________________
१९
चिंता करण्याची वेळ आली आहे, आणि तेव्हापासून तिच्यासाठी प्रयत्न करत रहा. हे तर आजूबाजूचे काही म्हणत नाहीत आणि त्या आधीच, पंधरा वर्ष पहिलेच चिंता करू लागतात. परत आपल्या पत्नीला ही सांगतो कि, तुझ्या लक्षात राहिल कि आपली मुलगी मोठी होत आहे आणि लग्नाची आहे? आता बायकोला का चिंता करायला लावता?
अ-वेळेची चिंता सतरा वर्ष आधी मुलीच्या लग्नाची चिंता करतो, तर मरण्याची चिंता का नाही करत? तेव्हा म्हणाले कि, 'नाही मरण्याची आठवण नकोच करू' तेव्हा मी विचारले कि, मरण्याची आठवण करण्यात काय हरकत आहे? आपण नाही मरणार का? तेव्हा म्हणतात कि, 'जर मरणाची आठवण केली तर, आजचे सुख निघून जाते आणि आजचा आपला स्वाद बिघडून जातो.' तेव्हा मुलीच्या लग्नाची का आठवण करतो? तेव्हा पण तुझा स्वाद निघून जाईल ना? आणि मुलगी आपले लग्नाचे सगळे घेऊन आली आहे. आईवडील तर त्यात निमित्त आहेत. मुलगी आपल्या लग्नाची सगळी साधनं घेऊन आलेली असते. बँक बॅलेन्स, पैसे सगळे घेऊन आलेली आहे. कमी किंवा अधिक जितका खर्च असेल ती एक्झेक्टली (निश्चतरूपाने) सगळे घेऊन आलेली असते.
मुलीची चिंता आपण नाही केली पाहिजे. आपण मुलीचे पालक आहात. मुलगी स्वत:साठी मुलगा पण घेऊन आलेली असते. आपल्याला कोणाला सांगायला जायची गरज नाही कि, मुलगा जन्माला घाला. आमची मुलगी आहे. तिच्यासाठी मुलगा जन्माला घाला, असे सांगायला जावे लागते? अर्थात् सारे सामान तयार घेऊन आलेली असते. तेव्हा वडील म्हणतील, 'ही पंचविशीची झाली, आतापर्यंत तिचा ठिकाणा नाही लागत. असे आहे, तसे आहे.' तो संपूर्ण दिवस गात राहतो. अरे, तिथे मुलगा सत्तावीसचा झालाय, पण तुला नाही मिळाला, तर आरडाओरड का करतो? झोप ना चुपचाप ! मुलगी आपला टाईमिंग वगैरे चा प्रबंध करून आली आहे.