________________
प्रकरण १६ साधित शब्द : धातुसाधित विशेषणे
888888888888888888888888888888888888888888888888888888
२६४ धातुसाधित शब्द
धातूंना निरनिराळे कृत् प्रत्यय लागून (संस्कृतमध्ये) धातुसाधित शब्द सिद्ध होतात; त्यांना कृदन्त म्हणतात. हे धातुसाधित शब्द नाम, विशेषण, अव्यय असे तीन प्रकारचे असू शकतात. यापैकी धातूपासून अव्यये व विशेषणे साधण्याची स्वतंत्र प्रक्रिया अर्धमागधीत आहे. ___अर्धमागधीत आढळणारी धातुसाधित विशेषणे व त्यांची साधनिका यांचा पुढे प्रथम विचार केला आहे. २६५ वर्तमान कालवाचक कर्तरि धातुसाधित विशेषण (अ) खालील प्रत्यय धातूंना लागून ही विशेषणे सिद्ध होतात.
(१) अकारान्त धातूंना 'अंत' व 'माण' हे प्रत्यय जोडून प्राय: व.का.धा.वि. सिद्ध केली जातात. (क) 'अंत'२ प्रत्यय जोडून :- चिट्ठ-चिंट्ठत, जल-जलंत, पास-पासंत, किण-किणंत, रम-रमंत, समारंभ-समारंभंत, गिण्ह-गिण्हत, जंप-जपंत, सारक्ख (संरक्ष्)-सारक्खंत, कुण-कुणंत, भास-भासंत, पेच्छ-पेच्छंत. (ख) ‘माण' प्रत्यय जोडून :- विराय-विरायमाण, अभिलस-अभिलसमाण, जल-जलमाण, पास-पासमाण.
१ २
शतृशानयोतमाणौ। मार्कं. ६.१७ तसेच 'बुवंत' ब्रू (उत्त. २३.२१)