________________
22
सत्य-असत्याचे रहस्य
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : या बटाट्याच्या 'स्लाइसीस' केल्या, तर काय त्यात एखादी कांद्याची स्लाइस निघेल ?
प्रश्नकर्ता : नाही. सगळ्या बटाट्याच्याच 'स्लाइस' निघतात.
4
दादाश्री : अशाप्रकारे हे लोक 'स्लाइसीस' करीत रहातात की 'आता उजेड येईल, आता येईल...' अरे, पण नाही येत. ह्या तर सर्व अज्ञानतेच्या स्लाइसीस ! अनंत जन्म डोकेफोड करून मरून जाशील, उलटे डोके करून देह टांगशील तरीही काही निष्पन्न होणार नाही. ते तर ज्यांनी (मोक्ष) मार्गाला प्राप्त केले आहे तेच तुला हा मार्ग प्राप्त करवितील, जाणकार असतील ते मार्ग प्राप्त करवितील. असे जाणकार तर नाहीत. उलट संसारात गुंतवणारे जाणकार आहेत, ते तुम्हाला गुंतवून टाकतील! सत्य काय? असत्य काय ?
प्रश्नकर्ता : खरे आणि खोटे यात किती फरक आहे ?
दादाश्री : तुम्ही एखाद्याला पाचशे रुपये दिले असतील, आणि नंतर तुम्ही त्याला विचारले की, 'मी तुम्हाला पैसे दिले होते' आणि तो जर खोटे बोलला की 'नाही दिले', तर तुम्हाला कसे वाटेल ? तुम्हाला दुःख होईल की नाही ?
प्रश्नकर्ता : होईल.
दादाश्री : मग तेव्हा आपल्याला समजेल ना, की 'खोटे' हे खराब आहे, दु:खदायी आहे ?
प्रश्नकर्ता : हो, बरोबर आहे.
दादाश्री : आणि खरे बोलला तर सुखदायी वाटते ना? खरी वस्तू स्वतःला सुख देईल आणि खोटी वस्तू दुःख देईल. म्हणजे खऱ्याची किंमत तर असतेच ना ? खऱ्याचीच किंमत. खोट्याची काय किंमत ? खोटे हे दुःखदायी असते!