Book Title: Ardhamagdhi Vyakaran
Author(s): K V Apte
Publisher: Shrutbhuvan Sansodhan Kendra

View full book text
Previous | Next

Page 471
________________ ४७० अर्धमागधी व्याकरण ४३७ क्रियाविशेषण वाक्य जोडणे (अ) कालदर्शक : (१) जया, जाहे, जइया :- (१) जया अहं अगारवासं वसामि तया अहं अप्पवसा। (निरमा पृ.५३) जेव्हा मी घरी होते तेव्हा मी स्वतंत्र होते. (२) सव्वे वि निवा जइया आयत्ता होंति एगनरवइणो। तदणुन्नाएण तया सयंवरो होइ कायव्वो।। (सुर. १.१२८) जेव्हा सर्व राजे एका राजाच्या आयत्त होतात वा असतात तेव्हा तदनुज्ञेने स्वयंवर करायचे असते. (३) जाहे से जक्खे एवं वएज्जा ताहे तुब्भे एवं वयह। (नामासं पृ.१२७) जेव्हा तो यक्ष असे म्हणेल तेव्हा तुम्ही असे म्हणा. (आ) स्थलदर्शक : (१) जत्थ :- (१) वच्चामि तत्थ कत्थ य जत्थ न पेच्छामि नियलोयं। (जिन. पृ.३) जेथे आपले लोक दिसणार नाहीत अशा कोठे तरी जाईन. (२) जत्थ वच्चसि अणुगंतव्वं मए वि तत्थेव। (सुर. ७.१७६) जेथे तू जाशील तेथे मी हि मागोमाग येणार. (२) जत्थ जत्थ :- जत्थ जत्थ आयरिओ ठायइ तत्थ तत्थ नावा जले बुड्ढ -इ। (धर्मो. पृ.४६) जेथे जेथे आचार्य उभा राही तेथे तेथे नाव बुडू लागे. (इ) रीतिदर्शक : (१) इव :- कोवो जलणो व्व वणं दहइ तवं। (संप इ. २.७९) अग्नि जसे वन जाळतो तसा कोप तप जाळतो. (२) जहा :- जं जह भवियव्वं होइ तं तहा देव्वजोएण। (लीला. ३११) जे जसे होणार असेल ते दैवयोगाने तसेच होते. (३) जहाजहा :- जह जह वड्डइ गब्भो तह तह सुंदरिमणमि संतावो। (नाण. १.६३) जस जसा गर्भ वाढू लागला तसतसा सुंदरीचा मन:संताप वाढू लागला. (ई) कार्यकारण : (१) जं :- (१) एत्तियकालं णणु वंचिउ म्हि जं सेविओ ण मे धम्मो। (धर्मो. पृ.२६) इतका काळ मी वंचित झालो, कारण मी धर्म आचरिला नाही. १ कधी विशेषणवाक्य :- पत्तो तमुद्देसं जत्थ निहाणं। (समरा पृ.१४४) जेथे ठेवा होता त्या प्रदेशात पोचला.

Loading...

Page Navigation
1 ... 469 470 471 472 473 474 475 476 477 478 479 480 481 482 483 484 485 486 487 488 489 490 491 492 493 494 495 496 497 498 499 500 501 502 503 504 505 506 507 508 509 510 511 512 513