Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान प्ररुपित
भावना सुधारे जन्मोजन्म
(नऊ कलमे सार सर्व शास्त्रांचा)
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
MROGRAM
CIAH
दादा भगवान प्ररूपित
भावना सुधारे जन्मोजन्म (नव कलमे - सार तमाम शास्त्रांचा)
मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबेन अमीन
अनुवाद : महात्मागण
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक : अजित सी. पटेल
महाविदेह फाउन्डेशन दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८० ०१४, गुजरात. फोन - (०७९) २७५४०४०८
All Rights reserved - Mr. Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Post - Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India.
प्रथम संस्करण : ३०००
अगस्त २०१३
भाव मूल्य : ‘परम विनय' आणि
'मी काहीच जाणत नाही', हा भाव! द्रव्य मूल्य : १२ रुपये
लेसर कम्पोझ : दादा भगवान फाउन्डेशन, अहमदाबाद.
मुद्रक
: महाविदेह फाउन्डेशन पार्श्वनाथ चेम्बर्स, नव्या रिज़र्व बँकेच्या जवळ, उस्मानपुरा, अहमदाबाद-३८० ०१४. फोन : (०७९) २७५४२९६४, ३०००४८२३
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
त्रिमंत्र
વર્તમાનતીર્થંકર - શ્રી સીમંધરસ્વામી नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो, सव्व पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसिं,
पढमं हवइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २
ॐ नमः शिवाय ३ जय सच्चिदानंद
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण?
जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनावर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य ! एक तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण? भगवान कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले! आणि जगातील सर्व अध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशा प्रकारे निसर्गाने विश्वला प्रदान केले एक अद्वितीय, पूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरी ही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमाणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोग द्वारा. त्याला अक्रम ( क्रमविरहीत ) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढण्याचे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट !!
ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे की, 'हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत । हे तर ए. एम. पटेल आहे. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत। ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि 'इथे' संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वताः परमेश्वर नाही । माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' त्यांना मी पण नमस्कार करतो. '
व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडून ही पैसे घेतले नाहीत, उलट स्वता:चा व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे की नाही! नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा की नाही?
- दादाश्री परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुसऱ्या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)ना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आता पर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याच बरोबर पूज्य दीपकभाईनां ही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे. ___हे आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणता चा अनुभव करत आहेत.
पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्ति हेतू साठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेटून आत्मज्ञानची प्राप्ति करेल तेव्हांच हे शक्य आहे. पेटलेला दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन
आत्मज्ञानी श्री अंबालाल मुळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण ‘दादा भगवान'च्या नावांनी ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्व साठी जी वाणी निघाली, ती रेकोर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथाच्या रुपात प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानच्या स्वमुखा ने निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्या वर त्याला आत्मसाक्षात्कारची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहे.
ते‘दादा भगवान' तर त्यांच्या देहात असलेले परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे.
प्रस्तुत अनुवाद मध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे कि प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादाची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा.
ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थ रुपाने अनुवादित करायचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानचा खरा उद्देश 'जसा आहे तसा ' आपल्याला गुजराती भाषेत अवगत होणार. ज्याला ज्ञानाचा गहन अर्थ समजायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी, असा आमचा अनुरोध आहे.
अनुवाद संबंधी चुकांसाठी आपली क्षमा प्रार्थितो.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय
सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात, व्यवहारत किंवा बाहेर लोकांकडून ऐकण्यास मिळतच असते की असं नाही करायचे तरी होऊनच जाते ! असं करायचे आहे पण होत नाही ! भावना खूप आहे, करण्याचा दृढ निश्चय ही आहे, प्रयत्न पण आहे, परंतु होत नाही !
तमाम धर्म उपदेशकांची साधकांसाठी कायमची तक्रार असते की आम्ही जे सांगतो ते तुम्ही पचवत नाही. श्रोते पण हताशाने गोंधळतात की इतके इतके धर्माचे करुन सुद्धा का वर्तनात येत नाही? ह्याचे रहस्य काय? कुठे अडकले आहे? कशा प्रकारे ह्या चुकांचे निरसन होऊ शकेल?
परम पूज्य दादाश्रींनी ह्या काळाच्या माणसांची केपसिटी (क्षमता) पाहून त्यांच्या योग्यतानुसार ह्याचा उलगडा एक नव्याच रीतीने अगदी वैज्ञानिक पद्धतिने दिला आहे. पूज्य दादाश्रींनी वैज्ञानिक स्पष्टीकरण केले की वर्तन हे परिणाम आहे, ईफेक्ट आहे आणि भाव हे कारण आहे, कॉझ आहे. परिणाम मध्ये सरळ-सरळ बदल आणता येणारच नाही. ते पण त्याच्या वैज्ञानिक तऱ्हेनेच होणार. जर कारण बदल केले तर परिणाम आपणाहूनच बदलून येणार ! कारण बदल करायला आता ह्या जन्मांत नव्याने भाव बदल करावा. ते भाव बदल करायला पूज्यश्रींनी नव कलमें भावण्याचे शिकविले आहे. तमाम शास्त्र उपदेश देतात तरीही ते परिणमत नाही, त्यांचा सार पूज्यश्रींनी नव कलमांच्या द्वारा मुळापासून बदल करण्याची चावी रूपाने दिले आहे. ज्याला अनुसरून लाखो लोकांनी ह्या जीवनाचे तर खरच पण जन्मोजन्माचे सुधारून घेतले आहे ! खरोखर रीतीने तर ह्या जन्मांत बाह्य बदल होत नाही पण ह्या नव कलमांची भावना भावण्याने आतमधील नवीन कारणे मुळापासून बदलून जातात आणि आंतरशांति जबरदस्त राहते ! दूसरयाचे दोष पाहणे बंद होते, जे परमशांति मिळवण्याचे परमरकारण बनून जाते ! आणि त्यातही बहुतेकांनी तर पूर्वी
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
नव कलमांच्या नजीकच्या भावना भावलेल्या त्यामुळे, ते आजच्या ह्या लिंकमध्येच परिणमून लागलीच आता वर्तनात आणतात.
कोणतीही सिद्धि प्राप्त करायची असेल तर त्या साठी मात्र स्वता:च्या आत असलेल्या भगवान जवळ शक्ति माग माग करत राहावे, जे निश्चितपणे फळ देतातच.
पूज्य दादाश्री स्वताः साठी म्हणतात की 'हे नव कलमे आम्ही जीवनभर पाळत आलो, तर ही पूंजी आहे आमची.अर्थात् हा आमचा रोजचा माल, तो मी बाहेर ठेवला शेवटी. लोकांचे कल्याण व्हावे त्या करीता. निरंतर कित्येक वर्षांपासून, चाळीस, चाळीस वर्षांपासून ही नव कलमे दररोजच आत चालतच आहेत. ते पब्लिकसाठी मी जाहिर केले.'
खूप साधकांना आत मान्यता दृढ होऊन जाते की मी ह्या नव कलमां सारखाच सर्व काही जाणतो आणि तसेच मला राहते. पण त्यांना विचारले की तुमच्यापासून कोणाला दु:ख होते? त्यांच्या घरच्यांना किंवा जवळच्यांना, विचारले तर ते हो म्हणतात. याचा अर्थ हाच की हे खरे जाणले नाही म्हणायचे. ते जाणलेले काम लागणार नाही. तिथे तर ज्ञानी पुरुषांनी स्वता:च्या जीवनांत जे सिद्ध केले असेल ते अनुभवगम्य वाणी द्वारा दिले असेल तर क्रियाकारी होईल. अर्थात् ती भावना ज्ञानी पुरुषांनी दिलेली डिझाईनपूर्वकची असायला पाहिजे, तरच कामी लागेल आणि मोक्षाच्या मार्गात स्पीडी प्रोग्रेस करविणार ! आणि शेवटी तेथ पर्यंत परिणाम येईल की स्वता:कडून कोणत्याही जीवाला किंचित्मात्र पण दुःख नाही होणार ! एवढेच नाही पण नव कलमांची भावना दररोज भावण्याने किती तरी दोषं धुतले जातात ! आणि मोक्ष मार्गात पुढे गति होते!
- डॉ. नीरूबहन अमीन यांचे जय सच्चिदानंद
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
(नव कलमे - सार तमाम शास्त्रांचा)
ह्याच्याने तुटतील अंतराय सर्व मी एक पुस्तक वाचायला देतो. मोठी पुस्तके वाचायला नाही देत. एक लहानच तुमच्यासाठी. थोडेसेच बोलून वाचा, थोडेसे असेच.
प्रश्नकर्ता : ठीक आहे.
दादाश्री : एक वेळा हे वाचून जा न ! सर्व वाचून जा. हे औषध देत आहे, ते वाचण्याचे औषध आहे. ही नव कलमे आहेत ती वाचायचीच आहेत, हे करण्याचे औषध नाही. बाकी तुम्ही जे करत आहात ते बरोबर आहे. पण हे तर भावना भावण्याचे औषध आहे म्हणून हे देत आहे ते वाचत रहा. याच्याने सर्व प्रकारचे अंतराय तुटून जातील.
म्हणून एक-दोन मिनिट आधी वाचून जा ही नव कलमे. प्रश्नकर्ता : नव कलमे... हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचित्मात्र पण अहम् नाही दुभावणार, नाही दुभावले जाणार की दुभावण्या प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या.
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचित्मात्र पण अहम् नाही दुभावणार, अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद
मनन करण्याची परम शक्ति द्या. २. हे दादा भगवान! मला कोणत्याही धर्माचे किंचित्मात्र पण प्रमाण
नाही दुभावणार, नाही दुभावले जाणार अथवा दुभावण्या प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही धर्माचे किंचित्मात्र पण प्रमाण नाही दुभावणार, अशी स्याद्वाद वाणी, स्यावाद वर्तन आणि स्याद्वाद मनन
करण्याची परम शक्ति द्या. ३. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी उपदेशक, साधु, साध्वी
की आचार्य यांचा अवर्णवाद, अपराध, अविनय न करण्याची परम शक्ति द्या. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्मा प्रति किंचित्मात्र पण अभाव, तिरस्कार कधीही नाही केला जाणार, नाही करविले जाणार की कर्ताचे प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या.
हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माशी कधीपण कठोरभाषा, तंतीली(टोचणारी) भाषा न बोलण्याची, न बोलावयाची की बोलण्या प्रति अनुमोदन नाही करण्याची अशी परम शक्ति
कोणी कठोरभाषा, तंतीलीभाषा बोलले तर मला मृदु-ऋजु भाषा बोलण्याची परम शक्ति द्या. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्मा प्रति स्त्री-पुरुष किंवा नपुंसक, कोणता ही लिंगधारी असो, तर त्या संबंधी
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
किंचित्मात्र पण विषयविकार संबंधी दोषं, इच्छां, चेष्टां किंवा विचार संबंधी दोषं न करण्याची, न करविण्याची की कर्ता प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या.
मला निरंतर निर्विकार राहण्याची परम शक्ति द्या. ७. हे दादा भगवान! मला कोणत्याही रसमध्ये लुब्धपणा न करण्याची
अशी शक्ति द्या. समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा प्रत्यक्ष अथवा परोक्ष, जीवंत अथवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचित्मात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय नाही करणार, नाही करविले जाणार की कर्ता प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. हे दादा भगवान! मला जगत कल्याण करण्याचे निमित्त बनण्याची परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या.
(हे दिवसातून तीन वेळा वाचावे) एवढेच तुम्ही 'दादा' जवळ मागायचे. ही दररोज मिकेनिकली(यंत्रवत्) वाचण्याची वस्तु नाही, अंतरात ठेवण्याची वस्तु आहे. ही दररोज उपयोगपूर्वक भावण्याची वस्तु आहे. एवढ्या पाठांत तमाम शास्त्रांचा सार येऊन जातो.
दादाश्री : शब्दनशब्द वाचून गेलात? प्रश्नकर्ता : होय, सर्व बरोबर वाचून गेलो.
अहम् नाही दुभावणार... प्रश्नकर्ता : १. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचित्मात्र पण अहम् नाही दुभावणार, नाही दुभावले जाणार की दुभावण्या प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. मला
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचित्मात्र पण अहम् नाही दुभावणार, अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. हे समजवा.
दादाश्री : अहम् नाही दुभावणार(दुखावणार) त्या साठी आपण स्याद्वाद वाणी मागत आहोत. तशी वाणी आपल्यात हळूहळू उत्पन्न होईल. मी ही जी वाणी बोलतो न ते मला भावना भावण्याचे फळ मिळाले आहे.
प्रश्नकर्ता : पण ह्यात कोणाचा अहम् नाही दुभावला पाहिजे, तर ह्याचा अर्थ असा तर नाही होत न की कोणाचा अहम् पोषावा?
दादाश्री : नाही तसा अहम् पोषावयाचा नाही. हे तर अहम् दुभावायचे नाही असे पाहिजे. मी म्हणेन की काचेचे प्याले फोडू नका. ह्याचा अर्थ असा नाही की काचेचे प्याले सांभाळा. ते आपणहूनच सांभाळलेले आहेत म्हणून फोडू नका. तसे ते तर सांभाळलेल्या स्थितीतच पडले आहेत. तुम्ही तुमच्या निमित्ताने नका फोडू. ते तुटत असतील तर तुमच्या निमित्ताने नका फोडू. आणि ती तुम्हाला भावना भावण्याची आहे की मला कोणत्याही जीवाला किंचित्मात्र दुःख नाही होणार, त्याचा अहंकार भग्न नाही होणार असे ठेवले पाहिजे. त्याला उपकारी मानत आहोत.
प्रश्नकर्ता : धंद्यात समोरच्याचा अहम् दुभावणार नाही असे नेहमी नाही होत. कोणाचा न कोणाचा अहम् दुभावलाच जातो.
दादाश्री : त्याला अहम् दुभावला नाही म्हणत. अहम् दुभावला म्हणजे काय की तो बिचारा काही बोलावयास गेला नी आपण म्हणालो 'बस, बस नाही बोलायचे.' असे त्याच्या अहंकारला दुभावले नाही पाहिजे. आणि धंद्यात तर अहम् दुभावला तो वास्तविक अहम् नाही दुभावत, ते तर मन दुभावते.
प्रश्नकर्ता : पण अहम् ही काय चांगली वस्तु नाही, बरोबर? तर मग त्याला दुभावण्यात काय हरकत आहे?
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
दादाश्री : तो स्वता:च आता अहंकार आहे, म्हणून ते नाही दुभावायचे. तो स्वता:च आहे सर्व, ज्यात तो करतो ते मीच आहे हे. म्हणून दुभावायचे नाही. तुम्ही घरात ही कोणावर रागवायचे नाही. कोणाचा अहंकार नाही दुभावणार तसे ठेवावे. अहंकार कोणाचाही दुभावला नाही पाहिजे. अहंकार दुभावला तर तो माणूस वेगळा पडून जाईल मग पुन्हा तो आपल्याला भेटणार नाही. आपण असे कोणाला नाही म्हणायला पाहिजे. 'तू बेकार आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस.' असे पाडून बोलायला नाही पाहिजे. हो, रागवायचे खरं, रागवण्यात हरकत नाही, पण कसे ही करुन त्याचा अहंकार नाही दुभावला पाहिजे. डोक्यावर लागले तर त्याची हरकत नाही, पण त्याच्या अहंकारावर नाही लागले पाहिजे. कोणाचा अहंकार भग्न नाही केला पाहिजे.
आणि मजूर असला तरी त्याचाही तिरस्कार नाही केला पाहिजे. तिरस्काराने त्याचा अहंकार दुभावतो. आपल्याला त्याचे काम नसेल तर आपण त्याला म्हणावे, 'भाऊ, मला तुझे काम नाही' आणि त्याचा जर अहंकार दुभावत नसेल तर पाच रूपये देऊनही त्याला मोकळे करावे. पैसे तर मिळून येतील पण त्याचा अहम् नाही दुभावला पाहिजे. नाहीतर तो वैर बांधेल, जबरदस्त वैर बांधेल ! आपले श्रेय होऊदेणार नाही, मध्ये येईल.
ही तर फार खोलवरची गोष्ट आहे. असे असूनही कोणाचा अहंकार तुमच्याकडून दुभावला गेला तर येथे आमच्याजवळ(ह्या कलम प्रमाणे) शक्तिची मागणी करावी. म्हणजे जे झाले, त्यापासून स्वता:चा अभिप्राय वेगळा ठेवतो, म्हणून त्याची जबाबदारी जास्त नाही. कारण की आता त्याचा 'ओपिनियन'(अभिप्राय) फिरुन गेला आहे. अहंकार दुभावण्याचा जो 'ओपिनियन' होता, तो ही मागणी करण्याने वेगळा होऊन गेला.
प्रश्नकर्ता : 'ओपिनियन'हून तो वेगळा होऊन गेला म्हणजे काय? दादाश्री : ‘दादा भगवान' तर समजून गेले ना, की ह्याला आता
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
बिचाऱ्याला कोणाचा अहम् दुभावण्याची इच्छा नाही. त्याची स्वता:ची तशी इच्छा नाही तरी सुद्धा होऊन जाते. जेंव्हा जगाच्या लोकांना तर इच्छेसहित होऊन जाते. अर्थात् ही कलम बोलण्याने काय होते की आपला अभिप्राय वेगळा पडून गेला. म्हणून आपण त्या बाजूने मुक्त होऊन गेलो.
अर्थात् ही शक्तिच मागायची. तुम्हाला काही करायचे नाही. फक्त शक्तिच मागायची. अमलात आणायचे नाही हे.
प्रश्नकर्ता : शक्ति मागायची गोष्ट बरोबर आहे. पण आपण असे काय केले पाहिजे की जेणे करुन दुसऱ्यांचा अहम् नाही दुभावणार?
दादाश्री : नाही तसे काही करायचे नाही. ह्या कलमां प्रमाणे तुम्हाला बोलायचे. बस एवढेच. दुसरे काही करायचे नाही. आता तुमच्याकडून जो अहम् दुभावला जातो ते फळस्वरूप ( डिस्चार्ज मध्ये ) अवश्य आलेले आहे. आता जे झाले ते तर 'डिसाईडेड' होऊन गेले आहे. ते थांबवता येणार पण नाही. त्याला फिरवण्यास जाणे हे डोकेफोड आहे फक्त. परंतु हे बोललो म्हणजे मग जबाबदारी नाही रहात.
प्रश्नकर्ता : आणि हे बोलणे खऱ्या हृदयापासून झाले पाहिजे.
दादाश्री : हे तर खऱ्या हृदयानेच सर्व केले पाहिजे. आणि जो माणूस करेल ना, तो खोट्या हृदयाने नाही करणार, खऱ्या हृदयानेच करणार. पण ह्यामध्ये स्वता:चा अभिप्राय वेगळा पडून गेला, हे मोठ्यातले मोठे विज्ञान आहे एक प्रकारचे. या प्रमाणे करायचे नाही, तुम्हाला तर ही नव कलमे बोलायची फक्त. शक्तिच मागायची की 'दादा भगवान' मला शक्ति द्या. मला ही शक्ति पाहिजे. ती शक्ति तुम्हाला प्राप्त होते आणि जबाबदारी मिटून जाते. तर जगत काय ज्ञान शिकविते ? ' असे नका करु.' अरे भाऊ, मला नाही करायचे तरी होऊन जाते. म्हणून तुमचे ज्ञान आम्हाला 'फिट' होत ( जमत नाही. हे तुम्ही म्हणतात, त्याने पुढचे बंद होत नाही आणि आजचे थांबत नाही, अर्थात् दोन्ही बिघडतात. म्हणजे 'फिट' होईल असे पाहिजे.
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
७
भाव प्रतिक्रमण तत्क्षणी च
प्रश्नकर्ता : मी जेंव्हा समोरच्याचा अहंकार दुभावला, तेव्हा मला असे होऊन जाते की हा माझा अहंकार बोलला ना?
दादाश्री : नाही तसा अर्थ करायची गरज नाही. आपली जागृति काय म्हणते? हा आपला मोक्षमार्ग म्हणजे अंतर्मुखी मार्ग आहे ! निरंतर आतल्या जागृतितच रहावे आणि समोरच्याचा अहम् दुभावला तर लागलीच त्याचे प्रतिक्रमण करुन घ्यायचे हे आपले काम. तुम्ही प्रतिक्रमण तर एवढे सगळे करतात त्यात एक अधिक ! आम्हालाही जर कधी कोणाचा अहम् दुभावण्याचे होऊन गेले असेल तर आम्ही सुद्धा प्रतिक्रमण करतो.
म्हणून सकाळच्या पहारी असे बोलायचे की, 'मन-वचन-कायाने कोणत्याही जीवास किंचित्मात्र दुःख न हो' असे पाच वेळा बोलून निघावे आणि मग जे दुःख होईल ते आपल्या इच्छे विरुद्ध झाले आहे, त्याचे प्रतिक्रमण करायचे संध्याकाळी.
प्रतिक्रमण म्हणजे काय ? डाग पडला म्हणजे लगेच धुऊन टाकायचा. मग हरकत नाही, मग भानगड, कसली? प्रतिक्रमण कोण नाही करीत ? ज्यांना(अज्ञानरूपी) बेभानपणा आहे, ती माणसं प्रतिक्रमण नाही करीत, बाकी प्रतिक्रमण तर मी ज्यांना ज्ञान दिले आहे, ती माणसे कशी झाली आहेत? विलक्षण पुरुष झाले आहेत, क्षणोक्षणि विचार करणारे, बावीस तीर्थंकरांचे अनुयायी विलक्षण होते ते 'शूट ऑन साईट'च प्रतिक्रमण करीत होते. दोष झाला की लगेच 'शूट' ! आणि आजची माणसे तसे करु शकणार नाही म्हणून भगवानांनी हे रायशी - देवशी, पाक्षिक, पर्युषण मध्ये संवत्सरी प्रतिक्रमण हे सर्व ठेवले.
स्याद्वाद वाणी, वर्तन, मनन...
प्रश्नकर्ता : आता 'कोणाचा ही अहम् नाही दुभावणार अशी
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
स्याद्वाद वाणी, स्यावाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची शक्ति द्या. हे तीन जरा समजवा.
दादाश्री : स्याद्वादचा अर्थ असा की सगळे कोणत्या भावने कोणत्या 'व्ह्यू पोईन्ट'(दृष्टीकोण)ने म्हणत आहे ते आपण समजून घ्यायला हवे.
प्रश्नकर्ता : समोरच्याचा 'व्ह्यू पोईन्ट' समजणे ते स्याद्वाद म्हणायचे?
दादाश्री : समोरच्याचा 'व्ह्यू पोईन्ट' समजणे आणि त्या प्रमाणे व्यवहार करणे, याचे नांव स्याद्वाद. त्याचा 'व्ह्यू पोईन्ट'ला दुःख नाही होणार अशा प्रकारे व्यवहार करावा. चोराच्या 'व्ह्यू पोईन्ट'ला दु:ख नाही होणार अशा प्रकारे तुम्ही बोलाल याचे नांव स्यावाद !
हे आम्ही जे बोलतो ते मुसलमान असो की पारसी असो, सर्वांना एक समान समजेल. कोणाचे प्रमाण नाही दुभवणार की 'पारसी असे आहेत आणि स्थानकवासी असे आहेत' असे दुःख झाले नाही पाहिजे.
प्रश्नकर्ता : येथे कोणी चोर बसला असेल, त्याला आपण सांगू की चोरी करणे हे चांगले नाही, तर त्याचे मन तर दुभावेलच ना? ।
दादाश्री : नाही, असे नाही बोलायचे. आपण त्याला सांगायला पाहिजे की, 'चोरी करण्याचे फळ असे येते. तुला ठीक वाटेल तर कर.' असे बोलावे. म्हणजे योग्य रीतिने बोलले पाहिजे. तर तो ऐकण्यास ही तयार होईल. नाहीतर तो ऐकणारच नाही आणि तुमचा शब्द व्यर्थ जाईल. आपले बोलणे वाया जाईल आणि तो उलट वैर बांधेल की हे मोठे आले शिकवणारे ! तसे नाही झाले पाहिजे.
लोक म्हणतात की चोरी करणे हा गुन्हा आहे. पण चोर काय जाणतो की चोरी करणे हा माझा धर्म आहे. आमच्या जवळ कोणी चोराला घेऊन
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
आले तर आम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेऊन खाजगी मध्ये त्याला विचारु की 'भाऊ हा बिझनेस(धंदा) तुला आवडतो? पसंद पडतो?' मग तो त्याची सर्व हकीकत सांगेल. आमच्या जवळ त्याला भिती नाही वाटणार. माणूस भिती मुळे खोटे बोलतो. मग त्याला समजावणार की 'हे तू करतोस त्याची जबाबदारी काय येते, त्याचे फळ काय आहे त्याची तुला जाणीव आहे?' आणि 'तू चोरी करतोस' तसे आमच्या मनात ही नसते. तसे जर कधी आमच्या मनात असेल तर त्याच्यावर परिणाम होईल प्रत्येकजण आपआपल्या धर्मात आहेत. कोणत्याही धर्माचे प्रमाण नाही दुभावेल, त्याचे नांव स्याद्वाद वाणी. स्याद्वाद वाणी ही संपूर्ण असते. प्रत्येकाची प्रकृति भिन्न भिन्न असते, तरी ही स्याद्वाद वाणी कोणाच्या ही प्रकृतिला हरकत नाही करीत.
प्रश्नकर्ता : स्याद्वाद मनन म्हणजे काय?
दादाश्री : स्याद्वाद मनन म्हणजे विचारण्यात, विचार करण्यातही कोणत्या ही धर्माचे प्रमाण नाही दुभावले पाहिजे. वर्तनात तर नाहीच झाले पाहिजे पण विचारात ही नाही झाले पाहिजे, बाहेर बोलाल ते वेगळे पण मनात ही तसे चांगले विचार असायला पाहिजे की समोरच्याचे प्रमाण नाही दुभावेल असे, कारण की मनाचे जे (वाईट) विचार असतात ते समोरच्याला पोहचतात. त्यामुळेच तर या लोकांचे चेहरे फुगलेले असतात. कारण की तुमचे विचार तेथे पोहचून परिणाम करतात.
प्रश्नकर्ता : कोणा विषयी खराब विचार आला तर प्रतिक्रमण करायचे?
दादाश्री : होय, नाहीतर मग त्याचे मन बिघडेल. आणि प्रतिक्रमण केले तर त्याचे मन बिघडलेले असेल तरी ही सुधरुन जाईल. कोणासाठी वाईट किंवा असा-तसा विचार करु नये. असे काहीच करु नये. 'सब सबकी संभालो,' आपआपले सांभाळा बस. दुसरी कोणती भानगड नाही.
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
१०
भावना सुधारे जन्मोजन्म
धर्माचे प्रमाण नाही दुभावणार....
प्रश्नकर्ता : २. हे दादा भगवान ! मला कोणत्याही धर्माचे किंचित्मात्र पण प्रमाण नाही दुभावणार, नाही दुभावले जाणार अथवा दुभावण्या प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही धर्माचे किंचित्मात्र पण प्रमाण नाही दुभावणार, अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या.
दादाश्री : कोणाचे ही प्रमाण नाही दुभावले पाहिजे. कोणी पण चुकीचे आहेत, असे नाही वाटायला पाहिजे. 'एक' ही पण संख्याच म्हटली जाते की नाही म्हटली जाते?
प्रश्नकर्ता : होय.
दादाश्री : तर 'दोन' ही संख्या म्हटली जाते की नाही म्हटली जाते? प्रश्नकर्ता : होय म्हटली जाते.
दादाश्री : तर आपले 'शंभर 'वाले काय म्हणतात ? 'आमचे खरे तुमचे खोटे.' असे नाही म्हणायचे. सर्वांचे खरे आहे, 'एक' चे 'एक'च्या प्रमाणात, 'दोन'चे 'दोन'च्या प्रमाणात, खरे आहे. म्हणजे प्रत्येकांचे जे स्वीकार करतात, त्याचे नांव स्याद्वाद. एक वस्तु त्याच्या गुणधर्मात असेल पण आपण त्यातील अमुकच गुणांचा स्वीकार केला आणि बाकीचांच्या स्वीकार नाही केला, ते चुकीचे आहे. स्यादवाद म्हणजे प्रत्येकाचे प्रमाणपूर्वक. ३६० डिग्री असेल तर सर्वांचे खरे, पण त्याच्या डिग्री पर्यंत त्याचे खरे आणि ह्याच्या डिग्री पर्यंत ह्याचे खरे.
म्हणून कुठलाही धर्म हा खोटा आहे असे आपण बोलायचे नाही. प्रत्येक धर्म खरा आहे, खोटा नाही. आपण कोणाला खोटा आहे असे म्हणूच शकत नाही ना ! तो त्याचा धर्म आहे. मांसाहार करत असेल, त्याला आपण खोटा कशा वरुन म्हणू शकतो?! तो म्हणेल, मांसाहार करणे हा माझा धर्म
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
आहे. तर आपल्याने 'नाही' म्हणता येणार नाही. ती त्याची मान्यता आहे, बिलीफ आहे त्याची. आपण कोणाची बिलीफ तोडू नाही शकत. पण आपली माणसे जर मांसाहार करत असतील तर आपण त्यांना सांगायला पाहिजे की 'भाऊ, ही चांगली वस्तु नाही.' मग त्याला करायचे असेल तर त्यास आपली हरकत नसावी. आपण समजावले पाहिजे की ही वस्तु हेल्पफूल नाही.
स्यावाद म्हणजे कोणत्याही धर्माचे प्रमाण नाही दुभावायचे. जेवढ्या प्रमाणात सत्य असेल तेवढ्या प्रमाणात सत्य त्याला सांगा आणि दुसरें जेवढ्या प्रमाणात असत्य असेल तेवढ्या प्रमाणात असत्य पण त्याला सांगा. याचे नांव प्रमाण दुभावत नाही. ख्रिश्चियन प्रमाण, मुस्लिम प्रमाण, कोणत्याही धर्माचे प्रमाण दुभावले नाही पाहिजे. कारण असे कि सर्व ३६० डिग्रीतच येऊन जातात. रियल इज धी सेंटर आणि ऑल धीज आर रिलेटिव्स व्ह्यज. (रियल सेंटर आहे आणि हे सर्व रिलेटिव्स-सापेक्ष दृष्टीकोण आहे) सेंटरवाल्यां साठी रिलेटिव व्ह्यज सर्वे सारखे आहेत. भगवानचे स्याद्वाद म्हणजे कोणाला किंचित्मात्र ही दु:ख न हो, मग वाटेल तो धर्म असेल !
अर्थात् हा स्याद्वाद मार्ग असा असतो. प्रत्येकांचा धर्माचा स्वीकार करावा लागतो. समोरचा दोन थप्पड मारेल ते सुद्धा आपण स्वीकार केले पाहिजे. कारण की जगत सर्व निर्दोष आहे. दोषित दिसत आहे, ते तुमच्या दोषामुळे दिसत आहे. बाकी, जगत दोषित नाहीच आहे. पण ते तुमची बुद्धि दोषित दाखविते की, ह्याने खोटे केले.
अवर्णवाद, अपराध, अविनय...
प्रश्नकर्ता : ३. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी उपदेशक, साधु, साध्वी की आचार्य यांचा अवर्णवाद, अपराध, अविनय न करण्याची परम शक्ति द्या.
दादाश्री : कोणत्याही रीतिने जसे आहे तसे नाही चितरणे पण
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
उलटेच चितरणे, ते अवर्णवाद ! जसे आहे तसेही नाही आणि त्याचेही उलटेच पुन्हा. जसे आहे तसे बोलले, खोट्याला खोटे बोलले आणि चांगल्याला चांगले बोलले, तर अवर्णवाद नाही म्हटले जात. पण सर्वच खोटे बोलले तर त्याला अवर्णवाद म्हटले जाते. कोणत्याही माणसात थोडे तरी चांगले असते की नाही? आणि थोडे वाईटही असते. पण त्याचे सर्वच वाईट बोलले, तेंव्हा मग ते अवर्णवाद म्हटले जाते. 'ह्या बाबतीत जरा असा आहे, पण इतर बाबतीत खूप चांगला आहे.' असे असायला पाहिजे.
अवर्णवाद म्हणजे आपण त्याच्या बाबतीत जाणतो, त्याचे काही गुण जाणत असतो तरी सुद्धा त्याचा विरुद्धच सर्व काही बोललो म्हणजे जे गुण त्याच्यात नाहीत अशा सर्व गुणांची बात आपण केली तर ते सर्व अवर्णवाद. वर्णवाद म्हणजे जे आहे ते बोलणे आणि अवर्णवाद म्हणजे जे नाही ते बोलणे. ही तर भारी विराधना म्हटली जाते, मोठ्यात मोठी विराधना म्हटली जाते. इतर साधारण माणसांच्या संदर्भात ते निंदा म्हटली जाणार पण महानपुरुषांचा बाबतीत ते अवर्णवाद म्हटला जातो. महानपुरुष म्हणजे जे आंतर्मुखी झालेत ते. महानपुरुष म्हणजे व्यवहारात मोठे असेल ते नाही प्रेसिडन्ट असेल ते नाही पण आंतर्मुखी पुरुषांचा तो अवर्णवाद म्हटला जातो, आणि ते तर मोठे जोखीम आहे !! विराधनाहून ही अधिक आहे.
प्रश्नकर्ता : उपदेशक, साधु, आचार्य यांच्यासाठी म्हटले आहे ना?
दादाश्री : होय, ते सगळे. ते भले मार्गी असो अथवा नसो, ज्ञान असो अथवा नसो, ते आम्हाला पहायचे नाही, ते भगवान महावीरांच्या मार्गी लागले आहेत ना? महावीरांच्या नावावर करतात ना? मग जे करतात, खरे की खोटे, पण महावीरांच्या नांवावर करताहेत ना? त्यामुळे त्यांचा अवर्णवाद नाही बोलायचे.
प्रश्नकर्ता : अवर्णवाद आणि विराधनामध्ये काय फरक? दादाश्री : विराधना करणारा तर उलटा जाईल, खाली उतरेल,
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
खालच्या गतित जाईल आणि अवर्णवाद करणारा नंतरमग प्रतिक्रमण करणार तर काही हरकत नाही येणार, त्याचे सर्व रेग्युलर होऊन जाईल. कोणाचे अवर्णवाद बोललात, परंतु नंतर प्रतिक्रमण केले तर साफ होऊन जाते. (दोष धुतला जातो.)
प्रश्नकर्ता : अविनय आणि विराधना विषयी जरा समजवा.
दादाश्री : अविनय हे विराधना नाही गणले जात. अविनय हे तर जरा खालचा स्टेज आहे पण विराधना तर अक्षरशाः त्यांच्या विरुद्ध गेला म्हणावे. अविनय म्हणजे मला काही घेणे देणे नाही, असे. विनय नाही करीत, त्याचे नांव अविनय.
प्रश्नकर्ता : अपराध म्हणजे काय?
दादाश्री : माणूस आराधना करीत असेल तर वर चढतो आणि विराधना करीत असेल तर खाली उतरतो. परंतु अपराध करीत असेल, तर दोन्ही बाजूंनी मार खातो. अपराधवाला स्वताः प्रगति करीत नाही आणि कोणालाही प्रगति करू देत नाही. त्याला अपराधी म्हणतात.
प्रश्नकर्ता : आणि विराधनामध्ये पण कोणालाही पुढे जाऊ देत नाही
ना?
दादाश्री : परंतु विराधनावाला चांगला. कोणाला कळाले तर मग ते त्याला सांगतात की, 'काय पाहून तुम्ही असे चाललात? ह्या बाजूला अहमदाबाद असू शकते?!' तर तो परत फिरेलही पण अपराधी तर परत फिरणार ही नाही नी पुढे जाणार ही नाही. विराधना करणारा तर उलट चालतो म्हणून पडून जातो ना !
प्रश्नकर्ता : पण विराधना करणाऱ्याला परत फिरण्याचा चान्स आहे ना?
दादाश्री : होय, परत फिरण्याचा चान्स तर आहेच ना !
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
१४
भावना सुधारे जन्मोजन्म
प्रश्नकर्ता : अपराध करणाऱ्याला परत फिरण्याचा चान्स आहे का?
दादाश्री : तो तर परतच फिरत नाही आणि पुढे ही सरकत नाही त्याचे काही धोरणच नाही. पुढे सरकत नाही आणि मागे जात नाही. जेव्हा पहावे तेव्हा तिथल्या तिथेच, याचे नांव अपराध
प्रश्नकर्ता : अपराधची डेफिनेशन (व्याख्या) काय आहे?
दादाश्री : विराधना ही इच्छा विना होते आणि अपराध इच्छापूर्वक होत असते.
प्रश्नकर्ता : ते कशा रीतीने होते, दादा?
दादाश्री : तंते चढला(हट्टाग्रही झाला) असेल तर तो अपराध करून बसेल. जाणतो की तेथे विराधना करण्यासारखे नाही तरी विराधना करतो. जाणतो तरी विराधना करतो तर ते अपराधांत जाते. विराधनावाला सुटेल, पण अपराधवाला नाही सुटणार. ज्याचा खूप भारी, तीव्र अहंकार असतो, तो अपराध करून बसतो. म्हणून आपल्याला स्वता:लाच म्हणावे लागते की, 'भाऊ, तू तर वेडा आहेस, अशी उगाच पावर घेऊन चालत आहेस. हे तर लोकं नाही जाणत पण मी जाणतो की तू कसा आहेस. तू तर चक्कर आहेस.' असा आपल्याला उपाय करावा लागतो. प्लस आणि मायनस करावे लागते, फक्त गुणाकार असेल तर कुठे पोहचेल? म्हणून आपण भागाकार करावा. बेरीज-वजाबाकी नेचरच्या आधीन आहे, जेव्हा गुणाकार-भागाकार मनुष्याच्या हातात आहे. ह्या अहंकाराने सात ने गुणाकार होत असेल तर सात ने भागाकार करून टाकले म्हणजे नि:शेष !
प्रश्नकर्ता : कोणाची निंदा केली तर कशा मध्ये येईल?
दादाश्री : निंदा ही विराधनेत गणली जाते. पण प्रतिक्रमण केल्याने धुतली जाते. ते अवर्णवाद सारखे आहे. म्हणून तर आपण म्हणत आहोत की कोणाची निंदा नको करु. तरी ही लोकं मागून निंदा करतात. अरे, निंदा
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
१५
करु नये. ह्या वातावरण मध्ये सर्व परमाणूच भरलेले आहेत. म्हणून त्याला पोहचून जाते सर्व काही. एक शब्द सुद्धा कोणासाठी बेजबाबदारीवाला नाही बोलायचा आणि बोलायचे असेल तर काही चांगले बोल. कीर्ति बोल, अपकीर्ति नको बोलूस.
म्हणून कोणाच्या निंदा मध्ये नाही पडायचे. स्तुति नाही होत तर हरकत नाही, पण निंदा मध्ये नाही पडायचे. मी सांगतो की निंदा करण्यामध्ये आपल्याला काय फायदा? याच्यांत तर खूप नुकसान आहे. जबरदस्त नुकसान जर कधी ह्या जगात असेल तर ते निंदा करण्यात आहे. म्हणून कोणाचीही निंदा करण्याचे कारण नाही व्हायला पाहिजे.
आपल्या येथे निंदा सारखी वस्तुच नाही. आपण समजण्या साठी बोलत आहोत, काय खरं आणि काय खोटं ! भगवानांनी काय सांगितले ? खोट्याला खोटं जाण आणि चांगल्याला चांगलं जाण. पण खोटं जाणते वेळी त्यांवर किंचित्मात्र पण द्वेष नाही झाला पाहिजे आणि खरं जाणते वेळी त्यांवर किंचित्मात्र राग (आसक्ति) नाही झाला पाहिजे. खोट्याला खोटं नाही जाणले तर चांगल्याला चांगलं जाणणे शक्य नाही. म्हणून आम्ही सविस्तर बोलले पाहिजे. ज्ञानी जवळच ज्ञान समजते.
अभाव, तिरस्कार नाही करावा...
प्रश्नकर्ता : ४. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्मा प्रति किंचित्मात्र पण अभाव, तिरस्कार कधीही नाही केला जाणार, नाही करविला जाणार की कर्ताचे प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या.
दादाश्री : होय, बरोबर आहे. आपल्याला कोणाचा अभाव झाला, जसे की तुम्ही ऑफिसात बसले आहात आणि कोणी मनुष्य आला तर अभाव झाला, तिरस्कार झाला. तेंव्हा मग तुम्ही मनात विचार करुन त्या साठी पश्चाताप केला पाहिजे की असे नाही झाले पाहिजे.
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
ह्या तिरस्कार पासून कधी ही सुटका नाही. त्यात तर नुसते वैर बांधले जातात. कोणाही बरोबर जरासा ही तिरस्कार असेल, ह्या निर्जीव बरोबर तिरस्कार असेल तरी सुद्धा तुम्ही सुटणार नाही. अर्थात् कोणाचा थोडा पण तिरस्कार नाही चालणार. जो पर्यंत कोणासाठी तिरस्कार असेल तो पर्यंत वीतराग नाही होता येत. आणि वीतराग तर व्हावे लागेल, तरच सुटका होईल!
कठोर-तंतीलीभाषा न बोलण्याची... प्रश्नकर्ता : ५. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माशी कधीपण कठोरभाषा, तंतीलीभाषा न बोलण्याची, न बोलावयाची की बोलण्या प्रति अनुमोदन नाही करण्याची अशी परम शक्ति द्या. कोणी कठोरभाषा, तंतीली(हट्टी, स्पर्धावाली,टोचणारी) भाषा बोलले तर मला मृदु-ऋजु भाषा बोलण्याची परम शक्ति द्या.
दादाश्री : कठोरभाषा नाही बोलली पाहिजे. कोणा बरोबर कठोरभाषा बोलून गेलात आणि त्याला वाईट वाटले तर आपण त्याच्या हजेरीत म्हणावे की, 'भाऊ, माझी चूक झाली, माफी मागतो' आणि हजेरीत म्हणता येण्या सारखे नसेल तर मग आत मध्ये पश्चाताप करावा की, असे नाही बोलायचे.
प्रश्नकर्ता : आणि पुन्हा विचार केला पाहिजे की असे नाही बोलावे.
दादाश्री : होय, असा विचार केला पाहिजे आणि पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप केला तरच ते (तसे बोलणे) बंद होईल. नाहीतर आपणहून बंद होणार नाही. फक्त बोलण्याने बंद नाही होणार.
प्रश्नकर्ता : मृदु, ऋजु भाषा म्हणजे काय?
दादाश्री : ऋजु म्हणजे सरळ आणि मृदु म्हणजे नम्रतावाली. अत्यंत नम्रतावाली असते तेव्हा मृदु म्हणली जाते. म्हणजे सरळ भाषा आणि
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
नम्रतावाली भाषेने आपण बोलावे आणि तशी शक्ति मागावी, तर असे करता-करता ती शक्ति येईल. कठोरभाषा बोललांत आणि मुलास वाईट वाटले तर त्याचा पश्चाताप करावा. आणि मुलास सुद्धा सांगायचे की 'मी माफी मागत आहे. पुन्हा असे नाही बोलणार' हाच वाणी सुधारण्याचा मार्ग आहे आणि 'हे' एकच कॉलेज आहे.
प्रश्नकर्ता : तर कठोरभाषा नी तंतलीभाषा आणि मृदुता नी ऋजुता याच्यात भेद काय?
दादाश्री : खूपजण कठोर भाषा बोलतात ना की, 'तू नालायक आहेस. बदमाश आहेस, चोर आहेस.' जे शब्द आपण ऐकले नसतील ना ! अशी कठोर वाणी ऐकल्या बरोबर आपले हृदय स्तंभित होऊन जाते. ही कठोरभाषा जरा सुद्धा प्रिय नाही वाटत. उलट मनात खूप होते की हे सर्व काय आहे? कठोरभाषा ही अहंकारी असते.
तंतीलीभाषा म्हणजे काय? रात्री आपल्या पनि बरोबर भांडण झाले असेल आणि तिने सकाळी चहा देतांना कप आपटून ठेवला तेव्हा तुम्ही समजून जाणार की अहो! रात्री ची गोष्ट आता पर्यंत विसरली नाही ! ह्याला तंत म्हणतात. मग ती जी वाणी बोलणार ती पण अशी तंतीली (टोचणारी) निघत असते.
__पंधरा वर्षा नंतर तुम्हाला कोणी माणूस भेटला (ज्याच्या बरोबर पूर्वी तुमचे भांडण-तंटा झालेले असेल) तो पर्यंत तुम्हाला त्याच्या बाबतीत काहीही आठवत नसेल पण तो भेटल्या बरोबरच जुने सर्व काही आठवते, ताजे होऊन जाते त्याला म्हणतात तंत.
स्पर्धेत जसा तंत असतो ना? 'पहा मी कसा छान स्वयंपाक केला आणि त्यास तर येतच नाही.' असे तंतेत चढतात, स्पर्धेत चढतात. ती तंतीलीभाषा (ऐकण्यास) खूप वाईट असते.
कठोर आणि तंतीलीभाषा बोलू नये. भाषेचे सर्व दोष ह्या दोन शब्दांत
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
येऊन जातात. म्हणून रिकामा वेळ आला तर 'दादा भगवान' जवळ आपण शक्ति माग-माग करावी. कडू बोलवत असेल तर त्याची प्रतिपक्षी शक्ति मागावी की मला शुद्ध वाणी बोलण्याची शक्ति द्या, स्यावाद वाणी बोलण्याची शक्ति द्या, मृदु-ऋजु भाषा बोलण्याची शक्ति द्या. असे मागतच रहावे. स्याद्वाद वाणी म्हणजे कोणालाही दुःख नाही होणार अशी वाणी.
.... निर्विकार राहण्याची शक्ति द्या प्रश्नकर्ता : ६. 'हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचे प्रति स्त्री-पुरुष किंवा नपुंसक, कोणता ही लिंगधारी असो, तर त्या संबंधी किंचित्मात्र पण विषयविकार संबंधी दोषं, इच्छां, चेष्टां किंवा विचार संबंधी दोषं न करण्याची, न करविण्याची की कर्ता प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या. मला निरंतर निर्विकार राहण्याची परम शक्ति द्या.
दादाश्री : आपली दृष्टी बिघडली तर त्वरीतच आत तुम्ही 'चंदुभाईला' (वाचकांनी चंदुभाईच्या जागी स्वता:ला समजायचे) सांगावे. असे नाही व्हावे, असे आपल्याला शोभत नाही. आपण खानदानी क्वॉलिटीचे आहोत. जशी आपली बहीण असते, तशी ती दुसऱ्याची बहीण आहे ! आपल्या बहीणीवर कोणाची दृष्टी बिघडली तर आपल्याला किती दुःख होईल ! तसे दुसऱ्याला दु:ख होईल की नाही होईल? म्हणून आपल्याला असे शोभत नाही. अर्थात् दृष्टी बिघडली तर पश्चाताप करावा.
प्रश्नकर्ता : चेष्टां, याचा अर्थ काय?
दादाश्री : देहाने होणारी सर्व क्रिया ज्याचा फोटो काढता येईल ते सर्व चेष्टा म्हटली जाते. तुम्ही मस्करी करत असाल ती चेष्टा म्हटली जाते. असे हसत असाल ते चेष्टा म्हटली जाते.
प्रश्नकर्ता : म्हणजे कोणाचे हसे उडविणे, कोणाची टिंगल करणे हे चेष्टा?
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
दादाश्री : सर्व खूप प्रकारच्या चेष्टां आहेत. प्रश्नकर्ता : तर हे विषयविकार संबंधी चेष्टा कशा प्रकारे आहेत?
दादाश्री : विषयविकारच्या बाबतीत देह जे जे कार्य करते त्याचा फोटो घेऊ शकता, म्हणून ती सर्व चेष्टां. कायाने नाही होणार ती चेष्टा नाही. कधी तरी इच्छा होतात, मनात विचार येतात, परंतु चेष्टा झालेली नसते. विचार संबंधी दोष ते मनाचे दोष !
'मला निरंतर निर्विकार राहण्याची शक्ति द्या.' एवढे तुम्ही 'दादां'च्या जवळ मागावे, 'दादा' दानेश्वरी आहेत.
रस मध्ये लुब्धपणा न करण्याची... प्रश्नकर्ता : ७. हे दादा भगवान! मला कोणत्याही रसमध्ये लुब्धपणा न करण्याची अशी शक्ति द्या. समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या.
दादाश्री : हे जेवणाच्या वेळी तुम्हाला अमुकच भाजी, टमाट्याचीच आवडते, ती तुम्हाला पुन्हा आठवत राहते तर लुब्धपणा झाला म्हणायचे. टमाटा जेवण्यात हरकत नाही, परंतु पुन्हा आठवण नाही आली पाहिजे. नाहीतर आपली सर्व शक्ति लुब्धपणा मध्ये जात राहील. म्हणून आपण सांगायचे की 'जे येईल ते मला मान्य आहे.' लुब्धपणा कुठल्याही प्रकारचा नाही व्हायला पाहिजे. ताटात जे जेवण आले, आमरस-चपाती आली तर आमरस-चपाती निवांतपणे खावी. त्यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही, पण जे आले ते स्वीकार करायचे दुसरे काही आठवायचे नाही.
प्रश्नकर्ता : मग हे समरसी म्हणजे काय?
दादाश्री : समरसी म्हणजे पूरणपोळी, डाळ-भात, भाजी सर्वच खावे, परंतु फक्त पूरणपोळीच नाही खात राहायचे.
आणि काही लोकं गोड सोडतात. ते गोड त्यांच्यावर दावा मांडेल,
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
ते काय म्हणेल की माझ्याशी तुला काय तक्रार आहे? रेड्याच्या चुकी मुळे पखाल्याला सजा ! अरे, जीभेला(स्वादला) काय चिटकून पडायचे असते? चूक रेड्याची आहे. रेड्याची चूक म्हणजे अज्ञानताची चूक.
प्रश्नकर्ता : पण समरसी आहार म्हणजे काय? याच्यात सारखा भाव कशा प्रकारे पडतो?
दादाश्री : तुमच्या लोकांची जी जात(समाज) असेल, त्या जातिच्या भोजन समारंभा मध्ये जे जेवण बनवितात, ते तुमच्या जातिच्या लोकांना समरसी वाटेल तसे बनवितात परंतु तेच जेवण जर दुसऱ्या जातिचा लोकांना जेवायला दिले तर त्यांना ते समरसी नाही वाटणार. तुम्ही लोक मिरचीबिरची कमी खाणारे. समरसी आहार प्रत्येक ज्ञातिचे वेगळे वेगळे असते. समरसी आहार म्हणजे टेस्टफूल, चविष्ट फूड. मिरची जास्त नाही, अमूक जास्त नाही, सर्व सारख्या प्रमाणांत घातलेल्या वस्तु. कित्येक म्हणतात, 'मी फक्त दूध पिऊन पडून राहीन.' त्याला समरसी आहार नाही म्हणायचे. समरसी म्हणजे सहा प्रकारची रस एकत्र करून खावे चांगल्या प्रकारे, स्वादिष्ट करून खाणे. दुसरे कडू नाही खाल्ले जात तर कारले खा. कंटोळी खा, मेथी खा पण कडू सुद्धा घेतले पाहिजे. कडू नाही घेत, म्हणून तर सर्व रोग होतात. त्यामुळे मग 'क्विनाईन' (कडू औषध) घ्यावी लागते ! तो रस कमी घेतात म्हणून ही उपाधि होते ना ! अर्थात् सर्व रस घेतले पाहिजे.
प्रश्नकर्ता : म्हणजे रस घेण्यासाठी शक्ति मागायची की दादा भगवान ! मला समरसी आहार घेण्याची शक्ति द्या.
दादाश्री : होय, ते तर तुम्ही शक्ति मागायची. तुमची भावना काय आहे? समरसी आहार घेण्याची तुमची भावना झाली तो तुमचा पुरुषार्थ. आणि मी शक्ति दिली म्हणजे तुमचा पुरुषार्थ झाला मजबूत !
प्रश्नकर्ता : कोणत्याही रसात लुब्धपणा नाही झाला पाहिजे, ते पण बरोबर आहे?
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
दादाश्री : होय, म्हणजे त्याला असे तर नाहीच वाटले पाहिजे की मला आंबट शिवाय दुसरे आवडत नाही. कित्येक म्हणतात की, 'मला गोड शिवाय जमत नाही' तेव्हा तिखटाने काय गुन्हा केला? कित्येक म्हणतात की, 'मला गोड आवडतच नाही.' 'तिखटच फक्त पाहिजे.' ते हे सर्व समरसी नाही म्हणायचे. समरसी म्हणजे सर्व स्वीकार्य. कमी-जास्त प्रमाणात पण सर्व काही ‘एक्सेप्टेड'.
प्रश्नकर्ता : समरसी आहार आणि ज्ञान या दोन्हींचे काही कनेक्शन आहे? ज्ञानच्या जागृतिसाठी समरसी आहार नसेल तर नाही घ्यायचा?
दादाश्री : समरसी आहारासाठी तर असे आहे ना की आपल्या (ज्ञान प्राप्त) महात्मांना आता 'व्यवस्थित शक्ति'चे ज्ञान आहे म्हणून आपल्याला वाद राहिलाच नाही. हे तर बाहेरच्या लोकांसाठी सांगितले आहे. आणि आपल्या महात्मांना हे तर विचारात येणार ना की शक्य तेवढा समरसी आहार घेतला पाहिजे.
प्रकृतिचे गुणाकार-भागाकार प्रश्नकर्ता : म्हणजे प्रकृतिला समरसी असायला हवे असे?
दादाश्री : प्रकृति म्हणजे काय? तेरा ने गुणीलेली वस्तुला तेराने च भागिले तरच प्रकृति समाप्त होते. आता कोणी सतराने गुणीलेली वस्तुला तेराने भागिले तर काय होईल? म्हणून मी वेगळा गुणाकार केला.
प्रश्नकर्ता : म्हणजे तेरा ने गुणाकार तर तेरा ने भागाकार... दादाश्री : तसे केले तर च नि:शेष होईल ना ! प्रश्नकर्ता : त्याचे उदाहरण कशा पद्धतिने घ्यायचे?
दादाश्री : प्रकृति म्हणजे आधी जे भाव केले आहेत, ते कोणत्या आधाराने केले? पूर्वी जो जो आहार खाल्ला त्याच्या आधाराने भाव केले.
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
अर्थात् हे भाव तेरा ने गुणीले. आता ह्या भावला उडवायचे असेल तर त्याला तेरा ने भागून टाकावे म्हणजे उडून जातील आणि नव्याने भाव उत्पन्न नाही होऊ दिले म्हणजे ते खाते बंद होऊन गेले. नवीन इच्छां नाही आहेत म्हणून खाते बंद होऊन गेले. खाते सील केले पाहिजे.
... तेथे प्रकृतिची शून्यता
प्रश्नकर्ता : शुद्धात्माचे ज्ञान तर दिले. आता ही प्रकृतिची शून्यता प्राप्त करण्यासाठी हे नव कलमे बोलली, तर हेल्प करते का?
२२
दादाश्री : हो, हेल्प तर होते, जेवढ्याने गुणीले तेवढ्याने भागावे. मला डॉक्टर सांगतात, ‘हे खात जा.' मी सांगितले. 'डॉक्टर, ही गोष्ट दुसऱ्या दर्दीना सांगा. हा आमचा गुणाकार वेगळ्या प्रकारचा आहे. मला ते भागाकार करायचे सांगतील ते कशा प्रकारे जुळेल'.
प्रश्नकर्ता : तुम्ही तर उलट मिरच्या अधिक प्रमाणात घेऊन भागाकार करतात ?
दादाश्री : मिरच्या घेते वेळी मी सर्वांना सांगतो की हे खोकल्याचे औषध करतो आहे अणि खोकला झाला की दाखवतो की पहा झाला ना खोकला ?
प्रश्नकर्ता : यामध्ये भागाकार कुठे आला?
दादाश्री : तोच भागाकार. मिरच्या जर नसत्या घेतल्या तर भागाकार पूर्ण नसता झाला.
प्रश्नकर्ता : म्हणजे प्रकृति मध्ये आधी जे भरले आहे, ते आता पूर्ण करायचे आहे.
दादाश्री : होय पूर्ण करून घ्यायचे.
ह्या नीरूबेननां मी सांगतो, 'तुम्ही सांगत असाल तर सुपारी खाईन. '
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
२३
पण सुपारी खातांना सांगतो की हे खोकल्याचे औषध आहे. त्या कित्येक वेळी 'नाही' म्हटल्या तर राहून देतो आणि मग म्हणाल्या की 'घ्या', तेव्हा मी घेतो तर खोकला होतो. तसे पाहिले तर मी सुपारी खात नाही. मला कुठल्या ही वस्तुची सवय नाही. परंतु माल भरलेला असेल तर खाल्ले जाईल ना?
आपले हे 'अक्रम विज्ञान' आहे ! तर मागच्या सवयी पडलेल्या आहेत, त्यामुळे होते. म्हणून ही शक्ति मागा. मग लुब्ध आहार घेतला, त्याची हरकत नाही पण हे कलम अनुसार बोलण्याने जुने करार मोकळे
होतात.
प्रश्नकर्ता : जी आपली प्रकृति आहे, जर गुणाकार कराल तर ती वाढत जाईल. तिला भागायला पाहिजे. प्रकृतिला प्रकृतिने भागायला पाहिजे हे समजवा.
दादाश्री : म्हणजे ही कलमे बोलत राहिल्याने त्याचा भागाकार होतो आणि कमी होऊन जाते. अशी कलमे बोलली नाही तर (प्रकृतिरूपी) रोपटे आपणहून च उगत राहणार. आणि हे बोल बोल केले तर कमी होऊन जाईल. हे जसेजसे बोलाल, तसेतसे आत प्रकृतिचे गुणाकार झालेत ते तुटून जातील आणि आत्माचे गुणाकार होईल. आणि प्रकृतिचे भागाकार होईल. म्हणून आत्मा पुष्ट होत जातो. नव कलमे रात्रंदिवस बोल बोल करा, टाईम मिळाला तर ! रिकामा वेळ मिळाला की बोलावे. आम्ही तर सर्व औषध देऊन टाकतो, सर्वकाही समजावतो, मग जे करायचे असेल ते...
प्रत्यक्ष-परोक्ष, जीवंत-मृत्यु पावलेल्यानां.... प्रश्नकर्ता : ८. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा, प्रत्यक्ष अथवा परोक्ष, जीवंत अथवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचित्मात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय नाही करणार,
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
२४
भावना सुधारे जन्मोजन्म
नाही करविले जाणार की कर्ता प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या.
दादाश्री : अवर्णवाद म्हणजे एखाद्या माणसाची बाहेर आलू चांगली असेल, मान असेल, कीर्ति असेल, तर त्यास आपण उलट बोलून बेआब्रु केले असेल, त्याला अवर्णवाद म्हणायचे. अर्थात् त्याचे उलट बोलणे.
प्रश्नकर्ता : ह्यात मेलेल्यांची पण आपण क्षमायाचना करतो, आपण जे काही संबोधन करतो, ते त्यांना पोहचते खरे?
दादाश्री : त्यांना पोहचावयाचे नाही. तो माणूस मरुन गेला आणि तुम्ही आता त्याच्या नांवाने शिव्या दिल्या, तर तुम्ही भयंकर दोषात पडाल. म्हणून आम्ही म्हणतो की मेलेल्यांचे ही नांव नाही घ्यायचे. बाकी पोहचणे न पोहचण्याचा प्रश्न नाही. वाईट माणूस असेल आणि सर्व उलटे करुन मरुन गेला, तरी पण मागाहून त्याचे वाईट नाही बोलायचे.
आता रावणाचे वाईट नाही बोलायचे. कारण की तो अजून देहधारी आहे (दूसऱ्या जन्मात). म्हणून त्याला 'फोन' पोहचून जाईल. 'रावण असा होता नी तसा होता' बोललो तर ते त्याला पोहचून जाईल. (आपली स्पंदन त्याचा आत्मा जेथे असेल तेथे पोहचून जातात.)
आपले कोणी नातेवाईक मरुन गेले असेल आणि लोक त्याची निंदा करत असतील, तर आपण मध्ये नाही मिसळायचे. जर मिसळलात तर पश्चाताप करावा की असे नाही झाले पाहिजे. कोणी मरुन गेलेत्या माणसाच्या गोष्टी करणे हा भयंकर गुन्हा आहे. जो मरुन गेला असेल, त्यालाही आपली लोकं सोडत नाहीत. असे करतात की नाही करत लोकं ? असे करायला नाही पाहिजे. असे आम्ही सांगण्यास मागत आहोत. ह्यात खुप मोठे जोखीम आहे. त्यावेळेस पहिल्याच्या 'ओपिनियन'(अभिप्राय) मुळे बोलले जाते. म्हणून ही कलमे बोलत जा. त्यामुळे त्या गोष्टी बोलल्या गेल्या तर दोष नाही लागणार. हा हुक्का पीत जाऊ आणि बोलत जाऊ की 'नाही प्यायचे,
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
नाही पाजायचे आणि कर्ता प्रत्ये अनुमोदन नाही करायचे तशी शक्ति द्या.' तर त्याच्याने करारं सुटत जातील, नाहीतर पुद्गलचा स्वभाव कोलांटी मारण्याचा आहे. म्हणून ही भावना भावायची.
जगत कल्याण करण्याची शक्ति द्या प्रश्नकर्ता : ९. हे दादा भगवान! मला जगत कल्याण करण्याचे निमित्त बनण्याची परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या. आपण ही कल्याणाची भावना केली, तर ते कशा प्रकारे काम करते?
दादाश्री : तुमचे शब्द असे निघतील की त्याचे काम होऊन जाईल.
प्रश्नकर्ता : पौद्गलिक की 'रियल'च्या(आत्म) कल्याणाची आपण गोष्ट करतां?
दादाश्री : पुद्गलचे नाही, आपल्याला तर 'रियल' कडे जाईल त्याचीच गरज. मग 'रियल'च्या सहाय्याने पुढे होऊन जाईल. हे 'रियल' मिळाले तर 'रिलेटिव' मिळेलच ! सर्व जगाचे कल्याण करा अशी भावना ठेवायची. हे गाण्या साठी बोलायचे नाही, भावना भावावी. हे तर लोक गाण्या साठी गातात, जसे श्लोक बोलतात तसे.
प्रश्नकर्ता : अगदीच रिकामी बसलेला असेल त्यापेक्षा अशी भावना भावली तर ते उत्तम म्हणायचे?
दादाश्री : खूप चांगले, वाईट भाव तर उडून गेले ! ह्यातून जेवढे झाले तेवढे खरे, तेवढे तर कमावले !
प्रश्नकर्ता : ह्या भावानांना मिकेनिकल भावना म्हणता येईल?
दादाश्री : नाही, मिकेनिकल कसे म्हणायचे? मिकेनिकल तर, अति प्रमाणात, स्वता:चे लक्ष ही नसेल आणि असेच बोलत राहीला तेंव्हा ते मिकेनिकल झाले म्हणायचे.
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
२६
भावना सुधारे जन्मोजन्म
ह्यात करायचे काही नाही
प्रश्नकर्ता : ह्यात लिहले आहे की 'मला शक्ति द्या, शक्ति द्या. तर असे वाचले तर आपल्याला शक्ति मिळून जाईल ?
दादाश्री : अवश्य ! हे ‘ज्ञानी पुरूष' चे शब्द आहेत!! पंतप्रधानांची चिठ्ठी असेल आणि येथील एका व्यापाऱ्याची चिठ्ठी असेल, त्यात फरक नाही?! का बोलले नाही तुम्ही? म्हणजे हे 'ज्ञानी पुरुष' चे आहे. यात बुद्धि वापरली तर माणूस वेडा होऊन जाईल. ह्या तर बुद्धि बाहेरच्या वस्तु आहेत. प्रश्नकर्ता : परंतु अमलात आणण्यासाठी त्यात लिहीले आहे, तसे करावे लागेल ना?
दादाश्री : नाही, हे वाचायचे फक्त. अमलात, आपणहूनच येऊन जाईल, म्हणून हे नव कलमांचे पुस्तक तुम्ही बरोबरच ठेवायचे आणि रोज वाचायचे. तुम्हाला ह्यातील सर्व ज्ञान समजेल. हे रोज वाचता वाचता त्याची प्रेक्टिस होऊन जाईल. ते रूप होऊन जाणार तुम्ही. आज तसे माहित नाही पडणार की यात मला काय फायदा झाला ! पण हळू-हळू तुम्हाला 'एक्झेक्ट' होऊन जाईल.
ही शक्ति मागितल्याने मग त्याचे फळ येऊन उभे राहिल वर्तनामध्ये. म्हणून तुम्ही 'दादा भगवान' जवळ शक्ति मागायची. आणि अपार, अनंत शक्ति आहे 'दादा भगवान' जवळ. जे मागाल ते मिळेल अशी ! म्हणून हे मागण्याने काय होईल?
प्रश्नकर्ता : शक्ति मिळेल !
दादाश्री : होय, हे पाळायची शक्ति येईल तेव्हा मग पाळता येईल. हे असेच नाही पाळता येणार. म्हणून तुम्ही ही शक्ति माग माग करायची. दुसरे काही करायचे नाही, लिहिले आहे तसे एकदम होत नाही आणि ते होणार पण नाही. तुमच्याने जेवढे होईल तेवढे जाणावे की एवढे होते आहे
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
२७
नी एवढे होत नाही, त्याची क्षमा मागावी. आणि त्याच बरोबर ही शक्ति मागावी म्हणजे शक्ति मिळेल.
शक्ति मागून साधा काम
एका भाऊला मी सांगितले की, ह्या नव कलमांत सर्व येऊन गेले. यात काही बाकी ठेवले नाही. 'तुम्ही ही नव कलमे रोज वाचत जा !' तेंव्हा ते म्हणाले 'पण तसे होणार नाही.' मी सांगितले, मी करायला नाही सांगत, होणार नाही असे का म्हणता आहात? तुम्ही तर एवढेच म्हणायचे की, 'हे दादा भगवान, मला शक्ति द्या.' शक्ति मागायचे सांगतो. तेंव्हा म्हणे, 'हे तर मजा येईल !' लोकांनी तर करायला शिकविले आहे.
मग मला म्हणाले, 'ही शक्ति कोण देईल?' मी सांगितले, 'शक्ति मी देईन.' तुम्ही मागाल त्या शक्ति मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्हाला स्वता:ला मागताच नाही येत, त्यामुळे मला शिकवावे लागते की ह्या रीतीने शक्ति मागा. नाही शिकवावे लागत? पहा ना, हे शिकविलेच आहे ना सर्व? हे माझे शिकविलेलेच आहे ना? तेव्हा ते समजून गेले, आणि मग म्हणाले की एवढे तर होईल, ह्यात सर्व आले !
हे करायचे नाही तुम्हाला. तुम्ही काहीही करायचे नाही. निवांतपणे रोजच्या पेक्षा दोन चपात्या जास्त खा, पण ही शक्ति मागा. तेंव्हा मला म्हणाले, 'ही गोष्ट मला आवडली.'
__ प्रश्नकर्ता : पहिली तर हीच शंका असते की शक्ति मागीतली तर मिळणार की नाही?
दादाश्री : हीच शंका खोटी ठरत असते. आता तुम्ही ही शक्ति मागत असतात ना ! म्हणजे ती तुमची शक्ति आत उत्पन्न झाली की मग ती शक्तिच कार्य करुन घेईल. तुम्हाला करायचे नाही. तुम्ही कराल तर ईगोईझम (अहंकार) वाढेल. 'मी करायला जातो पण होत नाही' असे होईल. म्हणून ती शक्ति मागा.
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
२८
भावना सुधारे जन्मोजन्म
प्रश्नकर्ता : ह्या नव कलमांत आपण शक्ति मागतो की असे नाही करायचे, नाही करावयाचे की नाही अनुमोदायचे, म्हणजे याचा अर्थ असा की भविष्यात असे होऊ नये त्यासाठी आपण शक्ति मागतो की आपली मागचे केलेले सर्व (दोषं) धुऊन जाण्यासाठी आहे हे?
दादाश्री : ते धुतले जाईल आणि शक्ति उत्पन्न होईल. शक्ति तर आहेच, पण ते (मागचे दोष) धुतले गेल्याने ती शक्ति व्यक्त होते. शक्ति तर आहेच पण व्यक्त झाली पाहिजे. त्यामुळे दादा भगवानची कृपा मागत आहोत, हे आपले (दोष) धुतले जाईल तर शक्ति व्यक्त होईल.
प्रश्नकर्ता : हे सर्व वाचले तेव्हा कळले की ही तर एक जबरदस्त बात आहे. लहान मनुष्य ही समजून गेला तर सर्व जीवन त्याचे सुखमय होऊन जाईल.
दादाश्री : होय, बाकी समजण्या सारखी गोष्टच त्याला मिळालेली नाही. हे पहिल्यांदा स्पष्ट समजण्या सारखी बात मिळत आहे. आता हे मिळाले तर उलगडा होऊन जाईल.
ही नव कलमे आहेत, त्यात आपणहून आपल्याने जेवढी पाळली जात असतील त्याची हरकत नाही. पण नाही पाळली जात असेल, त्याचा मनात खेद ठेवायचा नाही. फक्त तुम्हाला तर हे म्हणायचे की मला शक्ति द्या. ती शक्ति एकत्र होत राहिल. आत शक्ति जमा होत राहिल. नंतर मग काम आपणहून होऊन जाईल. तुम्ही शक्ति मागाल तर ही सर्व नव कलमे सेट होऊन जाणार. अर्थात् फक्त बोललात तरी खूप होऊन गेले. बोललो म्हणजे शक्ति मागीतली नी म्हणजे शक्ति मिळाली.
___'भावना' पासून भावशुद्धि प्रश्नकर्ता : आपण तर सांगतात ना की हुक्का पीत जातो पण आत वेगळे चालत असत की नाही प्यायचे, नाही पाजायचे, की पिणाऱ्याचे प्रत्ये नाही अनुमोदायचे...
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
दादाश्री : होय, त्याचा अर्थ एवढाच की, 'आपण ह्यात सहमत नाही' असे सांगत आहोत. अर्थात् आपण वेगळे आहोत. आणि हुक्का आपणहून सुटून जाईल तेव्हा खरे. पण आता आपण त्याला चिकटले नाही आहोत, ते आपल्याला चिकटले आहे. त्याची मुदत पूर्ण झाली म्हणजे जाईल असे सांगत आहोत. एका बाजूला हुक्का पीत असाल आणि एका बाजूला ही भावना बोलाल, तर प्यालेले उडून जाईल आणि ह्या भाव ची सुरूवात झाली.
लोकं म्हणतात की, 'या साहेब, या साहेब' पण त्यांच्या मनात काय असते की आता कुठून टपकले? तर आपण काय म्हणतो की हुक्का पीत आहे पण 'असे नाही झाले पाहिजे.' अर्थात् लोकं ह्याहून उलट बोलतात. बाहेर 'या बसा' म्हणतात आणि आत (मनात) म्हणतात की 'हे कुठून टपकले?' तर लोकं सुधारलेले बिघडवतात परंतु आपण बिघडलेले सुधारत असतो.
प्रश्नकर्ता : संपूर्ण अक्रम विज्ञानची अजबच (गोष्ट) आहे ही की बाहेर बिघडले आहे आणि आत सुधारत आहोत.
दादाश्री : होय, म्हणजे संतोष राहतो ना आपल्याला ! की जरी हा घाणा बिघडून गेला तर बिघडून गेला पण आता नवीन घाणा तर चांगला होईल. एक घाणा बिघडून गेला, पण नवीन तर चांगले होईल ना? तेव्हा लोक काय म्हणतात? 'हे आहे तोच घाणा सुधारायचे आहे.' अरे भानगड सोड आता, जाऊ दे, नाहीतर नवीन ही बिघडून जाईल. हे तर घाणा ही गेला नी तेल ही गेले.
प्रश्नकर्ता : आताचे जे बिघडले आहे त्याचे जबाबदार आपण नाही. हे गेल्या अवतारचे परिणाम आहे.
दादाश्री : होय, आज आपण जबाबदार नाही. आज ती सत्ता दूसऱ्याच्या हातात आहे. जबाबदारी आपल्या हातात नाही न ! हे तर
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
फिरणारच नाही, मग उगीचच हाय-हाय का करता? ! पण तेथे तर गुरु महाराज म्हणतील, 'जर असे झाले नाही तर येऊ नाही देणार.' तेव्हा तो काय म्हणेल, ‘पण साहेब, मला तर खूप करायचे आहे पण नाही होत, त्याला काय करु?' म्हणजे हे समजल्या विनाच थापा- थापी चालत आहे.
३०
प्रश्नकर्ता : हे तर जेव्हा प्रकृति एकदम उलट-पुलट करुन टाकते ना. तेव्हा त्याला आत जबरदस्त सफोकेशन ( घुसमट) होते.
दादाश्री : अरे ते इथपर्यंत होते की पाच पाच दिवस पर्यंत खात नाही. अहो, तो कोणाचा गुन्हा, नी कोणाला मार मार करतात ! पोटाला कशाला मारता ! गुन्हा मनाचा आणि मारतो पोटाला. म्हणेल 'खाने का नहीं तुम्हें.' तर हा काय करेल बिचारा? ! शक्ति निघून जाते ना बिचाऱ्याची. त्याने खाल्ले असेल तर दुसरे काही कार्य करु शकेल. म्हणून मग आपले लोक म्हणतात, रेड्याच्या चुकीमुळे पखाल्याला कशाला डाग देता?! चूक रेड्याची आहे,(म्हणजे) मनाची आहे आणि ह्या पखालचीचा, (म्हणजे) देहाचा बिचाऱ्याचा काय गुन्हा? !
आणि बाहेर झटक झटक केल्याने काय फायदा होणार? जे आपल्या सत्तेतच नाही ना ! मग विना कारणी बोंबाबोंब करण्याचा काय अर्थ? पण आतील सर्व कचरा साफ करावा लागेल, आतील सर्व धुवावे लागेल. हे तर बाहेरचे धुऊन टाकतात, गंगेत जातात तरी ही देहालाच डूबव डूबव करुन उजळ करतात. अरे, देहाला उजळून काय काम आहे ? ! मनाला उजळायचे ना ! मनाला, बुद्धिला, चित्तला, अहंकारला, ह्या सर्वांना, अंत:करणला उजळावयाचे आहे. ह्यात साबण ही कधी घातला नाही. मग तर बिघडून जाईल की नाही बिघडणार?
लहान वय असते तो पर्यंत चांगले राहते. मग दिवसें-दिवस बिघडते आणि कचरा पडतो. म्हणून आपण काय सांगतो की (येथे ) तुझे आचार बाहेर ठेवत जा आणि हे घेत जा. हे सर्व खोटे आहे ते बाहेर
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
ठेवत जा आणि हे नव कलमे भावीत जा, तर येणारा भव होऊन गेला उत्तम !
प्रश्नकर्ता : हे 'ज्ञान' नसेल घेतले ते लोक पण अशा रीतीने आचार परिवर्तन करु शकतात ना?
दादाश्री : होय, सर्व परिवर्तन करु शकतात. वाटेल त्याला बोलायची सुट आहे.
प्रश्नकर्ता : काही वाईट झाले तर तद्-नंतर ते धुऊन टाकण्यासाठी नव कलमे हे जबरदस्त उपाय आहे.
दादाश्री : मोठा पुरुषार्थ आहे हे तर. मोठ्यातले मोठे विज्ञान आम्ही उघड केले आहे हे. पण आता लोकांना समजले पाहिजे ना ! म्हणून कर्तव्यबंध केले की एवढे तुम्हाला करायचे. जरी समजत नसेल तरी हे (नव कलमांचा औषध) पिऊन टाकना !
प्रश्नकर्ता : आतील रोग खलास होतील.
दादाश्री : होय खलास होऊन जातील. 'दादा' म्हणाले की 'वाचा' म्हणजे वाचायचे फक्त. खूप झाले ! हे तर पचवण्यासाठी नाही. हे तर पुडी विरघळून पी आणि मग ऐटीत फिरण्या सारखे आहे !
प्रश्नकर्ता : ही गोष्ट खरी आहे की भाव केल्याने पात्रता वाढते?
दादाश्री : भाव हाच खरा पुरुषार्थ आहे. हे दुसरे सर्व ठावठिकाणा बिगरच्या गोष्टी आहेत. कर्तापद हे बंधनपद आहे आणि हे भाव तर सोडवणारे पद आहे. 'असे करा, तसे करा, अमके करा' त्याने तर लोकं बांधली गेली ना !
भावना फळेल येत्या जन्मामध्ये प्रश्नकर्ता : तर जेव्हा असा प्रसंग बनला की आपल्याने कोणाच्या
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
अहंकाराचे प्रमाण दुभावले, अशा प्रसंगी तेथे ही कलमे वापरायची की कोणाच्या पण अहम् चे प्रमाण नाही दुभावणार ...
दादाश्री : तेव्हा तर आपण चंदूभाईला सांगावे की, 'भाऊ प्रतिक्रमण करा, त्याला दुःख झाले त्याबद्दलचे.' आणि इतर लहान-सहान बाबतीत तर झंझट नाही करायची. जर अहम् दुभावेल अशी खूप भारी लक्षणे नसतील, परंतु थोडे दुःख झाले असेल तर आपण प्रतिक्रमण करवून घ्यायचे.
__ हे तर भावना भावायची आहे. अजून एक अवतार तर राहिला ना, तेव्हा ही भावना फळ देईल. तेव्हा तर भावनारूपच होऊन गेला असाल तुम्ही. जशी भावना लिहली आहे, तसेच वर्तन असेल, पण येत्या जन्मामध्ये ! आताच बी टाकले आणि आताच तुम्ही म्हणाल की 'आण, खोदून खाऊन टाकू आतून' ते नाही चालणार.
प्रश्नकर्ता : परिणाम ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात येणार?
दादाश्री : होय, अजून एक-दोन अवतार राहिले आहेत बाकी, तेवढ्यासाठी हे बी टाकत आहे. तर ते पुढच्या जन्मामध्ये 'क्लिअर येईल.' हे तर बी टाकायचे असेल त्यांच्यासाठी आहे.
प्रश्नकर्ता : तर हे निरंतर म्हणजे जेव्हा जेव्हा प्रसंग येईल त्या प्रमाणे?
दादाश्री : नाही, त्या प्रसंगाला आणि भावनाला काही घेणे-देणे नाही. प्रसंग निराधार आहे बिचारा ! आणि ह्या भावना तर आधारी वस्तु आहेत. ह्या भावना तर सोबत येणाऱ्या आहेत आणि प्रसंग तर जात राहतील.
प्रश्नकर्ता : पण प्रसंगाच्या आधारानेच ही भावना करु शकतो ना?
दादाश्री : नाही प्रसंगाला काही घेणे-देणे नाही. भावनाच सोबत येणारी. प्रसंग हे निराधार आहेत, ते जात राहणारे आहेत. कसा ही चांगला
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
प्रसंग असेल तो सुद्धा जात राहणार, कारण हे संयोग प्राप्त झालेले आहेत. आणि ही भावना भाववायची आहे. त्याचा संयोग जमायचा अजून बाकी आहे (पुढच्या जन्मात).
३३
प्रश्नकर्ता : पण त्या प्रसंगामुळे जे स्वता:चे भाव बदलतात, तेंव्हा ही भावना वापरुन पुन्हा भाव फिरवायचा ना?
दादाश्री : पण ते काही हेल्प नाही करत. पूर्वी जेवढे केलेले असेल, ते आता हेल्प करेल. होय, असे बनेल की थोडे पूर्वी केलेले असेल तरच मग ह्या भवामध्ये सर्व काही परिवर्तन होईल.
प्रश्नकर्ता : म्हणजे प्रसंगात तर मागच्या जन्मात जसे भाव असतील तसेच परिमाम येईल ?
दादाश्री : तसेच परिणाम येणार. दुसरे नाही येणार. भाव म्हणजे बी आणि द्रव्य म्हणजे परिणाम, कणीस. एक बाजरीचा दाणा टाकला, तर एवढे मोठे कणीस होईल.
ही कलमे तर फक्त बोलायचीच आहेत. रोज भावनाच भावायची आहे. हे तर बी रोपायचे आहे. रोपल्यानंतर मग जेव्हा फळ येईल तेव्हा पाहून घ्यायचे. तो पर्यंत खत घालायचे. बाकी ह्या प्रसंगात तर असे काही फिरवायचे नाही. आणि हे जे आहे ते जुने आहे तेच आहे.
म्हणजे हे नव कलमे काय म्हणतात ? ' हे दादा भगवान मला शक्ति द्या.' तेव्हा लोक काय म्हणतात ? ' हे तर पाळता येईल असे नाही आहे. ' अरे, पण हे करायचे नाही. मग कशासाठी वेडेपणा करतोस ! या जगात सगळेच सांगतात की 'करा करा करा. ' अरे करायचे नसतेच, जाणायचेच असते. आणि मग, 'मला असे नाही करायचे आणि त्याचा मी पश्चाताप करत आहे.' असे ‘दादा भगवान' जवळ माफी मागायची. आता 'असे नाही करायचे' असे बोलले तेथूनच आपला अभिप्राय वेगळा होऊन गेला. मग
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
३४
भावना सुधारे जन्मोजन्म
करत असेल त्याची हरकत नाही. पण अभिप्राय वेगळा पडला म्हणजे सुटलात ! हे मोक्षमार्गाचे रहस्य आहे, ते जगाच्या लक्षात येत नाही ना !
प्रश्नकर्ता : ही लोकं डिस्चार्ज मध्येच फेरफार मागत आहे, परिणाम मध्ये फेरफार करायला मागत आहे?
दादाश्री : होय, म्हणजे जगाला ह्या लक्ष्यची माहितीच नाही, हे भानच नाही. मी त्याला अभिप्रायपासून मुक्त करायला मागत आहे. आता, 'हे खोटे आहे' असा तुमचा अभिप्राय बसून गेला. कारण की आधी 'हे
खरे आहे' असा अभिप्राय होता आणि तेथून संसार उभा राहिला आणि आता 'हे खोटे आहे' असा अभिप्राय झाला, तर मुक्त झाला. आता हा अभिप्राय पुन्हा कधी, कोणत्या ही संयोगात बदलायला नाही पाहिजे.
ही नव कलमे रोज बोलाल ना, तर मग हळू-हळू कोणा बरोबर भांडण-तंटा नाही राहणार. कारण की स्वता:चा भाव तुटून गेला आहे. आता जे 'रिएक्शनरी' (प्रत्याघाती) आहे तेवढे फक्त राहिले आहे. ते हळू-हळू कमी होत जाईल.
___ महात्मांच्या साठी, ते चार्ज की डिस्चार्ज? प्रश्नकर्ता : भाव आणि भावना ह्या दोघां मध्ये काय फरक?
दादाश्री : चंदूभाई मध्ये हे दोघे ही आलेत ! पण खरं बोललात, भाव आणि भावना मध्ये डिफरन्स आहे.
प्रश्नकर्ता : भावना पवित्र असते आणि भाव चांगला पण असेल आणि वाईट पण असेल.
दादाश्री : नाही, भावना पवित्र असते असे नाही. भावना अपवित्रला पण लागू होते. कोणाचे घर जाळून टाकण्याची भावना होते आणि कोणाचे घर बांधून देण्याची भावना होते. म्हणजे भावना दोन्हीकडे वापरली जाते पण भाव हे चार्ज आहे आणि भावना ही डिस्चार्ज आहे.
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
आपल्याला जे आत होते की मला असे करण्याचा भाव झाला आहे, असे करायचे आहे, ही पण भावना आहे हे भाव नाही. वास्तवात भाव तर चार्ज होत असते त्याला म्हणतात.
म्हणजे भावकर्मामुळे हे जग उभे झाले आहे. आपल्याने जरी कोणती वस्तु नाही झाली, तरी पण भाव तर ठेवायचा तसा. आपल्याकडे (अक्रम मार्गात) भावकर्म(चार्ज) उडवून दिला आहे. बाहेरच्या लोकांनी भावकर्म केले पाहिजे. म्हणून शक्ति मागायला पाहिजे. ज्याला जी पाहिजे असेल ती शक्ति दादा भगवान जवळ मागायला पाहिजे.
प्रश्नकर्ता : बाहेरच्या जगातले जे लोक आहेत, त्यांनी ही शक्ति मागायला पाहिजे, तर आपले (ज्ञान घेतलेले) महात्मा जे शक्ति मागत असतात, भावना करतात ते कशा मध्ये जाते?
दादाश्री : महात्मा मागतात, ते त्यांचा डिस्चार्ज मध्ये आहे. कारण की भावना दोन प्रकारच्या आहेत, चार्ज आणि डिस्चार्ज दोन्ही. जगाच्या व्यवहारात लोकांना सुद्धा भावना असतात आणि येथे आपल्यालाही भावना असतात. परंतु आपली भावना डिस्चार्जरूपाने आहे. आणि त्यांना डिस्चार्ज आणि चार्ज दोन्ही रूपात भावना असतात. पण शक्ति मागण्यात नुकसान काय आहे?
प्रश्नकर्ता : बाहेरचे लोक ही शक्ति मागतात नव कलमांची, तर ते भाव म्हणायचे तर महात्मा शक्ति मागतात ते भाव नाही म्हणायचे?
दादाश्री : बाहेरच्या लोकांसाठी ते भाव म्हणायचे आणि आपल्या महात्मांसाठी ती भावना. गोष्ट खरी आहे. त्यांच्यासाठी भाव म्हणायचे, चार्ज म्हणायचे. आणि महात्मांसाठी हे डिस्चार्ज म्हणायचे, भाव नाही म्हणायचे.
भाव, एक्झेक्ट डिझाईनपूर्वक ! प्रश्नकर्ता : ही नव कलमे आहेत, तर ह्या नव कलमां मध्ये जसे
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
३६
भावना सुधारे जन्मोजन्म
सांगितले आहे त्याच प्रमाणे तर आमची भावना आहे, इच्छा आहे, सर्व आहे अभिप्राय ही आहे.
दादाश्री : पूर्वी करत होतात त्या प्रमाणे तसे वाटते खरे पण ते तसे नसते. त्या बाजूला वळण आहे ही गोष्ट नक्की. पण ते वळण नीट ह्या प्रकारे असले पाहिजे. डिझाईनपूर्वक असले पाहिजे. वळण तर असते, साधू-संन्यासींना हैराण नाही करण्याची इच्छा असतेच ना ! पण ते डिझाईनपूर्वक असले पाहिजे.
प्रश्नकर्ता : डिझाईनपूर्वक म्हणजे कशा रीतीने दादा?
दादाश्री : त्यात जसे लिहले आहे त्या प्रमाणे, एक्झेक्टनेस.(यथार्थ रूपाने.) बाकी असे तर मला साधू-संतांना हैराण नाही करायचे असे असते, पण तरी सुद्धा ते हैराण करतातच. त्याचे कारण काय आहे? तेव्हा म्हणे, डिझाईनपूर्वक नाही आहे त्यांचे. ते डिझाईनपूर्वक असेल तर असे नाही होणार.
प्रश्नकर्ता : हे जे नव कलमे आहेत ते समजपूर्वक जीवनात आणली पाहिजे?
दादाश्री : नाही, तसे नाही. समजपूर्वक आणायचे नाही. आम्ही काय सांगत आहोत की हे आम्ही जे बोलत आहोत ती शक्ति मागा फक्त. ती शक्तिच तुम्हाला एक्झेक्टनेस मध्ये आणून ठेवेल. तुम्हाला समजपूर्वक करायचे नाही आहे. हे होणारच नाही. समजपूर्वक माणूस करु शकत नाही. जर समजून करायला जाईल तर होणार नाही. निसर्गाला सोपवून द्यायचे. म्हणून हे दादा भगवान शक्ति द्या.' शक्ति ईटसेल्फ उगेल. नंतर मग एक्झेक्ट
येईल.
खूप उंच वस्तु आहे ही. परंतु जो पर्यंत समजले नाही तो पर्यंत सगळे असेच !
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
३७
कशासाठी हे मी बोललो असेल की शक्ति मागा, शक्ति द्या असे? स्वताः डिझाईन करु शकत नाही. मुळ डिझाईन कशा रीतीने करु शकणार?! अर्थात् ही ईफेक्ट आहे(मागील कारणांचे परिणाम आज आले आहे.) ही जी शक्ति मागत आहोत ते कॉझ(कारण) आहे आणि नंतर येईल ते ईफेक्ट. (परिणाम.) ती ईफेक्ट पण कोणा मार्फत येते? दादा भगवानच्या मार्फत योजीले आहे. ईफेक्ट भगवानच्या श्रू(मार्फत) यायला पाहिजे.
म्हणून नव कलमां प्रमाणे शक्ति मागतच राहिले तर आपणहून च नव कलमां मध्ये राहणार मग. खूप वर्षा नंतर.
जग संबंधातून सूटण्यासाठी.... प्रश्नकर्ता : ही जी नव कलमे दिली आहेत ती विचार, वाणी आणि वर्तन यांच्या शुद्धते साठी दिली आहेत ना?
__दादाश्री : नाही, नाही. ह्यात त्याची गरजच नाही. अक्रम मार्गात ती गरजच नाही. ही नव कलमे तर अनंत अवतारांचा सगळ्यां बरोबर तुमचा जो सर्व हिशोब बांधलेला आहे तो सुटून जाण्यासाठी दिली आहे. वहीखाते चोख करण्यासाठी दिली आहेत.
___ म्हणून ही नव कलमे आहेत ते बोलाल तर बांधलेले तार सुटून जातील. लोकांच्या बरोबर ज्या ऋणानुबंधच्या तारी बांधलेल्या आहे ते तुमचा मोक्ष होऊ देत नाही. तर हे ऋणानुबंधचे तार सुटण्यासाठी ही नव कलमे आहेत.
__हे बोललात म्हणजे तुमची आता पर्यंतची जे दोषं होऊन गेलीत ते सगळे ढीले होऊन जातील बोलल्याने, आणि मग त्याचे फळ तर येणारच. सर्व दोष जळालेल्या दोरी सारखे होऊन जातात, ते असा हात लावल्या बरोबरच गळून पडतील.
प्रश्नकर्ता : दोषांचे प्रतिक्रमण करण्यासाठी आम्ही नव कलमे रोज बोलत राहिलो तर त्यात शक्ति खरी का?
.
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
३८
भावना सुधारे जन्मोजन्म
दादाश्री : तुम्ही नव कलमे बोलणे हे वेगळे आहे आणि प्रतिक्रमण करणे हे वेगळे आहे, जे दोष होतील त्याचे प्रतिक्रमण तर रोजच करायचे.
हे तर अनेक अवतारां पासून लोकां बरोबर जी खिटपीट झाली असेल ते सर्व ऋणानुबंध ह्या नव कलमे बोलण्याने सुटून जातील. हे प्रतिक्रमण आहे, मोठ्यात मोठे प्रतिक्रमण आहे. ह्या नव कलमां मध्ये सर्व पूर्ण जगाचे प्रतिक्रमण येऊन जाते. चांगल्या रीतीने करा. आम्ही तुम्हाला दाखवून देतो, मग आम्ही आमच्या देशात (मोक्षात) निघून जाणार ना !
वर्तली नव कलमे दादांना जीवनभर !
असे आहे की ह्या काळाच्या हिशोबाने लोकांना शक्ति नाही. ही जेवढी शक्ति आहे तेवढेच दिले आहे. एवढी भावना भावेल, त्यांस पुढच्या जन्मात मनुष्यपणा जाणार नाही याची गॅरन्टी देतो. नाही तर आज ऐंशी टक्का मनुष्यपणा नाही राहणार असे होऊन गेले आहे.
आपली ही नव कलमे आहेत ना ह्यात मोठ्यात मोठ्या भावना आहेत. सर्व संपूर्ण सार येऊन जातो. ही नव कलमे आम्ही संपूर्ण जीवनभर पाळत आलो, तर ही पूंजी आहे आमची. अर्थात् हा माझा रोजचा माल, तो मी बाहेर ठेवला शेवटी, लोकांचे कल्याण होवो त्यासाठी. निरंतर कितीतरी वर्षांपासून, चाळीस चाळीस वर्षांपासून ही नव कलमे दररोज आतमध्ये चालतच आहेत. ते पब्लिकसाठी मी जाहिर केले.
प्रश्नकर्ता : आज तर आम्ही 'हे दादा भगवान मला शक्ति द्या' असे करुन बोलतो, तर ही नव कलमे आपण कोणास म्हणत होता?
दादाश्री : हे 'दादा भगवान' नाही असेल, तर दुसरे नांव असेल पण नांव असेलच. त्यांनाच उद्देशून म्हणत होतो. मग ते शुद्धात्मा म्हणा की जे काही म्हणा ते. हे त्यांनाच उद्देशून म्हणत होतो.
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
क्रमिक मार्गात एवढे मोठे शास्त्र वाचतात आणि येथे ही फक्त नव कलमे बोलतात तरी खूप होऊन गेले ! नव कलमां मध्ये एवढी काही गजबची शक्ति ठेवली आहे. एवढी काही गजबची शक्ति आहे पण ती समजत नाही ना ! हे तर आम्ही समजवतो तेव्हा समजते. आणि ह्याची किंमत समजली मी कोणाला म्हणेल की मला येऊन तो सांगेल की, 'ही नव कलमे मला खूप आवडली' आणि समजण्या सारखी आहेत सर्व नव कलमे.
३९
ही नव कलमे शास्त्र मध्ये नाही. पण आम्ही जे पाळत आहोत आणि कायम आमच्या अमलातच असतात, ते तुम्हाला करायला देतो. ते आम्ही ज्या रीतीने वर्तत आहोत, त्या रीतीने ही नव कलमे लिहली आहे. ह्या नव कलमां प्रमाणे आमचे वर्तन असते, तरी ही आम्ही भगवान नाही गणले जात. भगवान तर आतमध्ये भगवान आहेत तेच ! बाकी माणूस असा वर्तन करु शकत नाही.
चौदालोकचे सार आहे एवढ्या मध्ये. ही नव कलमे लिहली आहेत त्यात चौदालोकचे सार आहे. संपूर्ण चौदालोकचे जे दही आहे त्याला घुसळले आणि हे लोणी काढून मी ठेवले आहे. म्हणून हे सर्व किती पुण्यशाली आहेत की (अक्रम मार्गच्या ) लिफ्ट मध्ये बसल्या बसल्या मोक्षात जात आहेत. हो, फक्त हात बाहेर काढायचा नाही एवढी अट !
ही नव कलमे तर असतच नाही कोणत्याही जागी. नव कलमे तर पूर्ण पुरुष लिहू शकेल आणि ते असतच नाही ना, ते असतील तर लोकांचे कल्याण होऊन जाईल.
वीतराग विज्ञानाचे सार
आणि ही भावना करते वेळी कसे असायला पाहिजे? वाचते वेळी शब्द-न-शब्द असे दिसायला पाहिजे. अर्थात् 'तुम्ही वाचत आहात' असे तुम्हाला ' दिसले ' तर तुम्ही दुसऱ्या जागी गुंतलेले नाही. ही भावना भावते
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
भावना सुधारे जन्मोजन्म
वेळी तुम्ही दुसऱ्या जागी गुंतलेले नाही असायला पाहिजे. आम्ही एक क्षण देखिल दूसऱ्या जागी जात नाही. त्या मार्गावर तुम्हाला यावे लागेल ना? ज्या जागेवर आम्ही आहोत तिथेच ! ही भावना भावली म्हणजे पूर्ण होऊ लागतो. भावना तर एवढीच करण्या सारखी आहे.
हो, मन-वचन-कायाच्या एकतेने बोलाल ती भावना. म्हणून आता ही नव कलमे तर तुम्ही अचूक करायची. खास करा हे. संपूर्ण वीतराग विज्ञानाचा सार आहे ही नव कलमे ! आणि प्रतिक्रमण-प्रत्याख्यान सर्व ह्यात येऊन गेले. ही अशी नव कलमे निघाली नाही कोणत्या ही जागी. जसे हे ब्रह्मचर्य चे पुस्तक निघाले नाही, तसे ही नव कलमे ही नाही निघाली. नव कलमे जर वाचली ना, ही भावना भावली ना तर दुनियेत कोणा बरोबर ही वैर नाही राहणार, सर्वां बरोबर मैत्री होऊन जाईल. ही नव कलमे तर सर्व शास्त्रांचे सार आहे.
जय सच्चिदानंद
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
नमस्कार विधि
प्रत्यक्षं दादा भगवानां'च्या साक्षीने वर्तमानात महाविदेह क्षेत्रात विचरत असणारे, तीर्थंकर भगवान ' श्री सीमंधर स्वामीं'ना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (४०)
प्रत्यक्ष ‘दादा भगवानां'च्या साक्षीने वर्तमानात महाविदेह क्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात विचरत असणारे 'ॐ परमेष्टि भगवंतांना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) प्रत्यक्ष ‘दादा भगवानां'च्या साक्षीने वर्तमानात महाविदेह क्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात विचरत असणारे 'पंच परमेष्टि भगवंतां'ना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) प्रत्यक्ष ‘दादा भगवानां'च्या साक्षीने वर्तमानात महाविदेह क्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात विहरमान 'तीर्थंकर साहेबां' ना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) वीतराग शासन देव-देवींना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (4) निष्पक्षपाती शासन देव-देवींना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (4) चोवीस तीर्थंकर भगवंतांना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) ‘श्रीकृष्ण भगवानां'ना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (५) भरतक्षेत्रात सद्या विचरत असणारे सर्वज्ञ ' श्री दादा भगवानां' ना निश्चयाने अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (4) ‘दादा भगवानां' च्या सर्व समकितधारी महात्मांना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे. (4)
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
* संपूर्ण ब्रह्मांडच्या जीवमात्रच्या 'रियल' स्वरूपला अत्यंत भक्तिपूर्वक
नमस्कार करीत आहे. 'रियल' स्वरूप हे भगवत स्वरूप आहे तेव्हा संपूर्ण जगा ला 'भगवत स्वरूपात' दर्शन करीत आहे. 'रियल' स्वरूप हे शुद्धात्मा स्वरूप आहे, तेंव्हा संपूर्ण जगा ला
शुद्धात्मा स्वरूपात दर्शन करीत आहे. * 'रियल' स्वरूप हे तत्त्व स्वरूप आहे, तेंव्हा संपूर्ण जगा ला
तत्त्वज्ञानाने दर्शन करीत आहे. (वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामींना परम पूज्य ‘दादा भगवानां' च्या माध्यमातून प्रत्यक्ष नमस्कार पोहचतो. कंसात लिहलेल्या संख्या आहेत तेवढे वेळा दिवसातून एकदा वाचायचे.)
प्रतिक्रमण विधि प्रत्यक्ष 'दादा भगवान' साक्षीने देहधारी * च्या मन-वचन-कायाचा योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्महून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान ! आपल्या साक्षीने आजच्या दिवसाच्या अद्यक्षण पर्यंत जे जे ... ★ ★ ... दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, पश्चाताप करत आहे. आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान करत आहे आणि परत असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करत आहे, मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा.
हे दादा भगवान! मला असे कुठले ही दोष न करण्याची परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या. * ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या (समोरच्या) व्यक्तिचे नांव म्हणायचे. ** जे दोष झाले असतील ते मनात जाहीर करणे.
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
(दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके)
मराठी १. भोगतो त्याची चूक
६. क्रोध २. एडजेस्ट एव्हरीव्हेअर
७. चिंता ३. जे घडले तोच न्याय
८. प्रतिक्रमण ४. संघर्ष टाळा
९. भावना सुधारे भवोभव ५. मी कोण आहे?
हिन्दी ज्ञानी पुरुष की पहचान
२२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य २. सर्व दुःखों से मुक्ति
२३. दान ३. कर्म का सिद्धांत
२४. मानव धर्म ४. आत्मबोध
२५. सेवा-परोपकार ५. मैं कौन हूँ?
२६. मृत्यु समय, पहले और पश्चात ६. वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर स्वामी २७. निजदोष दर्शन से... निर्दोष ७. भुगते उसी की भूल
२८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार ८. एडजस्ट एवरीव्हेयर
२९. क्लेश रहित जीवन ९. टकराव टालिए
३०. गुरु-शिष्य १०. हुआ सो न्याय
३१. अहिंसा ११. चिंता
३२. सत्य-असत्य के रहस्य १२. क्रोध
३३. चमत्कार १३. प्रतिक्रमण
३४. पाप-पुण्य १४. दादा भगवान कौन?
३५. वाणी, व्यवहार में... १५. पैसों का व्यवहार
३६. कर्म का विज्ञान १६. अंत:करण का स्वरूप
३७. आप्तवाणी - १ १७. जगत कर्ता कौन?
३८. आप्तवाणी - ३ १८. त्रिमंत्र
३९. आप्तवाणी - ४ १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ४०. आप्तवाणी - ५ २०. प्रेम
४१. आप्तवाणी - ६ २१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ४२. आप्तवाणी - ८
दादा भगवान फाउन्डेशन च्या द्वारे गुजराती आणि अंग्रजी भाषे मध्ये सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे। वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित करीत आहे।
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
प्राप्तिस्थान
दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर संकुल, सीमंधर सिटी, अहमदाबाद- कलोल हाईवे,
पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421.
फोन : (079) 39830100, E-mail : info@dadabhagwan.org अहमदाबाद : दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेज के पीछे
उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल),
पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9274111393 भुज
त्रिमंदिर, हिल गार्डन के पीछे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन के सामने, गोधरा
(जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामा की पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन के
सामने, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : (0265) 2414142 मुंबई : 9323528901 दिल्ली : 9310022350 कोलकता : 033-32933885 चेन्नई :9380159957 जयपुर : 9351408285
भोपाल :9425024405 इन्दौर : 9893545351
:9425160428 :9425245616
:9827481336 पटना : 9431015601
:9422915064 : 9590979099
हैदराबाद : 9989877786 पूना : 9860797920
जलंधर : 9814063043
रायपुर
बेंगलूर
U.S.A.:
DadaBhagwan Vignan Institute : 100, SW Redbud Lane, Topeka, Kansas 66606 Tel. : +1877-505-DADA (3232), Email: info@us.dadabhagwan.org
U.K. : +44 330 111 DADA (3232) UAE : +971 557316937 Kenya : +254 722 722 063 Singapore : +65 81129229 Australia: +61 421127947
New Zealand: +64 210376434
Website : www.dadabhagwan.org
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________ सार सर्व शास्त्रांचे ! क्रमिक मार्गाची एवढी मोठी शास्त्रे वाचली किंवा मग फक्त ही नऊ कलमे जरी बोलली तरी खूप झाले ! नऊ कलमांमध्ये एवढी गजबची शक्ति ठेवली आहे. ही नऊ कलमे ही शास्त्रे नाहीत पण आम्ही जे पाळत आहोत व जी नेहमी आमच्या वर्तनातच असतात, तीच तुम्हाला करण्यासाठी देत आहोत. म्हणून तुम्ही ही नऊ कलमे अवश्य करा. ही नऊ कलमे संपूर्ण वीतराग विज्ञानाचे सार आहे! - दादाश्री ISANSTH-01-32125-36-0 978938291288Y Printed in India dadabhagwan.org Price Rs15