________________
२४
चिंता
समजतो कि, माझ्यामुळे चालते. असे समजून बसतो. म्हणून ह्या भानगडीत पडण्यासारखे नाही आणि आहे पण असेच. हा तर सगळ्या माणसांना रोग लागला आहे. आता ह्यातून लवकर कसे निघणार? लवकर निघतायेत नाही ना. सवय होऊन गेली आहे, ती जाणार नाही ना. हेबिच्युएटेड ( सवयीने मजबूर).
ना.
प्रश्नकर्ता : आपल्याजवळ आले तर निघून जातात ना?
दादाश्री : हा, निघतात पण हळु हळु निघतात, पटकन नाही निघत
परसत्ता हातात घेतली, तिथे चिंता होणार आपले कसे आहे? कधी उपाधी होते? कधी चिंता होते ? प्रश्नकर्ता : माझ्या मोठ्या मुलीचे लग्न ठरत नाही, म्हणून उपाधी होते.
दादाश्री : आपल्या हातात असेल तर उपाधी करा ना, पण ही गोष्ट आपल्या हातात आहे ? नाही. तर मग उपाधी का करता? तेव्हा काही ह्या सेठजीच्या हातात आहे ? ह्या बहिणीच्या हातात आहे ?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : मग कोणाच्या हातात आहे ? हे जाणल्या शिवाय आम्ही उपाधी करतो, हे कशा समान आहे कि टांगा (घोडागाडी) चालतो आहे, त्यावर आम्ही दहा लोकं बसलो आहोत, आता त्याला चालवणारा चालवत आहे आणि आत आम्ही आरडाओरड करतो कि, 'ए असे चालव, ए असे चालव' तर काय होईल? जो चालवतो त्याला बघा ना ! 'कोण चालवणारा आहे' हे जाणले तर आपल्याला चिंता नाही होणार. आपण रात्रं-दिवस चिंता करता? कुठपर्यंत करणार? त्यांचा अंत कधी येणार? हे मला सांगा.
ही बहिण तर आपले (नशीब ) घेऊन आली आहे, काय आपण आपले नाही घेऊन आलेलात? हे सेठजी आपल्याला मिळाले कि नाही