________________
प्रकरण २६ : काही धातुसाधित विशेषणांचे उपयोग
४४१
अनुभव अनंत काळ हिंडतात २) तत्थ देवसुहं निसेवमाणा गमेंति कालं । (चउ पृ. ३२) तेथे देवसुखे सेवीत काळ घालवितात.
अ) व. का. धा. वि. बरोबर चिट्ठ (स्था) (वा अस) चा उपयोग असतां क्रियासातत्य निर्दिष्ट होते.
१) जग्गंतो ठिओ राया। (नल पृ. ५०) राजा जागत राहिला २) अमरिसेणं पलोयंतो अच्छइ। (महा पृ. १७५ अ) रागाने पहात राहिला.
३) व. का. धा.वि. चा उपयोग विशेषणांप्रमाणे होतो.
१) अत्थं गच्छंतस्स वि रविणो। (वजा १०२) अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे सुद्धा २) तं रुयमाणिं दद्रु। (सिरि ३०१) रडणाऱ्या तिला पाहून
४) क. भू. धा. वि. सह 'अस' च्या व. का. धा. वि. चा उपयोग, ‘असतां' या अर्थी होतो. उदा. १) पडिबुध्दा समाणी। (नल पृ. १४) जागी झाली असतां. २) बंधेहिं पीडिओ संतो। (सुपास ५९६) बंधनांनी पीडित झाला असता.
५) क्वचित् क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे व. का. धा. वि. चा उपयोग केला जातो.
१) जयं चरे जयं चिट्ठे जयं आसे जयं सए। (दस. ४.८) काळजीपूर्वक हिंडावे, उभे रहावे, बसावे, निजावे २) ते जाणमजाणं वा न हणे नो व घायए। (दस ६.१०) जाणतां वा अजाणतां त्यांना ठार मारू नये वा मारवू नये.
६) संकेतवाक्यांत व का. धा. वि. चा उपयोग होतो.
जइ जिणधम्मं सेविज हं तया तो सुही होतो। (जिन पृ. २१) तेव्हां जर मी जिनधर्म आचरिला असता तर मी सुखी झालो असतो.
७) संकेतार्थ करण्यास व. का. धा. वि. चा उपयोग केला जातो.
१) नूणमियाणिं गच्छंतओ सि जइ मं न पेच्छंतो। (महा पृ. १४४ अ) जर मला पाहिले नसतेस तर तू आतां खरंच गेला असतास २) जइ तुहाभिप्पाय मुणितो ता अहं पि बंभचेर करितो। (महा प-. १६५ अ) जर तुझा अभिप्राय कळला असता तर मी हि ब्रह्मचर्य पाळले असते.
८) सत्षष्ठी व सती सप्तमी रचनेत व. का. धा. वि. चा. उपयोग होतो. अ) सत्षष्ठी : मंतसाहणं मम कुणंतस्स एगो महापिसाओ सहस च्चिय