________________
२०
चिंता सत्तेत नाहीत, त्याचे चित्रण नका करू. मागील अवतारात दोन-तीन मुली होत्या, मुलगे होते. त्या सगळ्यांना इतके छोटे छोटे सोडून आलात, तेव्हा त्या सगळ्याची चिंता करता? आणि असे मरतेवेळी खूप चिंता होते ना, कि छोट्या मुलीचे काय होईल? पण इथे पुन्हा जन्म घेता तर मागच्या जन्माची काही चिंताच नाही ना. पत्र-बित्र काहीच नाही. अर्थात् ही सारी परसत्ता आहे, त्यात हातच नका टाकु. म्हणून जे होईल ते, व्यवस्थित मध्ये असेल तर असू दे, नसेल तर नसू दे.
चिंता करण्यापेक्षा धर्माकडे वळा प्रश्नकर्ता : घरात जी प्रमुख व्यक्ति असते त्यांना जी चिंता असते, ती कशी दूर करावी?
दादाश्री : कृष्ण भगवानने काय सांगितले आहे कि, 'जीव तू काहे सोच करे कृष्णको करना हो सो करे'. असे वाचनात आले आहे? तर मग चिंता करायची काय जरूरत आहे?
म्हणून मुलांना घेऊन क्लेश काय करता? धर्माच्या मार्गावर वळवा त्यांना, सुधरतील ते.
काही तर, व्यवसायाला घेऊन चिंता करतच असतात, ते का चिंता करतात? मनात असे येते कि, 'मी चालवतो.' म्हणून चिंता होते. 'तो चालवणारा कोण आहे' ह्याचे जरा सुद्धा, कुठल्याही प्रकारी अवलंबन घेत नाही. भले ही तू ज्ञानाने नाही जाणत, पण दुसऱ्या कुठल्याप्रकारे अवलंबन घे! कारण तू नाही चालवत आहे असे, थोडेफार तुझ्या अनुभवात तर येते ना. चिंता तर सगळ्यात मोठा इगोइझम आहे.
अधिक चिंतावाले कोण? प्रश्नकर्ता : रोजची दोन वेळची रोटी मिळत नाही, त्याला तर रोजची चिंता राहणारच ना कि, उद्या काय करायचे? उद्या काय खायचे?