Book Title: Chinta
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 38
________________ २९ चिंता आमच्या आज्ञेत रहा आणि एक चिंता असेल तर दावा दाखल करायची सूट दिलेली आहे. आमच्या आज्ञेत रहा. इथे सगळं मिळेल असे आहे. ह्या सगळ्याना शर्त काय ठेवली आहे माहित आहे तुम्हाला? एक चिंता असेल तर माझ्यावर दोन लाखाचा दावा दाखल करा. प्रश्नकर्ता : आपल्याकडून ज्ञान मिळाले, मन-वचन-काया आपल्याला अर्पण केली, मग चिंताच नाही राहत. दादाश्री : राहणारच नाही. चिंता गेली, त्याचे नांव समाधि. त्याने मग पहिल्यापेक्षा जास्त काम होईल. कारण गुंतागुंती नाही ना राहणार मग, हा ऑफिसला जाऊन बसला कि काम होते. घरातील विचार नाही येत. बाहेरील विचार नाही येत. कुठल्याही प्रकारचे विचार नाही येत आणि संपूर्ण एकाग्रता राहते. वर्तमानात राहतो ते च खरं लोकांना तीन वर्षाची एक मुलगी असेल तर मनात असे येते कि ही मोठी झाली कि तिचे लग्न केले पाहिजे. त्याला खर्च होणार. असी चिंता करायला नाही सांगितले. कारण जेव्हा तिचा टाईम येणार, तेव्हा सारे एविडन्स (संयोग) एकत्र होणार. म्हणून टाईम येईपर्यंत आपण त्यात हात घालू नका. आपण आपल्या परीने मुलीला खायला-प्यायला द्या, शिकवा, पण पुढची सारी चिंता नका करू, वर्तमानवर नजर ठेवून, आजच्या दिवसापूरता व्यवहार करा. भूतकाळ पाठी गेला. जो आपला भूतकाळ आहे त्याला का उखडता? नाही उखाडत ना. भूतकाळ मागे गेला. त्याला कोणी मूर्ख मनुष्य सुद्धा नाही उखडत. भविष्य व्यवस्थितच्या हातात आहे. तर मग वर्तमानातच रहा. आता चहा पीता तर आरामात चहा प्या. कारण भविष्य 'व्यवस्थित शक्तिच्या हातात आहे. आपल्याला काय झंझट? म्हणून वर्तमानातच रहा, जेवण जेवते वेळी जेवणात पूर्ण चित्त ठेवून खा. पकौडे कशाचे बनवले आहेत, हे सगळे आरामात जाणून घ्या. वर्तमानात

Loading...

Page Navigation
1 ... 36 37 38 39 40 41 42