Book Title: Adhyatma Kalpadrum
Author(s): Dhanvijaygani, Shivram Tanba Dobe
Publisher: Nirnaysagar Press

View full book text
Previous | Next

Page 70
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir परिशिष्ट. अनित्यत्व, अशरणता, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुचिल्व, आस्रव, संवर, निर्जरा, लोकस्वभाव, बोधिदुर्लभता, धर्मकथक. [मन वचन व काय यांच्या योगाने में शुभाशुभकर्म जीव ग्रहण करतो त्यास आस्रव ह्मणतात. आत्रवाचा निरोध तो संवर. संसाराला हेतुभूत जी कर्मसंतति तिचा समूळ नाश जिच्या योगाने होतो ती निर्जरा. बोधिदुर्लभता झणजे धर्मज्ञानदुर्लभता.] उपाध्याय श्रीविनयविजयगणिकृत "शान्तसुधारस" नांवाच्या गेयकाव्यांत षोडश भावनांचे स्वरूप उत्तम रीतीनें वर्णिले आहे. भिक्षुक दृष्टान्तः--एक गृहस्थ अति दारिद्यपीडित होता. तो द्रव्याजनाची इच्छा मनांत धरून परदेशी जावयास निघाला तेव्हां तो एका गांवीं येऊन एका देवळांत उतरला. तेथेच एक साधुही पूर्वीच येऊन राहिला होता. त्या साधूजवळील मनोवांच्छित वस्तु देणा-या सिद्धिकुंभाचा चमत्कार पाहून त्या दारिद्यपीडिताने आपली कथा सांगितली. तेव्हां साधूला दया येऊन त्याला सांगितले की कुंभसिद्धि विद्या किंवा सिद्ध केलेला सिद्धिकुंभ यांपैकी जे तुला पाहिजे तें मी देण्यास तयार आहे. कुंभसिद्धिविद्येपेक्षां आयता सिद्धकुंभ बरा हे जडमतीला वाटून त्याने साधूपासून तो कुंभ घेतला व घरी परत आला. घटाच्या सामर्थ्याने त्याला ऋद्धि प्राप्त झाली. पण एके दिवशी मदिरोन्मत्त होऊन तो कुंभ हातात घेऊन नाचूं लागला असतां खाली पडून फुटला. अशा अविचाराने आपल्या सर्व ऐश्वर्याचे मूलसाधन नाहीसे झाल्याबद्दल त्याला अति-दुःख झाले. सद्धर्म हा सिद्धिकुंभाप्रमाणे आहे. प्रमादपरवश होऊन आपल्या हातून त्याचा नाश होणार नाही अशाबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे. श्लोक १३२ पहा. मदः- जाइ कुल रूव बल सुय तव लाभिस्सरिय अहमयमत्तो। एआई चिअ बंधइ असुहाई बहु च संसारे ॥ इति प्रवचनसारोद्धारे । प्र, र. भाग ३ पृ ४१५ अर्थ:----जातिमद, कुलमद, रूपमद, बलमद, श्रुतमद, तपोमद, लाभमद व ऐश्वर्यमद या आठ मदांनी उन्मत्त झालेला पुरुष संसारात अनेक पापें जोडतो. महाव्रतः-अहिंसासूनृतास्तेयब्रह्मचयाँपरिग्रहाः । पञ्चभिः पञ्चभिर्युक्ता भावनाभिर्विमुक्तये ॥ १. जीवदया. २. सर्वपरिग्रहत्याग, For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86