापं ।
पिंडविशुद्धि: --- दोषरहित आहार, उपाश्रय, वस्त्र व पात्र यांचा - स्वीकार करणे. पुद्गलः --- "सप्ततत्वानि" या टीपेखालीं दिलेले श्लोक ९० - ९२ पहा. पुण्यः -- शुभप्रवृत्त्यात्मकं आयति सुखदायि कर्म पुण्यम् । पोषधोपवासव्रतः - चार किंवा आठ प्रहर समता ठेवून आहार, शरीरसंस्कार, मैथुन व सावद्यव्यापार यांचा त्याग करून स्वाध्याय ध्यानांत प्रवृत्त राहणें व जीवाला ज्ञानध्यानाच्या योगानें पुष्ट करणें तें पोषधत्रत.
ब्रह्मचर्यगुप्तिः -- सहि कद्द निसिज्झिदिय कुडुंतर पुण्यकीलियपणीए । अमायाहार विभूषणाय नव बंभगुत्तीओ ॥ प्रवचनसारोद्धारे । प्र. र. भाग ३ पृ. १६६
इति
अर्थ :--- वसति, कथा, निषद्या (आसन), इंद्रिय, कुड्यांतर, पूर्वक्रीडित, पौष्टिक भोजन (प्रणीत ), अतिमात्राहार, विभूषण या सर्व वस्तूंच्या परित्यागानें ब्रह्मचर्य पाळतां येतें.
For Private And Personal Use Only
बाहुबलिकथा: - बाहुबली हा भरतचक्रवर्तीचा पुत्र. यानें फार तपस्या केली होती. परंतु मानत्याग न केल्यामुळे त्याला तपश्चर्येचें फळ जें केवलज्ञान तें प्राप्त झालें नव्हतें. मानमुक्ति होण्याबरोबर केवल ज्ञानप्राप्ति झाली. भावना - भाव्यते ( वास्यते ) वैराग्येणात्मा याभिस्ता भावनाः ।