________________
४६२
अर्धमागधी व्याकरण
२) म्हणणे, करणे, समजणे इत्यादी सकर्मक पण अपुरे विधेय असणाऱ्या क्रियापदांच्या कर्मणि प्रयोगात पूरक-कर्म उद्देश्याप्रमाणे प्रथमा विभक्तित असते.
१) भवतण्हा लया वुत्ता। (उत्त २३ .४८) संसार-तृष्णा लका म्हटली
जाते.
२) कया जिणयंत्रण साविगा सिरिमई। (जिन. २४) जिनदत्ताने श्रीमंतीला श्राविका केले.
३) जेव्हा अनेक उद्देश्ये एकाद्या नामाशी वा सर्वनामाशी एकविभक्तिक असतात, तेव्हा विधिनाम हे या नाम वा सर्वनामाप्रमाणे असते.
१) तं गेहं सो विभवो सा लीला सो य वल्लहो कंतो। सव्वं खणेण नटुं। (नाण १.३१८) ते घर, ते वैभव, ती लीला , तो प्रियपती, हे सर्व क्षणांत नष्ट झाले. २) दुकलत्तं रालिदं वाही तह कन्नयाण बाहुल्लं पच्चक्खं नरयमिणं। (नाण. ७.६) वाईट पत्नी, दारिद्रय, व्याधी व कन्यांचे बाहुल्य हे म्हणजे प्रत्यक्ष नरक.
४३२ आ) विशेषण-विशेष्य-संवाद
अ) गुणविशेषण-विशेष्य-संवाद : १) विशेषणाच्या लिंग-वचन-विभक्तिप्रमाणे गुणविशेषण असते.
१) ईइसो चेव असारो संसारो। (पाकमा. पृ. २१) असार संसार हा असाच आहे. २) महावीरस्स भगवओ सीसे। (उत्त. २१.१) भगवान् महावीराचा शिष्य. ३) एयारिसे सरीरम्मि। (बंभ पृ. ३८) अशा प्रकारच्या देहात.
क) वचन-संवाद :१) अनेक विशेष्यांना विशेषण एकच असल्यास ते अ. व. त. असते. समासांत विशेषणे आपल्या मूळरूपात असतात.: तिव्वोवसग्ग, दिव्वाभरण,
दीहकाल, परमसंतोस इत्यादी. २ यल्लिगं यद्वचनं या च विभक्तिर्भवेद विशेष्यस्य।
तल्लिंगं तद्वचन सा च विभक्तिर्विशेषणस्यापि। ३ अर्धमागधीत क्वचित् लिंगभिन्नता (उदा. बहवे (पु.) वावीओ। व
विभक्तिभिन्नता (उदा. सइ अन्नेण मग्गेण (दस ५.१.६) दुसरा मार्ग असता)
आढळते. ४ 'वा' ने जोडलेली असताः केरिसो सुद्दो माहणो वा भवइ। (कथा पृ. १७४)