________________
चिंता
चिंता जाई तेव्हा पासून समाधी चिंता नाहीतर खरोखर गुंता सुटला. चिंता नाही, वरिझ नाहीत आणि उपाधी मध्ये समाधी राहिली तर समजा खरेच गुंता सुटला.
प्रश्नकर्ता : अशी समाधी आणायची म्हटली तरी नाही येत.
दादाश्री : ती तर अशी आणून नाही येत. ज्ञानी पुरूष गुंता सोडून देईल, सगळे शुद्ध करून देईल, तेव्हा निरंतर समाधी राहते. जर चिंता नाही असे जीवन असेल, तर चांगले म्हटले जाईल ना?
प्रश्नकर्ता : ते तर चांगलेच म्हटले जाईल ना.
दादाश्री : आम्ही चिंता रहित लाइफ बनवून देऊ. मग आपल्याला चिंता नाही राहणार. या काळातील हे एक आश्चर्य आहे. या काळात असे नाही होत, पण पाहा हे झाला आहे ना!
स्वतः परमात्मा, मग चिंता का? फक्त गोष्ट समजायची आहे. आपणही परमात्मा आहात, भगवानच आहात. मग कशासाठी वरिझ (चिंता) करायची? चिंता का करता? एक क्षणभर ही चिंता करण्यासारखा हा संसार नाही. चिंतेने तो आता सेफ साईड नाही राहू शकत, कारण जी सेफ साईड नेचरल होती, त्यात तुम्ही गुंतागुंती निर्माण केली. मग आता चिंता का करता? गुंता झाल्यावर त्याचा सामना करा आणि सोडवा.
प्रश्नकर्ता : जर आपण प्रतिकूलतेचा सामना केला, त्याचा विरोध केला, प्रतिकार केला, तर त्याने अहंकार वाढेल?
दादाश्री : चिंता करण्यापेक्षा सामना करणे चांगले. चिंतेच्या अहंकारापेक्षा, प्रतिकाराचा अहंकार छोटा आहे. भगवानने सांगितले आहे कि, 'अशा परिस्थितीत सामना करा, उपाय करा, पण चिंता करू नका.'