Book Title: Ardhamagdhi Vyakaran
Author(s): K V Apte
Publisher: Shrutbhuvan Sansodhan Kendra

View full book text
Previous | Next

Page 435
________________ ४३४ अर्धमागधी व्याकरण १) जइ मम जाउयाओ जाणिस्संति तो मम खिंसिस्संति (प्रयांस पृ. १६२) माझ्या जावांना कळेल तर त्या माझी निंदा करतील. २) जइ तुम्होवरि राओ भविस्सइ एयासिं तो हं पासाओ वरिं रत्तं पडागं चालिस्सामि । (बंभ पृ. ५२) जर तुझ्यावर यांचे प्रेम असेल तर मी प्रासादावर लाल ध्वज हलवीन. ४१७ आज्ञार्थाचे उपयोग १) तीन पुरूषात आज्ञार्थाचे पुढीलप्रमाणे विविध अर्थ होतात. अ) प्रथम पुरूषांत प्रश्नपूर्वक अनुज्ञा (वानुमती अनुज्ञा), इच्छा, हेतु, आवश्यकता इत्यादींचा बोध होतो. १) किं पच्छाहुत्तं नियत्तामो उयाहु तत्थेव अत्ताणं खिवामो । (महा. पृ. २७७ अ) मागे परतू या की तेथेच स्वतःला फेकू या? २) एहि नरवइसमीवं गच्छम्ह। (समरा पृ. २९७) चल, राजाजवळ जाऊ या ३) भद्दे! एहि भुंजाओ ताव भोगे। (धर्मो पृ. २०) भद्रे! ये, प्रथम भोग तर भोगू या. ____ आ) द्वितीय पुरुषांत आज्ञा, विनंती, आशिर्वाद, उपदेश इत्यादींचा बोध होतो. १) आज्ञा : १) भिक्खू जायाहि अन्नओ । (उत्त २५.६) भिक्षु, दुसरीकडे याचना कर. २) अन्नत्थ कुणसु गमण। (अगड ८) दुसरीकडे गमन कर. २) विनंति : १) निसुणसु नरंवर! अक्खाणयं इमं रम्म। (सिरि ३६) राजा! हे रम्य आख्यान ऐक २) सामिय कुणसु पसाय। (पइम ३४.११) स्वामी प्रसाद करा. ३) आशिर्वाद : १) चिरंजीव। (समरा पृ. २४५) चिरकाळ जग २) वच्छ जीव नंद चिर कालं। (सिरि २६१) बाळा चिरकाळ जग व सुखी रहा. ___४) उपदेश : करेह जिणिंदपणीयं साहुधम्म। (बंभ पृ. ३१) जिनेंद्रप्रणीत साधुधर्म आचरा ५) जयजयकार : १) जय तिहुयणनाह! सणंकुमार । (पाकमा पृ. ५२) हे त्रिभुवननाथ सणंकुमारा!, विजयी हो २) जय सयलजीव वच्छल। (समरा पृ. २४७) हे सकल जीवावर वत्सल असणाऱ्या, विजयी हो.

Loading...

Page Navigation
1 ... 433 434 435 436 437 438 439 440 441 442 443 444 445 446 447 448 449 450 451 452 453 454 455 456 457 458 459 460 461 462 463 464 465 466 467 468 469 470 471 472 473 474 475 476 477 478 479 480 481 482 483 484 485 486 487 488 489 490 491 492 493 494 495 496 497 498 499 500 501 502 503 504 505 506 507 508 509 510 511 512 513