________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
परिशिष्ट.
५९
२ व्रतप्रतिमा - पांच अणुव्रतें, तीन गुणवतें, व चार शिक्षात्रतें यांचे पालन.
( दोन मासांची )
३ सामायिक प्रतिमा -- वचनाचे दहा दोष, कायेचे बारादोष, मनाचे दहा दोष टाळून ममता त्यागून समता ठेवणें. ( तीन मासांची )
४ पोषधप्रतिमा - पूर्वोक्त सामायिकदत चार प्रहर किंवा आठ प्रहरपर्यंत राणें. (चार मासांची )
५ सचित्त भोजन परिहारप्रतिमा - ( पांच मासांची )
६ दिनब्रह्मचर्यप्रतिमा - नवविध गुप्तिसहित ब्रह्मचर्यपालन ( सहा मासांची )
७ अहोरात्र ब्रह्मचर्यप्रतिमा . - ( सात मासांची )
८ निरारंभप्रतिमा - पापाचा आरंभ न करतां विवेकानें क्रिया करीत असणें. ( सात अहोरात्र )
९ परिग्रहप्रतिमा - ( सात अहोरात्र )
१० पापोपदेशत्यागप्रतिमा . - ( सात अहोरात्र )
११ उचितग्राहिप्रतिमा. घर दार सोडून मठांत साधूप्रमाणे राहणे. ( एक अहोरात्र )
१२
( एक रात्रि)
मुहपत्ती पडिलेहण
सांगितलें आहे.
[प्र. र. भाग २ पृ. ५५९ -- ५६० समयसारनाटक ] प्रतिलेखनाः --- प्रतिक्रमणसूत्र पृ. ३७५ - ३७६ यांत मुखानंतक पडिलेहण अथवा मुहपत्ती पडिलेहण कसें करावें याची माहिती आहे. करीत असतां कोणकोणत्या गोष्टींचें चिंतन करावें हें खालीं १ सूत्र व अर्थ यांचें तत्व उत्तम प्रकारें हृदयांत धारण करतों. २ सम्यक्त्व मोहनीय ३ मिश्रमोहनीय ४ व मिथ्यात्वमोहनीय यांचा त्याग करतो. ५ कामराग ६ स्नेहराग व ७ दृष्टिराग यांना सोडतों. ८ देवतत्व ९ गुरुतत्व व १० धर्मतत्व यांचा आदर करतों. ११ कुदेव १२ कुगुरु व १३ कुधर्म यांचा त्याग करतों. १४ ज्ञान १५ दर्शन १६ चारित्र यांचा आदर करतो. १७ ज्ञान १८ दर्शन १९ चारित्र विराधनेचा त्याग करतों. २० मनोगुप्ति २१ बचनगुप्ति व २२ काय गुप्ति यांचा आदर करतों. २३ मनोदंड २४ वाग्दंड व २५ कायदंड यांना सोडतो. याच प्रमाणे पंचवीस शरीरप्रतिलेखना आहेत.
प्रमादः - प्रमादाचे प्रकार आठ आहेत:- अज्ञान, संशय, विपर्यय, राग, द्वेष, स्मृतिभ्रंश, योगदुः प्रणिधान व धर्मानादर.
For Private And Personal Use Only