________________
चिंता मिळाले? जर सेठजी आपल्याला मिळाले, तर ह्या बहिणीला का नाही मिळणार? आपण जरा धीर धरा. वीतराग भगवानांच्या मार्गात आहात आणि असा धीर नाही धरलात तर त्याने आर्तध्यान होईल, रौद्रध्यान होईल.
प्रश्नकर्ता : असे नाही पण स्वाभाविक काळजी लागणार ना?
दादाश्री : नाही स्वाभाविक काळजी, ह्यालाच आर्तध्यान आणि रौद्रध्यान म्हणतात. आत आत्म्याला पीडा (दुःख) पोहोचवले आपण. अन्य कोणाला दु:ख नाही पोहोचवत ते ठीक, पण ही तर आत्म्याला दु:ख पोहोचवले.
चिंतेने बांधतात, अंतराय कर्म चिंता केल्याने तर अंतराय कर्म होते आणि कार्याला विलंब होतो. आपल्याला कोणी सांगितले कि अमुक जाग्यावर मुलगा आहे, तर आपण प्रयत्न करावा. चिंता करण्यास भगवंताने मना केले आहे. चिंता केल्याने तर अधिक अंतराय होतो. आणि वीतराग भगवंताने काय सांगितले आहे कि, 'भाऊ जर आपण चिंता करता तर मालक आपणच आहात का? आपणच दुनिया चालवता? असे पाहिले तर कळेल कि स्वत:ला संडासला जाण्याची सुद्धा स्वतंत्र शक्ति नाही. ते जेव्हा बंद झाले तेव्हा डॉक्टर बोलवावा लागतो. तोपर्यंत ती शक्ति आमची आहे, असे आपल्याला वाटते. पण ती शक्ति आपली नाही आहे. ती शक्ति कोणाच्या आधीन आहे, ही सगळी जाणकारी नको का ठेवायला?
ह्याचा चालवणारा कोण असेल? बहिण, आपण तर जाणत असाल? हे सेठजी जाणत असतील? कोण असेल चालवणारा, कि आपण चालवणारे आहात?
चालवणारे संयोग
कर्ता कोण आहे? हे संयोग कर्ता आहे. हे सारे संयोग, सायन्टिफिक