________________
चिंता नेहमी चिंतेने सगळे बिघडते. चिंतेने मोटार चालवली तर टक्कर होईल. चिंतेने व्यापार केलात, तर तिथे कार्य विपरीत होईल. चिंतेने संसारात हे सगळे बिघडले आहे.
चिंता करण्यासारखे संसार नाहीच. या संसारात चिंता करणे ही बेस्ट फूलिशनेस (सर्वोत्तम मूर्खता) आहे. संसार चिंता करण्यासाठी नाहीच. हे इटसेल्फ क्रिएशन (स्वयं निर्मित) आहे. भगवंताने हे क्रिएशन (निर्माण) नाही केले. म्हणून चिंता करण्यासाठी हे क्रिएशन नाही. ही माणसे एकटेच चिंता करतात, अन्य कोणी जीव चिंता नाही करत. अन्य चौर्यांशी लाख योनि आहेत. पण कोणी चिंता नाही करत. हे मनुष्य नामक जीव जो दिढ शहाणे आहेत, ते सारा दिवस चिंतेत जळत राहतात.
चिंता तर प्यॉर इगोइझम (केवल अहंकार) आहे. ही जनावरे कोणी चिंता नाही करत आणि या मनुष्याला चिंता? ओहोहो, अनंत जनावरे आहेत, कोणाला चिंता नाही आणि मनुष्य एकटाच मूर्खासारखा सारा दिवस चिंतेत जळत राहतो.
प्रश्नकर्ता : जनावरापेक्षाही खाली ऊतरले?
दादाश्री : जनावरे तर कितीतरी पटीने चांगली आहेत. जनावरांना भगवंताने आश्रित म्हटले आहे. या संसारात जर कोणी निराश्रित आहे, तर तो एकटा मनुष्यच आहे आणि त्यातही हिंदुस्थानातील मनुष्य शत प्रतिशत निराश्रित आहे, मग त्यांना दुःखच होणार ना ! कि ज्यांना कुठल्याही प्रकारचा आसरा च नाही.
मजदूर चिंता नाही करत आणि शेठ लोक चिंता करतात. एकही मजूर चिंता नाही करत, कारण मजूर उच्च गतीला जाणार आहे आणि शेठ लोकं खालच्या गतीला जाणार आहेत. चिंतेने खालची गती येते, म्हणून चिंता नाही झाली पाहिजे.
फक्त वरिझ, वरिझ, वरिझ. रताळे भट्टीत भाजतात तसा संसार भाजत