Book Title: Bhavna Sudhare Janmo Janm
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 41
________________ भावना सुधारे जन्मोजन्म अहंकाराचे प्रमाण दुभावले, अशा प्रसंगी तेथे ही कलमे वापरायची की कोणाच्या पण अहम् चे प्रमाण नाही दुभावणार ... दादाश्री : तेव्हा तर आपण चंदूभाईला सांगावे की, 'भाऊ प्रतिक्रमण करा, त्याला दुःख झाले त्याबद्दलचे.' आणि इतर लहान-सहान बाबतीत तर झंझट नाही करायची. जर अहम् दुभावेल अशी खूप भारी लक्षणे नसतील, परंतु थोडे दुःख झाले असेल तर आपण प्रतिक्रमण करवून घ्यायचे. __ हे तर भावना भावायची आहे. अजून एक अवतार तर राहिला ना, तेव्हा ही भावना फळ देईल. तेव्हा तर भावनारूपच होऊन गेला असाल तुम्ही. जशी भावना लिहली आहे, तसेच वर्तन असेल, पण येत्या जन्मामध्ये ! आताच बी टाकले आणि आताच तुम्ही म्हणाल की 'आण, खोदून खाऊन टाकू आतून' ते नाही चालणार. प्रश्नकर्ता : परिणाम ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात येणार? दादाश्री : होय, अजून एक-दोन अवतार राहिले आहेत बाकी, तेवढ्यासाठी हे बी टाकत आहे. तर ते पुढच्या जन्मामध्ये 'क्लिअर येईल.' हे तर बी टाकायचे असेल त्यांच्यासाठी आहे. प्रश्नकर्ता : तर हे निरंतर म्हणजे जेव्हा जेव्हा प्रसंग येईल त्या प्रमाणे? दादाश्री : नाही, त्या प्रसंगाला आणि भावनाला काही घेणे-देणे नाही. प्रसंग निराधार आहे बिचारा ! आणि ह्या भावना तर आधारी वस्तु आहेत. ह्या भावना तर सोबत येणाऱ्या आहेत आणि प्रसंग तर जात राहतील. प्रश्नकर्ता : पण प्रसंगाच्या आधारानेच ही भावना करु शकतो ना? दादाश्री : नाही प्रसंगाला काही घेणे-देणे नाही. भावनाच सोबत येणारी. प्रसंग हे निराधार आहेत, ते जात राहणारे आहेत. कसा ही चांगला

Loading...

Page Navigation
1 ... 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54