Book Title: Bhavna Sudhare Janmo Janm
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 37
________________ २८ भावना सुधारे जन्मोजन्म प्रश्नकर्ता : ह्या नव कलमांत आपण शक्ति मागतो की असे नाही करायचे, नाही करावयाचे की नाही अनुमोदायचे, म्हणजे याचा अर्थ असा की भविष्यात असे होऊ नये त्यासाठी आपण शक्ति मागतो की आपली मागचे केलेले सर्व (दोषं) धुऊन जाण्यासाठी आहे हे? दादाश्री : ते धुतले जाईल आणि शक्ति उत्पन्न होईल. शक्ति तर आहेच, पण ते (मागचे दोष) धुतले गेल्याने ती शक्ति व्यक्त होते. शक्ति तर आहेच पण व्यक्त झाली पाहिजे. त्यामुळे दादा भगवानची कृपा मागत आहोत, हे आपले (दोष) धुतले जाईल तर शक्ति व्यक्त होईल. प्रश्नकर्ता : हे सर्व वाचले तेव्हा कळले की ही तर एक जबरदस्त बात आहे. लहान मनुष्य ही समजून गेला तर सर्व जीवन त्याचे सुखमय होऊन जाईल. दादाश्री : होय, बाकी समजण्या सारखी गोष्टच त्याला मिळालेली नाही. हे पहिल्यांदा स्पष्ट समजण्या सारखी बात मिळत आहे. आता हे मिळाले तर उलगडा होऊन जाईल. ही नव कलमे आहेत, त्यात आपणहून आपल्याने जेवढी पाळली जात असतील त्याची हरकत नाही. पण नाही पाळली जात असेल, त्याचा मनात खेद ठेवायचा नाही. फक्त तुम्हाला तर हे म्हणायचे की मला शक्ति द्या. ती शक्ति एकत्र होत राहिल. आत शक्ति जमा होत राहिल. नंतर मग काम आपणहून होऊन जाईल. तुम्ही शक्ति मागाल तर ही सर्व नव कलमे सेट होऊन जाणार. अर्थात् फक्त बोललात तरी खूप होऊन गेले. बोललो म्हणजे शक्ति मागीतली नी म्हणजे शक्ति मिळाली. ___'भावना' पासून भावशुद्धि प्रश्नकर्ता : आपण तर सांगतात ना की हुक्का पीत जातो पण आत वेगळे चालत असत की नाही प्यायचे, नाही पाजायचे, की पिणाऱ्याचे प्रत्ये नाही अनुमोदायचे...

Loading...

Page Navigation
1 ... 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54