________________
भावना सुधारे जन्मोजन्म
दादाश्री : होय, म्हणजे त्याला असे तर नाहीच वाटले पाहिजे की मला आंबट शिवाय दुसरे आवडत नाही. कित्येक म्हणतात की, 'मला गोड शिवाय जमत नाही' तेव्हा तिखटाने काय गुन्हा केला? कित्येक म्हणतात की, 'मला गोड आवडतच नाही.' 'तिखटच फक्त पाहिजे.' ते हे सर्व समरसी नाही म्हणायचे. समरसी म्हणजे सर्व स्वीकार्य. कमी-जास्त प्रमाणात पण सर्व काही ‘एक्सेप्टेड'.
प्रश्नकर्ता : समरसी आहार आणि ज्ञान या दोन्हींचे काही कनेक्शन आहे? ज्ञानच्या जागृतिसाठी समरसी आहार नसेल तर नाही घ्यायचा?
दादाश्री : समरसी आहारासाठी तर असे आहे ना की आपल्या (ज्ञान प्राप्त) महात्मांना आता 'व्यवस्थित शक्ति'चे ज्ञान आहे म्हणून आपल्याला वाद राहिलाच नाही. हे तर बाहेरच्या लोकांसाठी सांगितले आहे. आणि आपल्या महात्मांना हे तर विचारात येणार ना की शक्य तेवढा समरसी आहार घेतला पाहिजे.
प्रकृतिचे गुणाकार-भागाकार प्रश्नकर्ता : म्हणजे प्रकृतिला समरसी असायला हवे असे?
दादाश्री : प्रकृति म्हणजे काय? तेरा ने गुणीलेली वस्तुला तेराने च भागिले तरच प्रकृति समाप्त होते. आता कोणी सतराने गुणीलेली वस्तुला तेराने भागिले तर काय होईल? म्हणून मी वेगळा गुणाकार केला.
प्रश्नकर्ता : म्हणजे तेरा ने गुणाकार तर तेरा ने भागाकार... दादाश्री : तसे केले तर च नि:शेष होईल ना ! प्रश्नकर्ता : त्याचे उदाहरण कशा पद्धतिने घ्यायचे?
दादाश्री : प्रकृति म्हणजे आधी जे भाव केले आहेत, ते कोणत्या आधाराने केले? पूर्वी जो जो आहार खाल्ला त्याच्या आधाराने भाव केले.