________________
१३
चिंता इतक्या माझ्या गरजा आहेत, जसे घरात खाणे-पीणे पुरे से पाहिजे, रहायला घर पाहिजे, घर चालविण्या इतकी पर्याप्त लक्ष्मी पाहिजे. तर इतके तुला अवश्य प्राप्त होईलच. पण जर शेजाऱ्याचे पन्नास हजार बँकेत पडले आहेत, तर तुझ्या मनात खटकत राहिल. अशी दु:ख निर्माण होतात. दुःखाला स्वत:च निमंत्रण देत आहे.
जगण्याचा आधार, अहंकार
जर पैसे खूप यायला लागले ना, तर च व्याकुळ होणार, चिंतित होईल. हा अहमदाबादच्या मिलवाले शेठांचा तपशील सांगितला तर आपल्याला वाटेल कि हे भगवान, ही दशा एक दिवसासाठी सुद्धा नको देवु. सारा दिवस रताळे भट्टीत ठेवले असेल, अशाप्रकारे भाजत राहतात. कशाच्या आधारे जगतात? मी एका शेठजीना विचारले, 'कशाच्या आधारे जगता?' तेव्हा म्हणाले, 'हे तर मी सुद्धा जाणत नाही.' तेव्हा मी सांगितले, 'सांगू? सगळ्यात मोठा तर मीच आहे ना! बस, या आधारावर जगता.' बाकी काही सुख नाही मिळत.
नका करू अप्राप्तची चिंता अहमदाबादचे काही शेठ भेटले होते. माझ्याबरोबर भोजन घेण्यासाठी बसले होते. तेव्हा शेठाणी समोर येऊन बसली. मी विचारले 'शेठाणीजी, आपण का समोर येऊन बसलात?' तर बोलली, एक दिवसही शेठजी ठीक भोजन नाही करत. तेव्हा मी समजून गेलो, आणि जेव्हा मी शेठजीना विचारले, तेव्हा बोलले, माझे सारे चित्त तिथे (मिल)मध्ये जाते. मी सांगितले, असे नका करू. वर्तमानात थाळी आली तिला प्रथम, अर्थात् प्राप्त भोगा, अप्राप्तची चिंता नका करू. जे प्राप्त वर्तमान आहे तो भोगा.
चिंता होते तर मग, जेवण घेण्यास स्वयंपाक घरात जायला लागेल? मग बेडरूम मध्ये झोपायला जायला लागेल? आणि ऑफिसमध्ये कामावर?..