________________
३०४
अर्धमागधी व्याकरण
आढळतो. उदा. गंधमल्ले, गंधमल्लं, पाणभूयाई, पाणभूयं इत्यादी
इ) काही द्वंद्व समास 'वा' चा उपयोग करून सोडविले जातात. १) निंदापसंसासु-निंदाए वा पसंसाए वा। २) लाभालाभे-लाभे वा अलाभे वा।
ई) दोन विशेषणे भिन्न वस्तूंशी संबंधित असतील तर त्यांचा कधी द्वंद्व समास होतो.
१) उच्चावयं-उच्चं च अवयं च । २) उच्चनीयं-उच्चं च नीयं च।
२९५ तत्पुरूष (तप्पुरिस)
तत्पुरूष समासांत पूर्वपद गौण असून उत्तरपद प्रधान असते आणि पूर्वपदाने उत्तरपदाचा अर्थ मर्यादित होतो.
उत्तरपदाचे जे लिंग व वचन तेच संपूर्ण समासाचे लिंग व वचन असते. अ) विभक्ती तत्पुरूष
विभक्ती तत्पुरूष समासाच्या विग्रहात पूर्वपद हे द्वितीया ते सप्तमी पर्यंतची कोणतीतरी विभक्ति घेते. त्यावरून द्वितीया तत्पु, तृतीया तत्पु. इत्यादी संज्ञा दिल्या जातात.
१) द्वितीया तत्पुरूष :
१) पुढविनिस्सियं-पुढविं निस्सियं। २) हिययगएण-हिययं गएण। ३) पमोयपत्रो-पमोयं पत्तो। ४) उप्पहपवन्ना - उप्पहं पवन्ना। ५) संसारपवन्नाणं-संसार पवन्नाणं।
२) तृतीया तत्पुरूष : पुढे सांगितलेल्या परिस्थितीत तृतीया तत्पु होतो. १) पूर्वपद कर्तृवाचक वा साधनवाचक उत्तरपद क. भू. धा. वि. १) भुयंगउक्को -भुयंगेण उक्को। २) अन्नकउं-अन्नेण कडं।
१ दोन विशेषणांचा वा धातु विशेषणांचा द्वंद्व समास वैयाकरणांना संमत नाही.
असे समास अनियमित द्वंद्व म्हणावे २ श्रित, गत, प्राप्त इत्यादी शब्द उत्तरपदी असता द्वितीया तत्पुरूष समास
होतो.