________________
चिंता
प्रश्नकर्ता : एयरकन्डिशन. दादाश्री : हा, एयरकन्डिशन. हिन्दुस्थानात आश्चर्य आहे ना. प्रश्नकर्ता : सद्या सगळ्या चिंता एयरकन्डिशन मध्येच होतात.
दादाश्री : हा, अर्थात् ते सोबती च असतात. चिंता सोबत एयरकन्डिशन. आपल्याला एयरकन्डिशनची जरूरत नाही पडत.
या अमेरिकनांच्या मुली निघून जातात. त्याची चिंता त्यांना नाही होत, आणि आपल्या लोकांना? कारण प्रत्येकाची मान्यता वेगळी आहे, म्हणून.
आयुष्याचे एक्सटेन्शन मिळाले? आपण या दुनियेत अजून दोनशे वर्ष तर राहाल ना? एक्सटेन्शन (वाढवून) नाही घेतले का?
प्रश्नकर्ता : एक्सटेन्शन कशाप्रकारे मिळनार? आपल्या हातात तर काही नाही, मला तर नाही वाटत.
दादाश्री : काय बोलता? जर जगणे हातात असेल तर मरणार नाही. जर आयुष्याचे एक्सटेन्शन नाही मिळत तर का चिंता करता? जे मिळाले आहे, ते आरामात भोगा ना!
चिंता ओढून घेणे, मनुष्य स्वभाव चिंतेने काम बिगडते. या चिंतेने काम शत प्रतिशतच्या एवजी सत्तर प्रतिशत होते. चिंता कामात ऑब्स्ट्रक्ट (अडथळा) करते. जर चिंता नसेल तर खूप सुंदर परिणाम येईल.
जसे आपण मरणार आहोत असे सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु मृत्युची आठवण आल्यावर लोकं काय करतात? त्या आठवणला धक्का देतात. आपल्याला काही झाले तर, असे आठवल्यावर धक्का देतात. अशाच प्रकारे चिंता होते, तेव्हा धक्का द्या कि इथे नको भाऊ.