________________
२२२
अर्धमागधी व्याकरण
पुरवणी १ __ शंभर ते हजार मधील पूर्ण शतक दाखविणाऱ्या संख्या, मोठ्या संख्या इत्यादी कशा सिद्ध करावयाच्या याची थोडी माहिती पुढे दिली आहे. (१) शंभर ते हजार मधील पूर्ण शतक दाखविणाऱ्या संख्या : (अ) ‘सय' पूर्वी एग, दो, ति यांचा उपयोग करून :
दो सया, दो सयाइं (२००); तिण्णि सयाइं (३००); चत्तारि सयाई
(४००); पंच सया (५००); छ सया, छ सयाइं (६००); इत्यादी. (आ) समासात उपयोग करून
पंचसयाई तावसाणं (५०० तापस); छस्सया (६००); सिरासयाइं सत्त, नव ण्हारुसया (७०० नाड्या, ९०० स्नायु); अट्ठसयं खत्तियदारगाणं (८०० क्षत्रियदारक)
(२) शंभर ते हजारमधील इतर संख्या :
अट्ठसयं (१०८); सत्तरिसयं (१७०); चत्तारि चउव्वीसे जोयणसए (४२४ योजने); चत्तारि तीसे जोयणसए (४३० योजने); एगूणाई पंच-माईसयाइं (४९९ माता); पंचहिं छत्तीसेहिं अणगारसएहिं सद्धिं (५३६ अनगारासह); सत्त तेवीसे जोयणसए (७२३ योजने).
(३) हजार ते दहा हजार मधील पूर्ण सहस्रक दाखविणाऱ्या संख्या : (अ) एक्कारस सया (११००); एक्कारस सयाइं (११००); बारस सया (१२००);
इत्यादी. (आ) सहस्स'च्या पूर्वी एग, दो इत्यादीचा उपयोग करून दो सहस्साई, दुवे
सहस्से (२०००); तिण्णि सहस्साई, चत्तारि सहस्साई, छ सहस्साइं.
(४) नवनउइ' सहस्साई (९९,०००)
१
पउम. ३-२३