________________
चिंता प्रश्नकर्ता : ते पण जातो.
दादाश्री : ते सारे डिपार्टमेन्ट आहेत, तर या एक ही डिपार्टमेन्टची उपाधी आहे, तिला दुसऱ्या डिपार्टमेन्ट मध्ये नको घेऊन जाऊ. एका डिविझन मध्ये गेलात तर तिथे जे होईल ते सगळे काम पूर्णपणे करा. पण दुसऱ्या डिविझन मध्ये भोजन करायला गेलात, तर पहिल्या डिविझनची उपाधी तिथेच सोडून, इथे भोजन घ्यायला बसलात तर स्वादाने भोजन करा. बेडरूम मध्ये जाते वेळी सुद्धा पहिली उपाधी तिथल्या तिथे ठेवा. असे आयोजन नाही होणार, तो मनुष्य मारला जाईल. खायला बसले तेव्हा चिंता करता कि जर ऑफिसमध्ये साहेब ओरडले तर काय करायचे? अरे, ओरडतील तेव्हा बघू, आता सुखाने भोजन घे ना!
भगवंतानी काय सांगितले होते कि, प्राप्त भोगा, अप्राप्त ची चिंता नका करू. अर्थात् काय कि, जे प्राप्त आहे त्याला भोगा.
___ एयरकन्डिशन मध्ये पण चिंता प्रश्नकर्ता : आणखीन सुद्धा चिंता असतील ना डोक्यात?
दादाश्री : जेवण जेवता तेव्हा ही, डोक्यावर चिंता असते. अर्थात् ती घंटा डोक्यावर लटकतच असते तेव्हा, आता पडली कि, आता पडली, असे होत असते ! अशा भयाच्या संग्रहस्थानात राहून हे सगळे भोगायचे आहे. अर्थात् हे सगळे कुठपर्यंत भोगायचे? तरी पण लोकं निर्लज्ज होऊन भोगतातही. जे व्हायचे ते होईल, पण भोगतात! या संसारात भोगण्या योग्य काही आहे का?
विदेशात असे तसे नाही होत. कुठल्या ही देशात असे नाही होत. हे सगळे इथेच आहे. बुद्धिचे भंडार, भरपूर बुद्धि, चिंता पण भरपूर, कारखाने निघालेत सगळे. हे मोठे मोठे कारखाने, जबरदस्त पंखे फिरतात वरुन, सगळे फिरते. चिंता पण करतात आणि उपाय पण करतात. मग ते थंड करतात, काय म्हणतात त्याला?