________________
अर्धमागधी व्याकरण
(२) कधी आज्ञार्थी रूपातील अन्त्य स्वर दीर्घ केला जातो. पासहा (पासह),
कुव्वहा (कुव्वह), संबुज्झहा (संबुज्झह), होऊ णं (होउ णं). (३) उपसर्गयुक्त धातु व साधितशब्द यात कधी कधी ह्रस्व स्वर दीर्घ केला
जातो. धातु : व्यतिव्रज् = वीईवय (पुढे जाणे) साधितशब्द : प्रवचन = पावयण, प्रकट = पायड, प्रस्रवण = पासवण
(लघ्वी), अभिजित् = अभीइ (नक्षत्रविशेष). (४) स्वार्थे क प्रत्ययाच्या मागील ह्रस्व स्वर कधी कधी दीर्घ केला जातो.
क्षुद्र-क = खुड्डाग, अनादि-क = अणाईय, मुहूर्त-क = मुहुत्ताग, पिटक
- पिलाग (पेटी, पेटारा). (५) 'धिक्' या अव्ययात अन्त्य व्यंजनाचा लोप होऊन मागील स्वर दीर्घ
होतो? :- धिक् = धी। (६) ह्रस्व स्वरावरील अनुस्वाराचा लोप झाल्यास तो ह्रस्व स्वर दीर्घ होतो.
दंष्ट्रा = दाढा, संहरति = साहरइ, सिंह = सीह. ७) ह्रस्व स्वरापुढील संयुक्त व्यंजनात एका अवयवाचा लोप झाल्यास मागील
ह्रस्व स्वर दीर्घ होतो (मागील स्वर दीर्घ असल्यास तो तसाच रहातो. सुलभीकरण परि. ११८ पहा). कश्यप = कासव, स्पर्श = फास; विश्राम = वीसाम; उत्सव = ऊसव.
(आ) ह्रस्वीकरण (१) स्वरभक्तीने शब्दात अधिक स्वर आला असता, दीर्घ स्वर ह्रस्व होतो.
उदा. :- (आ - अ :-) आचार्य = आयरिय, (ई - इ) :- श्री = सिरि, ही = हिरि (लज्जा), ईर्या = इरिया (गमन) (ऊ - उ) :- वैडूर्य =
वेरुलिय, सूक्ष्म = सुहुम. (२) पुढे स्वार्थे क प्रत्यय असता मागील दीर्घ स्वर कधी-कधी ह्रस्व होतो.
१ पिशेल, पृ. ६८ पहा. २ स्वरभक्तिसाठी परि. ११६ पहा