________________
चिंता चिंता करणाऱ्याला दोन दंड भगवान म्हणतात कि चिंता करणाऱ्याला दोन दंड आहेत आणि चिंता नाही करणाऱ्याला एकच दंड आहे. अठरा वर्षाचा एकुलता एक मुलगा मेला, त्याच्या मागे जितकी चिंता करता, जितके दुःखी होता, डोकं फोडता, आणि जे काही करता, त्यांना दोन दंड आहेत. आणि हे सगळे नाही केले तर एकच दंड आहे. मुलगा मेला इतकाच दंड आहे आणि डोके फोडले हा विशेष दंड आहे. आम्ही ह्या दुप्पट दंडात कधी नाही येत. म्हणून आम्ही या लोकांना सांगितले आहे कि पांच हजाराचा खिसा कापला तेव्हा 'व्यवस्थित शक्ति' (अर्थात् रिझल्ट ऑफ सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स. म्हणजे च वैज्ञानिक संयोगिक पुरावे एकत्र होऊन आलेला परिणाम) आहे, म्हणून पुढे चला आणि आरामात घरी जा.
हा एक दंड आमचा स्वत:चा हिशोब आहे, म्हणून घाबरण्याचे काही कारण नाही. म्हणून झाले, त्याला तर 'झाले ते खरं' असे म्हणा.
ज्याची चिंता ते कार्य बिघडते निसर्ग काय सांगते कि कार्य नाही होत तर प्रयत्न करा पण चिंता करू नका. कारण चिंता केल्याने त्या कार्याला धक्का पोहोचतो आणि चिंता करणारा स्वतः लगाम आपल्या हातात घेतो. 'जणू काही मीच चालवतो. असा लगाम आपल्या हातात घेतो. त्याचा गुन्हा लागू होतो.
परसत्ता वापरल्याने चिंता होते. विदेशातील कमाई विदेशातच राहते. हे मोटर बंगले, कारखाने, बायको, मुले सगळे इथेच सोडून जावे लागेल. त्या शेवटच्या स्टेशनवर तर कोणाच्या बापाचे चालणार नाही. फक्त पुण्य आणि पाप बरोबर नेऊ देतील. दुसऱ्या साध्या भाषेत सांगायचे तर, इथे जे गुन्हे केलेत त्याची कलमे बरोबर येईल. गुन्हयाची कमाई इथेच राहिल आणि मग खटला चालेल. तेव्हा धाराच्या अनुसार नवीन शरीर प्राप्त करून, नवीन कमाई करून कर्ज फेडावे लागेल. म्हणून वेड्या, पहिलापासूनच