________________
चिंता
'व्यवस्थित शक्ति'चे ज्ञान तिथे चिंता गायब
प्रश्नकर्ता : 'व्यवस्थित शक्ति'चे ज्ञान जर अगदी बरोबर समजले, तर चिंता किंवा टेन्शन काहीच राहणार नाही?
दादाश्री : जराही नाही रहात. 'व्यवस्थित' म्हणजे सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स. 'व्यवस्थित' तोपर्यंत समजून घ्या कि शेवटचे 'व्यवस्थित'चे ज्ञान, 'केवळज्ञान' उत्पन्न करेल. आणि 'व्यवस्थित' समजले तर केवळज्ञान समजून जाल. हा 'व्यस्थित'चा शोध आपला किती सुंदर आहे ! हा गजबचा शोध आहे !
अनंत अवतारांपासून संसार कोण ऊभा करत होता! कर्ता बनून राहिलात त्याची चिंता !
प्रश्नकर्ता : या 'ज्ञाना'मुळे आता मला भविष्याची चिंता नाही होत.
दादाश्री : आपण तर 'हे व्यवस्थित आहे' असे सांगाल ना. 'व्यवस्थित' आपल्याला समजले ना ! काही परिवर्तन होणार नाही. सारी रात्र जागून, दोन वर्षानंतर चे विचार कराल न, तर ते यूजलेस (व्यर्थ) विचार आहेत, वेस्ट ऑफ टाईम एन्ड एनर्जी (वेळ आणि शक्तिचा दुरुपयोग) आहे.
प्रश्नकर्ता : आपण जे 'रियल' आणि 'रिलेटिव' समजावले त्या नंतर चिंता नाही राहिली.
दादाश्री : नंतर चिंताच नाही रहात ना ! या ज्ञानानंतर चिंता राहिल असे होणारच नाही. हा मार्ग संपूर्ण वीतराग मार्ग आहे. संपूर्ण वीतराग मार्ग म्हणजे काय, कि चिंता नाही होत. हा तमाम आत्मज्ञानीयांचा, चोवीस तीर्थंकरांचा मार्ग आहे. हा दुसरा कोणाचा मार्ग नाही.
__- जय सच्चिदानंद