Book Title: Adhyatma Kalpadrum
Author(s): Dhanvijaygani, Shivram Tanba Dobe
Publisher: Nirnaysagar Press
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
परिशिष्ट.
६३
महाप्रातिहार्यः -- इंद्रा देशकारी देवांनीं श्रीऋषभदेवाच्या संमानार्थ केलेली
कृत्ये त्यांस प्रातिहार्य हाणतात.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
किंकिल्लि कुसुमबुट्टी देवज्झुणि चामरासणाई च ।
भावलय भेरि छत्तं जयंति जिणपाडिहेराई || इति
प्रवचनसारोद्धारे । प्र० २० भाग ३ पृ. ११४
अर्थ :- अशोकवृक्ष, कुसुमवृष्टि, दिव्यध्वनि, चामर, आसन, भावलय, भेरि व छत्र हीं अष्टमहाप्रातिहार्ये.
तें.
मिथ्यात्वः - अभिग्रह मिथ्यात्व - मी समजलों तेंच सत्य आहे असा ग्रह अनभिग्रह मिथ्यात्व --- सर्व धर्ममतें चांगलीं आहेत असें मानणें तें अभिनिवेशमिथ्यात्व --- जाणून बुजून असल्याचे ठायीं कदाग्रह तें. संशयमिध्यात्व — जिनोक्त तत्वांचे ठायीं शंका तें. अनाभोगमिध्यात्व - धर्माधर्माची उपादेयानुपादेयता पशूप्रमाणें न सम
जणें तें
मूल अतिशय: - भगवान् जिनाच्या ठायीं चार अतिशय आहेत -- १ ज्ञानातिशय (त्रैकालिकशान ) २ वचनातिशय ( अग्राम्यता महार्थता - अव्याहतार्थत्वादि ) अपायापगमातिशय ( उपद्रवनिवारकता ) ४ पूजातिशय (त्रैलोक्यपूजनीयता ) -
मोक्षसाधनचतुरङ्गीः -- चत्तारि परमंगाणि दुलहाणीह जंतुणो ।
माणुसतं सुई सद्धा संजमंमि य वीरियं ॥
[ उत्तराध्ययनसूत्रे तृतीयाध्ययने गाथा प्रथमा ] चत्वारि परमांगानि दुर्लभाणीह जन्तोः । मानुषत्वं श्रुतिः श्रद्धा संयमे च वीर्यम् ॥
श्रुतिर्धर्मस्य श्रवणम् । श्रद्धा धर्मे रुचिः । संयमवीर्यं साध्वाचारपालने सामर्थ्यम् ।
For Private And Personal Use Only
इति च्छाया
रजोहरण: - जमिनीवर वस्तु ठेवतेवेळी किंवा स्वतः बसतेवेळीं जीवहिंसा होऊं नये ह्मणून जमीन वगैरे झाडण्याकरितां सुमारे दीड हात लांबीच्या दांड्यास मऊ लोकरीच्या वीत वीत दोऱ्यांचा झुबका लावलेली संमार्जनी ( झाडणी ) जैनाजवळ, विशेषत: जैन साधूपाशीं असते. तिला रजोहरण हें नांव आहे. लेश्या: - छलेसाओ कन्हा नीला काऊय तेय पहा सिया ।

Page Navigation
1 ... 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86