________________
चिंता सोडला पाहिजे. नवीन दुसरा सत्संग शोधा, तिसऱ्या सत्संगात जा. सत्संग अनेक प्रकारचे असतात, पण सत्संगाने चिंता गेली पाहिजे. आपण दुसऱ्या कुठल्या सत्संगात नाही गेलात?
प्रश्नकर्ता : पण आम्हाला असे सांगितले गेले आहे कि भगवान आपल्या आत आहे. शांति आपल्याला आतच मिळेल, बाहेर भटकणे बंद करा.
दादाश्री : हां, बरोबर आहे.
प्रश्नकर्ता : पण आत जो भगवान बसला आहे, त्याचा जराही अनुभव नाही होत.
दादाश्री : चिंतेत अनुभव नाही होत. चिंता असल्यावर अनुभव आला असेल तो पण निघून जाईल. चिंता तर एक प्रकारचा अहंकार म्हटला जातो. भगवान सांगतात कि 'तू अहंकार करतोस, तर निघून जा माझ्याजवळून' ज्याला 'हे मी चालवतो' असा अहंकार आहे, तोच चिंता करतो ना. भगवानवर जराही विश्वास नाही, तोच चिंता करतो.
प्रश्नकर्ता : भगवानवर विश्वास तर आहे.
दादाश्री : विश्वास आहे तर असे करणार नाही. भगवानच्या भरोसावर सोडून, सुखाने झोपा. मग चिंता कोण करणार? म्हणून भगवान वर भरोसा करा. भगवान आपल्याला थोडेफार सांभाळत असलेच ना? आत जेवण टाकले, नंतर मग चिंता करता का? पाचक रस पडला कि नाही, पित्त पडले कि नाही, याचे रक्त बनणार कि नाही. याचा संडास होणार कि नाही, अशा सर्व चिंता करतात? अर्थात हे आतलेच सर्व काही चालवायचे आहे बाहेर कुठे काही चालवायचे आहे, कि त्याची चिंता करत आहात? मग भगवानला वाईटच वाटणार ना. अहंकार केला तर चिंता होणार. चिंता करणाऱ्या मनुष्याला अहंकारी म्हणतात. एक सप्ताह भगवंतावर सोडून चिंता करणे बंद करा. मग इथे एखादे दिवशी भगवानचा साक्षात्कार करून देईल, तर नेहमीसाठी चिंता मिटून जाईल.