Book Title: Ardhamagdhi Vyakaran
Author(s): K V Apte
Publisher: Shrutbhuvan Sansodhan Kendra

View full book text
Previous | Next

Page 489
________________ ४८८ अर्धमागधी व्याकरण (अ) जोर देतांना 'जाव' चे वाक्य कधी नंतर ठेवतात. (१) तीए समं ताव अच्छियव्वं जाव मह रज्जलाभो हो । (बंभ. पृ.७२) मला राज्यलाभ होईपर्यंत तिच्यासह रहावे. (२) अच्छाहि ताव जाव अम्हे जीवामो। (कथा. पृ.१५३) आम्ही जिवंत आहो तो पर्यंत रहा. (८) 'जइ' ने प्रारंभ होणारी वाक्ये प्रथम असतात. जइ पुण अम्हेहिं सह आगच्छसि ता तुमं किं पि पट्टणं पराणेमो । ( नल. पृ.२१) जर तु आमच्याबरोबर येशील तर तुला कोणत्यातरी नगरी नेऊ. (अ) जोर देण्यास 'जइ' चे वाक्य कधी नंतर ठेवतात. अहं तुमं जीवावेमि जइ मे वयणं सुणेसि। (समरा. पृ.५२७) जर माझे वचन ऐकशील तर मी तुला जगवीन. (९) ‘जहा’, ‘जहा जहा' ने आरंभी होणारी वाक्ये प्रथम असतात. (१) जहा तुमं भणिहिसि तहा करिस्सामि । ( महा. पृ२४९ अ) जसे तू म्हणशील तसे करीन. ( २ ) जहा जहा य अयगरो कुररं गसइ तहा तहा सोवि जुण्णभुयंगमं। (समरा. पृ.१२१) आणि जस जसा अजगर कुरर ( पक्ष्या) ला गिळू लागला तस तसा तोहि जीर्ण सर्पाला (गिळू लागला) (अ) जोर देण्यास ही वाक्ये कधी नंतर ठेवतात. (१) भंते तहा काहं जहा भे वयबाहर न होइ । (कमा. पृ.९९) महाराज, असे करीन की ज्यामुळे तुमची व्रतबाधा होणार नाही. (२) तहा करेह जहा पुणरवि तं दुक्खं न लहामि। (कथा. पृ. १७८) असे करा की ज्यामुळे मला पुनरपि तें दु:ख होणार नाही. (१०) 'जेण' चे वाक्य प्रथम असते. अम्हे वि सुया कावि पउत्ती तेण पुच्छामो । (कथा. पृ.११२) आम्ही हि काही बातमी (हकीकत) ऐकली आहे, म्हणून विचारतो. (अ) जोर देण्यास 'जेण' चे वाक्य कधी नंतर ठेवतात. अओ मंदपुण्णा वयं जेण दीणारा इंगाला जाया । (धर्मो. पृ.२०६) म्हणून आम्ही कमी पुण्यवान आहोत, कारण दीनार कोळसे झाले. (आ) संयुक्त वाक्य : जओ, उयाहु, किंतु, यांनी आरंभी होणारी वाक्ये नंतर असतात.

Loading...

Page Navigation
1 ... 487 488 489 490 491 492 493 494 495 496 497 498 499 500 501 502 503 504 505 506 507 508 509 510 511 512 513