________________
चिंता
पीछे बना
आता कबीर साहेब काय म्हणतात, 'प्रारब्ध पहेले बना, शरीर, कबीर आचंबा ये है, मन नहीं बांधे धीर' ! मनाला धीर नाही हेच मोठे आश्चर्य आहे. ही सगळी ताळमेळ मिळव मिळव करीत, सगळ्यांना विचारत राहिलो. आपला ताळ काय? बोला, सांगा.
हा, एका व्यक्तिची चुक होऊ शकते, पण वीतराग भगवानांची चुक नाही म्हणू शकत. लिहिणाऱ्याची चुक झाली तर असे होऊ शकते. वीतरागांची चुक तर मी कधी माननारच नाही. मला कसेही फिरवून फिरवून समजावले पण मी वीतराग भगवानांची चुक मानलीच नाही. लहानपणापासून, जन्मापासून, वैष्णव असूनही मी त्यांची चुक मानली नाही, कारण इतके शहाणे पुरूष. ज्याचे नांव स्तवन केल्याने कल्याण होते. आणि आपली दशा तर बघा ! एका राई (मोहरी) एवढे कमी-जास्त होणार नाही. बघितला आहे आपण राईचा दाणा? तेव्हा म्हणतात, घ्या, नाही बघितला राईचा दाणा ? एका राईचा दाणा इतकं फरक होणार नाही आणि बघा, लोकं कंबर कसून, जेवढे जागू शकतात तेवढे जागत राहतात. शरीराला खेचून खेचून जागतात आणि मग तर हार्ट फेल ची तयारी करतात.
यांना किंमत कोणाचीं?
एक वृद्ध काका आले आणि माझ्या पायावर पडून खूप रडले. मी विचारले काय दुःख आहे आपल्याला? तेव्हा म्हणाले, माझे दागिने चोरीला गेलेत. मिळतच नाहीत. आता परत कधी मिळतील? तेव्हा मी त्यांना म्हणालो ते दागिने काय बरोबर घेऊन जाणार होते? तेव्हा म्हणतात नाही, बरोबर नाही घेउन जाऊ शकत. पण माझे दागिने जे चोरी झालेत, ते परत केव्हा मिळतील? मी म्हटले, 'आपण गेल्यानंतर येणार.' दागिने गेले त्यासाठी इतकी हाय हाय, अरे जे गेले त्यांची चिंता केलीच नाही पाहिजे. कदाचित पुढची चिंता, भविष्याची चिंता कराल, तर ते आम्ही समजतो कि, बुद्धिमान मनुष्याला चिंता तर असतेच, पण गेले त्यांची पण चिंता? आमच्या देशात अशी चिंता असते. क्षणभर पहिले होऊन गेले त्याची चिंता का ?