Book Title: Chinta Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ संपादकीय चिंता कोणाला नाही होत? जे संसारापासून खऱ्या अर्थाने संपूर्णपणे विरक्त झाले असेल त्यांनाच चिंता होत नाही, बाकी सर्वांना होतेच. आता ही चिंता का होते? चिंतेचा परिणाम काय? आणि चिंतापासून मुक्त कसे होता येईल? त्याची यथार्थ समज परम पूज्य दादाश्रींनी दाखवली आहे ते येथे प्रकाशित करीत आहोत. चिंता म्हणजेच प्रकट अग्नी! निरंतर झाळतच राहते! रात्री झोपायलाही देत नाही. भुख-तहान हराम करते आणि अनेक रोगांना आमंत्रण देतो. इतकेच नाहीतर पुढला अवतार जनावर गतीचे बांधते. हा जन्म आणि पुढचा जन्म दोन्ही बिघडविते. चिंता हे अहंकार आहे. कुठल्या आधाराने हे सर्व चालत आहे, ह्याचे विज्ञान नाही समजल्यामुळे स्वतः डोक्यावर घेऊन कर्ता होत असतो, आणि भोगत राहतो. भोगणे मात्र अहंकाराला असते. कर्ता-भोक्तापण अहंकारालाच आहे. चिंता केल्याने कार्य बिघडते असा निसर्गाचा नियम आहे. चिंतामुक्त झाल्याने कार्य आपोआपच सुधारते. मोठ्या माणसांना मोठी चिंता, एयरकंडिशन मध्ये सुद्धा चिंताने धामधूम असतात! मजूरांना चिंता होत नाही, आरामाने शांत झोपतात आणि ह्या शेठजीना झोपेच्या गोळ्या खायला लागतात! ह्या जनावरांना कधी चिंता होते का? मुलगी दहा वर्षाची झाली तेव्हापासून तिच्या लग्नाची चिंता चालु! अरे तिच्यासाठी मुलगा जन्मला असेल कि जन्मायचा बाकी असेल? चिंता करण्यारांकडे लक्ष्मी टिकत नाही. चिंतेने अंतराय कर्म बांधले जातात. चिंता कोणाला म्हणतात? विचार करण्याची हरकत नाही. पाणीत भोवर होते तसी विचारांची भोवर निर्माण झाली तर तेव्हा चिंता शुरू होते. दोरीत पीळ लागते तशी विचारांची पीळ लागली कि तिथे बंद करायचे. खरोखर कर्ता कोण आहे ते नाही समजल्यामूळे चिंता होत असते कर्ता, सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. जगात कोणी स्वतंत्र कर्ता नाहीच. निमित्त मात्र आहेत. चिंता कायमची कधी जाते? कर्तापण सूटणार तेव्हा! कर्तापण सूटणार कधी? आत्मज्ञान प्राप्त करणार तेव्हा. डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंदPage Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42