________________
चिंता सरळ होना. स्वदेशात (आत्मात) तर खूप सुख आहे, पण स्वदेश पाहिलाच नाही ना!
वसुली आठवते तेव्हा... रात्री सगळे म्हणतात कि 'अकरा वाजले, आता तुम्ही झोपा !' थंडीचे दिवस आहेत आणि आपण मच्छरदानीत घुसलात. घरातील सगळी लोकं झोपली. मच्छरदानीत घुसल्यावर आपल्याला आठवले कि एका माणसाचे तीन हजाराचे बिल बाकी आहे आणि मुद्दत होऊन गेली आहे. आज सही केली असती तर मुद्दत मिळाली असती. तर काय रात्री कधी सह्या होतात? नाही होत ना? तर मग सुखाने झोपलात तर त्यात आपले काय बिघडणार?
चिंतेचे मूळ कारण? जीव जळत राहतो, अशी चिंता कामाची नाही. जी शरीरला नुकसान करते आणि जी वस्तु येणार होती त्यात विघ्न पाडते. चिंतेनेच असा संयोग निर्माण होतो. असा सारासार, असे विचार केले पाहिजेत, पण चिंता कशासाठी? याला इगोइझम (अहंकार) म्हटले आहे. तो इगोइझम नाही झाला पाहिजे. 'मी काहीतरी आहे आणि मीच चालवतो', याने त्याला चिंता होते आणि 'मी असणार तरच या केस चे निकाल होईल.' यानेच चिंता होत राहते. म्हणून इगोइझमवाल्या भागाचे ऑपरेशन करा. मग जे सारासार विचार राहतिल त्याची हरकत नाही. ते मग आत रक्त नाही जाळत. नाहीतर चिंता रक्त जाळते, मन जाळते. चिंता असेल त्याच वेळेला मुलगा काही सांगायला आला, तर त्याच्यावरही रागवता, अर्थात् सर्वप्रकारे नुकसान करता. हा अहंकार असा आहे कि पैसे असू देत या नसू देत, पण कोणी म्हणेल कि या चन्दुभाई (वाचकांनी येथे आपले नांव समजायचे)ने माझे सगळे बिघडवले, तेव्हा अपार चिंता आणि उपाधी होऊन जाते! आणि जग तर आम्ही नाही बिघडवला असेल तरी म्हणनार ना!