Book Title: Satya Asatya Na Rahasya Marathi Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ सुरु होते, स्वत:च्या परम सत् स्वरुपाची भजना सुरु होते, तिथे व्यवहार सत्य-असत्याची भजना किंवा उपेक्षा समाप्त होते, तिथे मग व्यवहार सत्याचा आग्रह पण अंतरायरुप बनतो! व्यवहार सत्यही कसे असायला हवे? हित, प्रिय आणि मित असेल तरच त्या सत्याला सत्य म्हटले जाते. वाणी, वर्तन आणि मनाने सुद्धा कुणाला किंचित्मात्र दु:ख न देणे हे आहे मूळ सत्य, पण ते व्यवहार सत्य आहे! अशाप्रकारे 'ज्ञानीपुरुष' व्यवहार सत्याची उपेक्षा न करता त्यांना त्यांच्या यथास्थानावर प्रस्थापित करून यथार्थ समज देतात! ह्या सत्, सत्य आणि असत्याची सर्व रहस्ये इथे प्रस्तुत संकलनात उलगडली जातात, जे जीवनाच्या मार्गात संतुष्टी देतात! -डॉ. नीरूबहन अमीनPage Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64