________________
चिंता
चिंतेचे परिणाम काय? या संसारात बाय प्रॉडक्टचा अहंकार असतोच आणि तो सहज अहंकार आहे. ज्याने संसार सहज चालेल असे आहे. तिथे अहंकाराचा कारखाना ऊभा केला आणि अहंकाराचा विस्तार केला आणि इतका विस्तार केला कि ज्याने खूपच चिंता झाली. अहंकाराचाच विस्तार केला. सहज अहंकाराने, नॉर्मल अहंकाराने संसार चालतो असे आहे. पण तिथे अहंकाराचा विस्तार करून परत काका या वयात सांगतात कि, 'मला चिंता वाटते.' त्या चिंतेचा परिणाम काय? पुढे जनावराची गती होईल. म्हणून सावधान व्हा. आता सावधान होण्यासारखे आहे. मनुष्यात आहात तोपर्यंत सावधान व्हा, नाहीतर चिंता असेल तिथे तर जनावरगती चे फळ येईल.
भक्त तर भगवंताला ही धमकावतो भगवंताच्या खरा भक्ताला जर चिंता असेल तर तो भगवंताला ही धमकावतो. 'हे भगवान! आपण मना करता आहात, तरी पण मला चिंता का होते?' जो भगवंता बरोबर लढत नाही, तो खरा भक्त नाही. जर एखादी उपाधी आली, तर आपल्या आत भगवान बसला आहे, त्याला तंबी देवून धमकवा. भगवंतालाही धमकावतो, तेच खरे प्रेम म्हटले आहे. आज तर भगवंताचा खरा भक्त मिळणे देखिल मुश्किल आहे. सगळे जण आपापल्या स्वार्थात राहतात.
श्री कृष्ण भगवान म्हणतात, 'जीव तू काहे सोच करे, कृष्ण को करना हो सो करे'
तेव्हा ही लोकं काय म्हणतात? कृष्ण भगवान तर सांगतात, पण हा संसार चिंता केल्याशिवाय थोडाच चालणार? म्हणून लोकांनी चिंतेचे कारखाने खोलले आहेत. तो माल ही विकला नाही जात. कसा विकला जाणार? जिथे विकायला जाणार, तिथे पण तसा कारखाना तर असणारच, या संसारात एकतरी मनुष्य असा शोधून आणा कि, ज्याला चिंता नाही होत.