________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
परिशिष्ट.
परंपरा-यांना अन्नवस्त्रादि अर्पण करणे, त्यांची शुश्रूषा करणे याप्रमाणे वैयावृत्य दहा प्रकारांचे आहे, श्रमणधर्मः-खंति य मद्दवज्जव मुत्ती तव संजमे य बोधव्वा ।
सञ्चं सोयं अकिंचणं च बंभं च जइधम्मो ॥ [ शान्ति, मार्दव, आर्जव, लोभत्याग, तप, संयम (आत्रवाची त्यागवृत्ति ), सत्य, शौच, अकिंचनता, ब्रह्मचर्य.]
शाकटिक दृष्टान्तः-अमुक रस्ता वाईट आहे व अमुक रस्ता चांगला आहे हे माहीत असतांही वाईट रस्त्यानेच आपली गाडी एका गाडीवाल्याने हांकली व अर्थात् ती मोडली. तेव्हां जाणूनबुजून आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे कृत्य केले याबद्दल त्याला पश्चात्ताप झाला. पाप करून पापाचे फळ प्राप्त झाल्यावर पुण्य केले असते तर बरे झाले असतें हैं ह्मणणे शुष्क आहे. श्लोक १३२ पहा.
श्राद्धधर्म अथवा श्रावकधर्म.
(देशविरतिचारित्ररूप द्वादशविध गृहस्थधर्म ) अणुव्रतें:-(१) स्थूलप्राणातिपातविरमणव्रत. (२) स्थूल मृषावादविरमणव्रत. (३) स्थूल अदत्तादानविरमणबत. (४) स्थूल परस्त्रीगमनविरमगवत. (५) स्थूल परिग्रहपरिमाणवत.
गुणवतें--(६) दिक् परिमाणवत. (७) देशावकाशित. [हे सहाव्या व्रताचे संक्षेपवत आहे. या व्रतांत गमन करण्याची मर्यादा अधिक संकुचित करावी लागते ] (८) अनर्थदण्डविरमणव्रत [स्वतःचा कांहीं एक अर्थ ज्यांपासून साधत नाही अशा पापक्रियांस अनर्थदंड ह्मणतात].
शिक्षात्रते:-(९) सामायिकवत [ समतापालनरूपवत ] (१०) पोषधोपवासव्रत [ द्वितीया, पंचमी, अष्टमी, एकादशी व चतुर्दशी ह्या पर्वतिथींस चार किंवा आठ प्रहरपर्यंत व्रत पाळणे ] ११ भोगोपभोगसंख्यानव्रत-[ एकवार ज्यांचा उपयोग होतो ते भोग; जसें, आहार, पुष्प, विलेपन; वारंवार ज्यांचा उपयोग होतो ते उपभोग; जसें, भवन, वस्त्र, स्त्री इत्यादि ] १२ अतिथिसंविभागवत.
[धर्मशर्माभ्युदयकाव्ये एकविंशे सर्गे श्लोकाः १२४, १२५, १४२, १४३, १४९-१५३.]
For Private And Personal Use Only