Book Title: Adhyatma Kalpadrum
Author(s): Dhanvijaygani, Shivram Tanba Dobe
Publisher: Nirnaysagar Press

View full book text
Previous | Next

Page 54
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir परिशिष्ट. ४५ खंदकांत पाणी भरून त्यांत तपस्वी बुडून किंवा वाहून जाऊन मरूं नयेत ह्मणून देवाने तेथें वृष्टि केली नाही, इतर ठिकाणी वृष्टि झाली. अनावृष्टि होण्याला कारण साधु आहेत हे लोकांस समजल्यावर त्यांनी साधूंस खरपूस मार देऊन काढून लावले. तेव्हां तपस्वी ह्मणाले की या नगरीवर मुसळधार वृष्टि होवो. तदुक्तीप्रमाणे अतिवृष्टि झाल्यामुळे नगरांतील बरेच लोक मेले. या पापामुळे ते तपस्वी नरकांत पडले. श्लो. २५१ पहा. करणसप्ततिः-पिंडविसोही समिई भावण पडिमा य इंद्रियनिरोहो । पडिलेहण गुत्तीओ अभिग्गह चेव करणं तु ॥ अर्थ:-चतुर्विध पिंडविशुद्धि ( दोषरहित आहार, उपाश्रय, वस्त्र व पात्र) पांच समिति, द्वादशभावना, द्वादशप्रतिमा, पञ्चविध इंद्रियनिरोध, पंचवीस प्रतिलेखना, गुप्तित्रय, व चतुर्विध अभिग्रह. कषायः--कोहो माणो माया लोभो चउरो हवंति हु कसाया । इति प्रवचनसारोद्धारे । प्र. र. भाग ३ पृ. १६८. अर्थः-क्रोध मान माया व लोभ हे चार कषाय । काकिणीदृष्टान्तः----एक गृहस्थ द्रव्यार्जनासाठी परदेशी गेला होता. तेथे कांही उद्योगधंदा करून त्याने काही द्रव्य मिळविलें होतें तें घेऊन घराकडे परत येतांना वाटेत खर्च करण्यासाठी त्यांतील एका रुपयाचे पैसे करून घेतले होते. वाट चालून थकल्यामुळे एके ठिकाणी विश्रांति घेण्याकरितां तो थांबला. श्रमपरिहार झाल्यावर पुनः वाट चार लागला आणि काही वेळाने दुस-या मुक्कामावर येऊन पोहोचला. तेथे त्याला आढळून आले की आपला एक पैसा कमी आहे. तेव्हां द्रव्याची पिशवी तेथे एके ठिकाणी लपवून ठेवून तो पैशाचा शोध लावण्यासाठी मागे परतला. पहिल्या मुक्कामी येऊन पोहोचल्यावर त्याला तेथें पैसा आढळला नाही तेव्हां निराश होऊन मागे परतला आणि पुनः दुसऱ्या मुक्कामी येऊन पोहोचला. तेथें पिशवीही त्याला मिळाली नाही. क्षणिक सुखाच्या मागे लागून सर्वस्वही बुडविले व तो उभयतोभ्रष्ट या निंद्य संज्ञस पात्र झाला. श्लो. १३२ पहा. For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86