Book Title: Chinta
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 32
________________ चिंता चिंता करतो. आणि बायको मुलं सगळे भागीदार आहेत, ते तर काही जाणतच नाहीत. आता ते काही जाणत नाहीत, तरी त्यांचे चालते. तर मी एकटाच कमी अक्कलेचा आहे का, जो ह्या साऱ्या चिंता घेऊन बसलो आहे ! मग मला अक्कल आली. कारण ते सगळे भागीदार असून ही चिंता नाही करत, तर मग काय मी एकटाच चिंता करत राहू? विचार करा, पण चिंता नका करू चिंता म्हणजे काय? हे समजून घेतले पाहिजे कि मनात असे विचार येतात. आपल्याला कुठल्याही बाबतीत, धंद्या संबंधी किंवा इतर बाबतीत, किंवा काही आजार असेल आणि मनात विचार आले, काही हद्दीपर्यंत, येतात. नंतर ते विचार आपल्याला भोवऱ्यात टाकतात आणि चक्कर चालु झाले तर समजा कि, हा उलटा रस्ता चढला आहे, म्हणून बिघडले. तिथून मग परत चिंता सुरू होते. विचार करायला हरकत नाही, पण विचार म्हणजे काय? एकदा विचार चालु झाले आणि ते अमुक हद्दीवर पहोंचले त्याला चिंता म्हणतात. हद्दीत राहून विचार करायचे. विचाराची नॉर्मालिटी काय? आत पीळ लागत नाही तिथपर्यंत. पीळ लागली कि बंद करून टाकायचे. पीळ लागली कि चिंता सुरू होते. ही आमची शोध आहे. चिंता करायचा अधिकार नाही विचार करायचा अधिकार आहे, कि भाऊ, इथपर्यंत विचार करा. आणि विचार जेव्हा चिंतेत परिवर्तित होतात तर बंद केले पाहिजेत. हे एबाव नॉर्मल विचार त्याला चिंता म्हणतात. म्हणून आम्ही पण विचार करतो पण एबाव नॉर्मल झाले आणि ढवळायला लागले पोटात, तेव्हा बंद करतो. प्रश्नकर्ता : सहज आत बघतो तो पर्यंत विचार म्हणतात, आणि आत चिंता वाटली तर लपेटले गेले म्हणतात. दादाश्री : चिंता झाली म्हणजे लपेटलेच ना. चिंता होते म्हणजे तो

Loading...

Page Navigation
1 ... 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42