________________
१२
चिंता आहे. काही नाही. जिथे बघा तिथे, आपण जिथे जाता, एनी व्हेर, एनी प्लेस, (कुठेही, कुठल्याही जागी) तिथे आपल्याला ती प्राप्त होईल. निसर्गाने आपले किती रक्षण केले आहे. आपण निसर्गाचे गेस्ट (पाहुणे) आहात आणि पाहुणे असून आपण आरडाओरड करता, चिंता करता! म्हणून निसर्गाच्या मनात असे येते कि अरे, माझे पाहुणे झाले, पण ह्या माणसाला पाहणे होणे नाही जमत. तेव्हा मग स्वयंपाक घरात जाऊन म्हणतात, 'कढी त मीठ जरा जास्त घाला.' अरे, वेडा, पाहुणा असून स्वयंपाक घरात घुसतो. ते जसे वाढतील तसे खा. पाहुणे असून स्वयंपाक घरात कसा जाऊ शकतो? अर्थात् हे सर्वात किंमती हवा फ्री ऑफ कॉस्ट ! त्याने दुसऱ्या नंबरवर काय येते? पाणी येते. पाणी थोड्या अधिक पैसांनी मिळते. आणि मग तिसरे आले धान्य, ते थोड्या अधिक पैसाने.
प्रश्नकर्ता : प्रकाश.
दादाश्री : लाईट तर असणारच. लाईट तर, सूर्यनारायण जसे कि आपल्या सेवेसाठीच बसले आहे. असे साडे सहा वाजता येऊन ऊभे राहतात.
__ कोठे ही भरोसाच नाही इथे आपल्या हिन्दुस्थानात लोकं इतकी चिंता करणारे आहेत कि, हे सूर्यनारायणांनी जर एक च दिवस सुटी घेतली आणि म्हणेल कि आता परत कधी ही सुटी वर नाही जाणार, तरी ह्या लोकांना दुसऱ्या दिवशी शंका होईल कि उद्या सूर्यनारायण येणार कि नाही? सकाळ होणार कि नाही? अर्थात् नेचर (निसर्ग)चा भरोसा नाही. स्वत:वर ही भरोसा नाही. भगवंतचा ही भरोसा नाही. कुठल्या ही गोष्टीचा भरोसा नाही. स्वत:च्या पत्नीवर ही भरोसा नाही.
स्वत:च निमंत्रित केली चिंता चिंता करतो ती पण शेजाऱ्याचे बघुन, शेजाऱ्याकडे गाडी आहे आणि आपल्याकडे नाही. अरे, जगण्यासाठी किती पाहिजे? तू एकदा ठरव कि