Book Title: Bhavna Sudhare Janmo Janm Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ नव कलमांच्या नजीकच्या भावना भावलेल्या त्यामुळे, ते आजच्या ह्या लिंकमध्येच परिणमून लागलीच आता वर्तनात आणतात. कोणतीही सिद्धि प्राप्त करायची असेल तर त्या साठी मात्र स्वता:च्या आत असलेल्या भगवान जवळ शक्ति माग माग करत राहावे, जे निश्चितपणे फळ देतातच. पूज्य दादाश्री स्वताः साठी म्हणतात की 'हे नव कलमे आम्ही जीवनभर पाळत आलो, तर ही पूंजी आहे आमची.अर्थात् हा आमचा रोजचा माल, तो मी बाहेर ठेवला शेवटी. लोकांचे कल्याण व्हावे त्या करीता. निरंतर कित्येक वर्षांपासून, चाळीस, चाळीस वर्षांपासून ही नव कलमे दररोजच आत चालतच आहेत. ते पब्लिकसाठी मी जाहिर केले.' खूप साधकांना आत मान्यता दृढ होऊन जाते की मी ह्या नव कलमां सारखाच सर्व काही जाणतो आणि तसेच मला राहते. पण त्यांना विचारले की तुमच्यापासून कोणाला दु:ख होते? त्यांच्या घरच्यांना किंवा जवळच्यांना, विचारले तर ते हो म्हणतात. याचा अर्थ हाच की हे खरे जाणले नाही म्हणायचे. ते जाणलेले काम लागणार नाही. तिथे तर ज्ञानी पुरुषांनी स्वता:च्या जीवनांत जे सिद्ध केले असेल ते अनुभवगम्य वाणी द्वारा दिले असेल तर क्रियाकारी होईल. अर्थात् ती भावना ज्ञानी पुरुषांनी दिलेली डिझाईनपूर्वकची असायला पाहिजे, तरच कामी लागेल आणि मोक्षाच्या मार्गात स्पीडी प्रोग्रेस करविणार ! आणि शेवटी तेथ पर्यंत परिणाम येईल की स्वता:कडून कोणत्याही जीवाला किंचित्मात्र पण दुःख नाही होणार ! एवढेच नाही पण नव कलमांची भावना दररोज भावण्याने किती तरी दोषं धुतले जातात ! आणि मोक्ष मार्गात पुढे गति होते! - डॉ. नीरूबहन अमीन यांचे जय सच्चिदानंदPage Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54