Book Title: Bhavna Sudhare Janmo Janm
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 28
________________ भावना सुधारे जन्मोजन्म दादाश्री : सर्व खूप प्रकारच्या चेष्टां आहेत. प्रश्नकर्ता : तर हे विषयविकार संबंधी चेष्टा कशा प्रकारे आहेत? दादाश्री : विषयविकारच्या बाबतीत देह जे जे कार्य करते त्याचा फोटो घेऊ शकता, म्हणून ती सर्व चेष्टां. कायाने नाही होणार ती चेष्टा नाही. कधी तरी इच्छा होतात, मनात विचार येतात, परंतु चेष्टा झालेली नसते. विचार संबंधी दोष ते मनाचे दोष ! 'मला निरंतर निर्विकार राहण्याची शक्ति द्या.' एवढे तुम्ही 'दादां'च्या जवळ मागावे, 'दादा' दानेश्वरी आहेत. रस मध्ये लुब्धपणा न करण्याची... प्रश्नकर्ता : ७. हे दादा भगवान! मला कोणत्याही रसमध्ये लुब्धपणा न करण्याची अशी शक्ति द्या. समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या. दादाश्री : हे जेवणाच्या वेळी तुम्हाला अमुकच भाजी, टमाट्याचीच आवडते, ती तुम्हाला पुन्हा आठवत राहते तर लुब्धपणा झाला म्हणायचे. टमाटा जेवण्यात हरकत नाही, परंतु पुन्हा आठवण नाही आली पाहिजे. नाहीतर आपली सर्व शक्ति लुब्धपणा मध्ये जात राहील. म्हणून आपण सांगायचे की 'जे येईल ते मला मान्य आहे.' लुब्धपणा कुठल्याही प्रकारचा नाही व्हायला पाहिजे. ताटात जे जेवण आले, आमरस-चपाती आली तर आमरस-चपाती निवांतपणे खावी. त्यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही, पण जे आले ते स्वीकार करायचे दुसरे काही आठवायचे नाही. प्रश्नकर्ता : मग हे समरसी म्हणजे काय? दादाश्री : समरसी म्हणजे पूरणपोळी, डाळ-भात, भाजी सर्वच खावे, परंतु फक्त पूरणपोळीच नाही खात राहायचे. आणि काही लोकं गोड सोडतात. ते गोड त्यांच्यावर दावा मांडेल,

Loading...

Page Navigation
1 ... 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54