Book Title: Mahapurana Part 2 Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra View full book textPage 4
________________ श्री १०८ चा. च. आचार्य शांतिसागर दि. जैन जिनवाणी जीर्णोद्धार संस्था संक्षिप्त परिचय या संस्थेचा शुभ संकल्प वि. सं. २००० मध्ये श्री सिद्ध क्षेत्र कुंथलगिरि येथे पर्युषण पर्वाच्या मंगल प्रसंगी झाला. संस्थेची नियमावली व घटना बनविण्यात येऊन सं. २००१ मध्ये बारामती येथे संस्था ट्रस्ट करण्यात आली. ___ संस्थेचा मुख्य उद्देश प्राचीन जैन सिद्धांत ग्रंथांचा जीर्णोद्धार करून जैन साहित्य प्रकाशन करणे व त्याचा प्रचार करणे हा ठेवण्यात आला. धर्मसंस्कृतीचे रक्षण व प्रभावनेचे प्रमुख अंग प्राचीन जैन साहित्य सुरक्षित ठेवणे, त्याचे प्रकाशन करणे, हे जाणून मूडबिद्री येथे मूल जैन सिद्धांत ग्रंथ धवला-जय धवला-महाधवला ताडपत्र ग्रंथ फार जीर्ण अवस्थेत पडले आहेत. त्यांचा जीर्णोद्धार करणे, त्यांचे प्रकाशन करण्याविषयी पूज्य श्री शांतिसागर महाराजांचे अंतःकरणात स्फूर्ति जागृत झाली. त्यावेळी क्षेत्रावर उपस्थित असलेले श्री १०५ भट्टारक जिनसेन मठाधीश, कोल्हापूर, श्री ध. दानवीर संघपति शेठ गेंदनमलजी मुंबई, श्री गुरुभक्त शेठ चंदुलाल ज्योतिचंद शहा सराफ, बारामती, दानवीर श्री रामचंद्र धनजी दावडा नातेपुते, यांचे समोर महाराजानी ग्रंथाचा जीर्णोद्धाराचा प्रश्न ठेवला. ____ आचार्य श्रीच्या आदेशानुसार प्रेरित होऊन सर्वानी त्या कार्याची पूर्ति करण्याचा संकल्प केला. सर्वानी मिळून १ लाख रु. दान देण्याची स्वीकृति दिली. प्राचीन ग्रंथाना ताम्रपत्रावर टंकोत्कीर्ण करून सुरक्षित ठेवण्याचे कार्य श्री १०८ समंतभद्र महाराज यांच्या सूचनेवरून श्री वालचंद देवचंद शहा मुंबई याना संस्थेचे मंत्री बनवून त्यांचेवर सोपविण्यात आले. या ग्रंथाचे संपादन संशोधन प्रकाशन कार्यात जवळ जवळ ३०,००० रु. खर्च आला. तसेच धवला ग्रंथांचे ताम्रपटावर अंकित करण्यात रु. २१०० खर्च आला. या ग्रंथाचे फोटो प्रिंट घेण्यात ११००० खर्च आला. या प्राचीन जिनवाणी जीर्णोद्धार संस्थेचे स्थायी सभासद वर्गणी रु. १००० ठेवली आहे. दानी-उदार सज्जनानी स्थायी सदस्य रूपाने आपले शुभ नांव नोंद करून जिनवाणीची प्रभावना करावी. ___ या संस्थेद्वारा प्रकाशित ग्रंथ विनामूल्य जैन मंदीर-पाठशाळा-त्यागी गण-विद्वान गण याना भेट रूपाने देण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. आतापर्यंत या संस्थाद्वारा खालील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.orgPage Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 ... 720