________________
सत्य-असत्याचे रहस्य रहस्य
निश्चय म्हणजे पूर्ण सत्य आणि व्यवहार म्हणजे ठराविक मर्यादेपर्यंतचे सत्य होय.
'असत्' नसते भगवंतांकडे म्हणून सत्य आणि असत्य, ह्या दोन्ही 'वस्तू' नाहीतच. हा तर सामाजिक शोध आहे. म्हणून हे सर्व सामाजिक आहे, बुद्धिला धरुन आहे. काही समाजात दुसऱ्यांदा लग्न करणे हा गुन्हा आहे आणि फॉरेन वाले एका तासात पुन्हा लग्न करतात, त्यास ते लोक कायदेशीर मानतात. म्हणून ते वेगळे-वेगळे आहे, ही सापेक्ष गोष्ट आहे. पण ते सत्य अमुक नियमाच्या आत लपलेले आहे.
प्रश्नकर्ता : सत्य आणि असत्य जे आहे, त्यात 'एडजस्टमेन्ट' कशा प्रकारे करावी?
दादाश्री : सत्य आणि असत्य ही भ्रांतिजन्य वस्तू आहे. भगवंतांकडे एकच आहे. आणि हे तर लोकांनी दोन्ही वेगळे केले आहे.
तुमच्यासाठी मांसाहार करणे ही हिंसा आहे आणि मुसलमानांसाठी मांसाहार करणे ही अहिंसा आहे. म्हणजे हे सर्व 'सब्जेक्टिव' (सापेक्ष) आहे आणि भगवंतासाठी तर एकच वस्तू आहे, एक पुद्गलच आहे. जसे भगवंतांकडे आहे तसे मला वर्तते आणि ते मी तुम्हाला शिकवतो.
पण हे लोक तर यातच गुंतले, सब्जेक्टमध्ये गुंतले, त्यामुळे हे सर्व ज्ञान निघून गेले. बाकी, भगवंतांकडे असे सत्य आणि असत्य नाहीच. हे सर्व तर विनाशी आहे. आपण एकाच वस्तुचे दोन भाग पाडले. म्हणून हे सर्व सत्य असत्य आहे. हे सत्य खरेतर सामाजिक स्वभाव आहे. हो, सामाजिक रचना आहे. समाजात समोरासमोर दुःख होऊ नये म्हणून अशी रचना करण्यात आली.
प्रश्नकर्ता : हे पण रिलेटिव सत्यच आहे ना?
दादाश्री : हो, आहे रिलेटिव सत्य! पण त्यात सामाजिक रचना केली आहे की, 'भाऊ, हे सत्य मानले जाणार नाही.' तुम्ही घेतले आहे