Book Title: Bhavna Sudhare Janmo Janm Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 8
________________ संपादकीय सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात, व्यवहारत किंवा बाहेर लोकांकडून ऐकण्यास मिळतच असते की असं नाही करायचे तरी होऊनच जाते ! असं करायचे आहे पण होत नाही ! भावना खूप आहे, करण्याचा दृढ निश्चय ही आहे, प्रयत्न पण आहे, परंतु होत नाही ! तमाम धर्म उपदेशकांची साधकांसाठी कायमची तक्रार असते की आम्ही जे सांगतो ते तुम्ही पचवत नाही. श्रोते पण हताशाने गोंधळतात की इतके इतके धर्माचे करुन सुद्धा का वर्तनात येत नाही? ह्याचे रहस्य काय? कुठे अडकले आहे? कशा प्रकारे ह्या चुकांचे निरसन होऊ शकेल? परम पूज्य दादाश्रींनी ह्या काळाच्या माणसांची केपसिटी (क्षमता) पाहून त्यांच्या योग्यतानुसार ह्याचा उलगडा एक नव्याच रीतीने अगदी वैज्ञानिक पद्धतिने दिला आहे. पूज्य दादाश्रींनी वैज्ञानिक स्पष्टीकरण केले की वर्तन हे परिणाम आहे, ईफेक्ट आहे आणि भाव हे कारण आहे, कॉझ आहे. परिणाम मध्ये सरळ-सरळ बदल आणता येणारच नाही. ते पण त्याच्या वैज्ञानिक तऱ्हेनेच होणार. जर कारण बदल केले तर परिणाम आपणाहूनच बदलून येणार ! कारण बदल करायला आता ह्या जन्मांत नव्याने भाव बदल करावा. ते भाव बदल करायला पूज्यश्रींनी नव कलमें भावण्याचे शिकविले आहे. तमाम शास्त्र उपदेश देतात तरीही ते परिणमत नाही, त्यांचा सार पूज्यश्रींनी नव कलमांच्या द्वारा मुळापासून बदल करण्याची चावी रूपाने दिले आहे. ज्याला अनुसरून लाखो लोकांनी ह्या जीवनाचे तर खरच पण जन्मोजन्माचे सुधारून घेतले आहे ! खरोखर रीतीने तर ह्या जन्मांत बाह्य बदल होत नाही पण ह्या नव कलमांची भावना भावण्याने आतमधील नवीन कारणे मुळापासून बदलून जातात आणि आंतरशांति जबरदस्त राहते ! दूसरयाचे दोष पाहणे बंद होते, जे परमशांति मिळवण्याचे परमरकारण बनून जाते ! आणि त्यातही बहुतेकांनी तर पूर्वीPage Navigation
1 ... 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54