________________
भावना सुधारे जन्मोजन्म
२७
नी एवढे होत नाही, त्याची क्षमा मागावी. आणि त्याच बरोबर ही शक्ति मागावी म्हणजे शक्ति मिळेल.
शक्ति मागून साधा काम
एका भाऊला मी सांगितले की, ह्या नव कलमांत सर्व येऊन गेले. यात काही बाकी ठेवले नाही. 'तुम्ही ही नव कलमे रोज वाचत जा !' तेंव्हा ते म्हणाले 'पण तसे होणार नाही.' मी सांगितले, मी करायला नाही सांगत, होणार नाही असे का म्हणता आहात? तुम्ही तर एवढेच म्हणायचे की, 'हे दादा भगवान, मला शक्ति द्या.' शक्ति मागायचे सांगतो. तेंव्हा म्हणे, 'हे तर मजा येईल !' लोकांनी तर करायला शिकविले आहे.
मग मला म्हणाले, 'ही शक्ति कोण देईल?' मी सांगितले, 'शक्ति मी देईन.' तुम्ही मागाल त्या शक्ति मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्हाला स्वता:ला मागताच नाही येत, त्यामुळे मला शिकवावे लागते की ह्या रीतीने शक्ति मागा. नाही शिकवावे लागत? पहा ना, हे शिकविलेच आहे ना सर्व? हे माझे शिकविलेलेच आहे ना? तेव्हा ते समजून गेले, आणि मग म्हणाले की एवढे तर होईल, ह्यात सर्व आले !
हे करायचे नाही तुम्हाला. तुम्ही काहीही करायचे नाही. निवांतपणे रोजच्या पेक्षा दोन चपात्या जास्त खा, पण ही शक्ति मागा. तेंव्हा मला म्हणाले, 'ही गोष्ट मला आवडली.'
__ प्रश्नकर्ता : पहिली तर हीच शंका असते की शक्ति मागीतली तर मिळणार की नाही?
दादाश्री : हीच शंका खोटी ठरत असते. आता तुम्ही ही शक्ति मागत असतात ना ! म्हणजे ती तुमची शक्ति आत उत्पन्न झाली की मग ती शक्तिच कार्य करुन घेईल. तुम्हाला करायचे नाही. तुम्ही कराल तर ईगोईझम (अहंकार) वाढेल. 'मी करायला जातो पण होत नाही' असे होईल. म्हणून ती शक्ति मागा.