________________
प्रकरण २९ : वाक्ये जोडणे
४७३
(निरया पृ.२४) वेहल्ल कुमाराला पाठव, अथवा युध्दसज्ज होऊन रहा.
(४) उदाहु :- तं दारगं एगते उज्झामि उदाहु मा। (विवाग. पृ.१०) त्या मुलाला एकान्तांत टाकू की नको.
(५) वा :- दारयमाणेहि ममं वा तत्थ नेहि। (चउ. पृ.३१) मुलाला आण वा मला तेथे ने.
(६) न वा :- इच्छइ वा न वा अन्नं पुरिसं। (सुर. ४.१२३) (ही) दुसऱ्या पुरुषाची इच्छा करते किंवा नाही.
४४० विरोधदर्शक वाक्ये जोडणे
(१) परं : (१) अच्छसु एत्थं परमत्तणो य गुज्झं कस्स वि मा पयडेसु। (अगड. १७) येथे रहा; पण आपले गुह्य कुणाजवळ हि प्रगट करू नकोस (२) अप्पवहो वि न जुत्तो देसच्चाओ परं जुत्तो। (सुर. २.१९६) आत्महत्याहि योग्य नाही; पण देशत्याग योग्य आहे.
(२) तु, उ :- (१) तुमं तु परत्थीपरंमुहो। (नल. पृ.५०) पण तू परस्त्री पराङ्मुख आहेस. (२) चइज्ज देहं न उ धम्मसासणं। (दस. ११.१७) देहत्याग करीन, पण धर्माज्ञा त्यागणार नाही.
(३) किंतु :- न देवया किंतु माणुसी एस :। (नल. पृ.४२) ही देवता नाही, पण मानुषी आहे.
(४) पुण :- पुन्नक्खएण झिज्जइ रिद्धी न उण चाएण। (नल. पृ.४५) रिद्धी पुण्यक्षयाने कमी होते, पण त्यागाने नाही.
४४१ कार्य-कारण दर्शक वाक्ये जोडणे ___ (१) ता, तो, तओ :- (१) एत्थ आसमें दिट्ठीविसो सप्पो अभिद्दवेइ ता मा एएण पहेण वच्चह। (महा. पृ.१५९अ) येथे आश्रमात दृष्टिविष असा सर्प त्रास देतो; म्हणून या मार्गाने जाऊ नका. (२) न सोहणं सरीरं कणगमईए तओ अहं पेसिया। (कथा. पृ.१४४) कणगमतीची प्रकृति बरी नाही; म्हणून मला पाठविले आहे.
(२) अओ :- (१) एसो खु रायाहिरायस्स पहाणदूओ अओ सामिव्व